राखी सावंत आहे करोडपती, मेहनत करून मिळवली आहे इतकी धनसंपत्ती

राखी सावंत आहे करोडपती, मेहनत करून मिळवली आहे इतकी धनसंपत्ती

बॉलीवूडच्या ड्रामा क्वीन राखी सावंतचा आज वाढदिवस आहे. राखी तिच्या ड्रामा आणि कॉन्ट्रव्हर्सीमुळे सतत चर्चेत असते. काही दिवसांपासून तिने गुपचूप केलेलं लग्न, अज्ञात नवरा, हनिमूनला एकटीनेच काढलेले फोटो, प्रेग्ननंसी, बेबी अॅपवरून काढलेला लहान मुलीचा फोटो अशा अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत. मात्र यासोबतच राखी सावंत करोडपतीदेखील आहे. राखीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ या राखीच्या जीवनाचा हा रोमांचक प्रवास...

View this post on Instagram

Happy birthday to me

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

छोटी मोठी कामे करून राखी झाली करोडपती

राखी सावंत आजच्या घडीला करोडों रूपयांची मालकीण आहे. मात्र तिने मिळवलेला हा पैसा तिच्या मेहनतीचा आहे. राखीने ‘अग्निचक्र’ चित्रपटामधून तिच्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. त्यानंतर अनेक आयटम्स सॉंग्जमध्ये काम केलं. तिचे आयटम सॉंग्ज, पेहराव, प्लास्टिक सर्जरी आणि सतत होणारी कॉन्ट्रव्हर्सी यामुळे ती नेहमीच चर्चेत राहिली. टेलिव्हिजनवरील रिअॅलिटी शो ‘राखी का स्वयंवर’ खूपच गाजला होता. 2009 मध्ये या शोमधून राखीने स्वतःचं स्वयंवरही रचलं. लग्न ठरल्यानंतर साखरपुडा झाल्यावर तिने हे लग्न मोडलं होतं. ज्यामुळे ती नेहमीच लोकांच्या लक्षात राहिली. लहाणपण हालहपेष्टांमध्ये गेल्यामुळे तिने सतत पैसा कमवण्याचा आणि प्रसिद्धीत राहण्याचा प्रयत्न केला.

राखीने असे मिळवले हे पैसे

राखीचे वडील मुंबई पोलिस सेवेत होते तर आई घरकाम करत असे. घरातून अॅक्टिंगसाठी विरोध असतानाही तिने घरच्या विरोधाला न जुमानत या क्षेत्रात प्रवेश केला होता. राखीने नचबलिये 3, ये है जलवा, अरे दिवानो मुझे पहचानो, राखी का स्वयंवर अशा शोमध्ये काम केलं आहे. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तिचे आयटम सॉंग्ज लोकप्रिय झाले आहेत. अशीच छोटी मोठी कामं करत आज तिच्याकडे करोडो रूपयांची संपत्ती जमा झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राखीकडे मुंबईत दोन फ्लॅट, एक बंगला आणि करोडो रूपयांची संपत्ती आहे.  राखीकडे फोर्ड इंडेवर कार आहे. ही धनसंपत्ती मिळवण्यासाठी राखीने अनेक स्टेज परफॉर्मन्स दिले आहेत. या धनसंपत्तीसोबतच जीवाल जीव लावणारे मित्रमैत्रीणी ही तिने मिळवलेली अनमोल संपत्ती तिच्याजवळ आहे. 

राखीचं सिक्रेट वेडिंग

राखी सावंतला नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिवे्ह राहायचं असतं. ज्यासाठी ती सतत काहीना काहीतरी सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्यामधून ती तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत राहू शकेल. तिच्या सिक्रेट वेडिंग, कधीही मीडियासमोर न आलेला नवरा, हनिमून, प्रेग्नन्सी, मुलीचा फोटो हे आजही चर्चेचा विषय आहेत. राखी सावंतने केलेलं लग्न खोटं आहे की खरं याचा अजूनही खुलासा करण्यात आलेला नाही. राखीने गुपचूप लग्न केल्यावर सगळ्या मीडियाला राखी सावंतचं लग्न आणि तिचा नवरा या बद्दल फारच उत्सुकता लागली होती. राखीनेच दिलेल्या माहितीनुसार तिचा नवरा NRI असून तो परदेशात असल्याचं सांगण्यात आलं होतं. विशेष म्हणजे रितेशनेनं तिला रितसर लग्नाची मागणी वगैरे घातली होती. लग्नानंतर राखी रितेशला भेटण्यासाठी अमेरिकेला गेली. तिच्या हनीमूनसाठी ती तेथे गेल्याचं तिने त्यावेळी सांगितलं होते. राखी नुसतंच रितेशबद्दल बोलून थांबली नाही तर तिने कुटुंबातील अन्य सदस्यांचाही खुलासा केला होता. रितेशला दोन बहिणी आहेत. रितेशचे कुटुंब अगदी सर्वसामान्य असून सासू-सासरे प्रेमळ आणि काळजी घेणारे आहेत असं राखीने सांगितलं होतं. राखी कधी कधी रितेशसाठी स्वयंपाक करतानाही व्हिडिओ शेअर करते. काहिही असलं तरी तिने मिळवलेली धनसंपत्ती ही तिने मेहनत करून मिळवलेली आहे. राखीने काही गोष्टींवर नियंत्रण ठेवलं तर ती चाहत्यांच्या मनात कायम घर करून राहील.

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

अधिक वाचा -