‘डीबाडी डीपांग’ नंतर संदीप-सलील-अवधूतचं ‘हे’ नवं गाणं सोशल मीडियावर घालतंय धुमशान

‘डीबाडी डीपांग’ नंतर संदीप-सलील-अवधूतचं ‘हे’ नवं गाणं सोशल मीडियावर घालतंय धुमशान

डॉ.सलील कुलकर्णी यांचा  ‘वेडिंगचा शिनेमा’ (Wedding चा शिनेमा ) हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सलील एक लोकप्रिय कवी, संगीतकार आणि गायक आहेच. मात्र आता तो लवकरच लेखक आणि दिग्दर्शकाच्या भूमिकेतूनही त्याच्या चाहत्यांना दिसणार आहे. Wedding चा शिनेमा या चित्रपटाचं दिग्दर्शन सलील करत आहे. नुकतच या चित्रपटातील एक मनोरंजक गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या चित्रपटातील हे पहिलंच गाणं असून प्रेक्षकांनी या गाण्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. ‘बोल पक्या’ असे बोल असलेलं हे गाणं अत्यंत मजेशीर असून त्यामुळे चाहत्यांचं भरपूर मनोरंजन होत आहे. 'पक्या बोल' या गाण्याचे बोल विनोदी आणि मनोरंजक आहेत. विशेष म्हणजे या गाण्यासाठी पुन्हा एकदा सलील कुलकर्णी, संदीप खरे आणि अवधूत गुप्ते हे 'कल्लाकार' एकत्र आले आहेत. यापूर्वी यात्रिकूटाने गायलेल्या 'डीबाडी डीपांग' या गाण्यानेही प्रेक्षकांच्या मनात धुडगूस घातला होता. आता ‘पक्या बोल’ हे गाणंही ‘डीबाडी डीपांग’ प्रमाणेच चाहत्याच्या मनात उतरत आहे.

Subscribe to POPxoTV

Wedding चा शिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


डॉ.सलील कुलकर्णी  यांचा ‘Wedding चा शिनेमा’  हा चित्रपट लग्न या विषयावर आधारित असण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं टीझर प्रदर्शित करण्यात आलं. हा चित्रपट 12 एप्रिल 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या टीझरमधून चित्रपट नेमका कसा असणार हे जरी समजत नसलं तरी एका ग्रॅंड वेडिंगचं आमंत्रण यातून निर्मात्यांनी प्रेक्षकांना दिलं आहे. एव्हरेस्ट इंटरटेंन्टमेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती गेरूआ प्रॉडक्शन आणि पीइएसबी यांनी केली आहे. या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे एका प्रमूख भूमिकेत दिसणार आहे. शिवाय शिवाजी साटम, अलका कुबल, अश्विनी काळसेकर, भाऊ कदम, रिचा  इनामदार, प्रविण तरडे, सुनिल बर्वे, संकर्षण कऱ्हाडे, त्यागराज खाडीलकर, प्राजक्ता हनमगर, योगिनी पोफळे यांच्याही महत्वाच्या भूमिका असणार आहेत. महत्वाचं म्हणजे या चित्रपटातून शिवराज वायचळ, ऋचा इनामदार ही फ्रेश जोडीही झळकणार आहे. हा चित्रपट एक हलकं- फुलकं आणि निखळ मनोरंजन करणारा असेल असं या चित्रपटाच्या पहिल्या गाण्यातून वाटत आहे.

सलील नव्या भूमिकेसाठी सज्ज


अनेक वर्षे नवनवीन गाणी चाहत्यांना दिल्यावर डॉ. सलील कुलकर्णी प्रथमच ‘Wedding चा शिनेमा’ साठी आता दिग्दर्शकाची धूरा सांभाळत आहे. शिवाय या चित्रपटाची कथालेखन, पटकथा, संवाद, संगीत आणि दिर्ग्दशन अशा विविध जबाबदाऱ्या सलीलने लीलया सांभाळल्या आहेत. 'आयुष्यावर बोलू काही'च्या माध्यमातून सलील आणि संदीप ही जोडी चाहत्यांच्या मनामनात आजही अधिराज्य गाजवत आहे. आता सलीलच्या या नव्या भूमिकेचेही स्वागत करण्यासाठी प्रेक्षक नक्कीच सज्ज आहेत.


bol pakyan3


देवेन भोजानी ‘भाकरवडी’तून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला


सुबोध भावे–भार्गवी चिरमुले यांचे ‘काही क्षण प्रेमाचे’


आलिया भट ही करण जोहरच्या हातातील बाहुली - कंगना राणौत


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम