ड्रामा क्वीन राखी सावंतने शेअर केल्या लहानपणीच्या आठवणी

ड्रामा क्वीन राखी सावंतने शेअर केल्या लहानपणीच्या आठवणी

बिग बॉस 14 नंतर राखी सावंत पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. तिच्या इंटरटेन्मेंटने सगळ्यांनाच तिच्याशी पुन्हा जोडलं. एरव्ही सोशल मीडियावर अगदी मनाला वाटेल ते व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करणारी राखी सावंत कधी कधी सगळ्यांना इमोशनल करेल असेही काही फोटो पोस्ट करते. नुकतीच राखी सावंतने एक पोस्ट तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. हे फोटो तिच्या ग्लॅमरस दुनियेतील नसून तिच्या गोड बालपणातील आहे. राखीने तिच्या बालपणातील काही फोटो शेअर करत तिचा आतापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. राखीचे हे लहानपणातील फोटो पाहून अनेकांनी तिच्या या फोटोतील निरागसतेवर लाईक्सचे प्रेम दिले आहे.

कोरोना असूनही बाहेर फिरल्यामुळे या अभिनेत्रीवर गुन्हा दाखल

राखी दिसते फारच गोड

राखीने या पोस्टमध्ये तिच्या लहानपणातील अनेक फोटो शेअर केले आहेत.  तिने तिच्या बालपणातील दोन गोंडस फोटो  शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच क्युट दिसत आहे. राखीला आता पाहिल्यानंतर ही इतकी गोंडस राखी सावंत असेल असा विश्वास दोन मिनिटांसाठी बसणार नाही. पण ही राखीच आहे. यातील पहिल्या फोटोमध्ये राखी अगदीच छोटं बाळ आहे. दुसऱ्या फोटोमध्ये तिने केशरी रंगाचा टी-शर्ट घातला आहे आणि तिला लांब केसांचा हेअर वीग लावण्यात आला आहे. तर त्यापुढील फोटोमध्ये ती तिच्या आईसोबत दिसत आहे. चालण्याच्या गाडीमध्ये एक ती उभी असून तिला या फोटोमध्ये ओळखणे फारच कठीण वाटत आहे. तर पुढील फोटोमध्ये तिने तिच्या अगदीच पौंगडावस्थेतील फोटो टाकला आहे. ज्यावेळी ती राखी सावंत म्हणून नावारुपाला आलेली नव्हती. पण त्यामध्ये ती थोडी स्टायलिश नक्कीच दिसत आहे.  आयटम गर्ल म्हणून नावारुपाला आलेली राखी सावंत ‘परदेसिया’ या गाण्यानंतर खूपच प्रसिद्ध झाली. त्या दरम्यानचा एक फोटो तिने पोस्ट केला आहे. या शिवाय तिने तिचे आताचे आणि काही जुने असे फोटो शेअर केले आहेत. 

लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या अभिनेत्रीला अटक

राखीच्या फोटोंवर लाईक्सचा पाऊस

राखी सावंत जे काही पोस्ट करते त्यावर कमेंटचा पाऊस होणार नाही असे मुळीच नाही. राखी जे काही पोस्ट करते त्यावर सतत कमेंट पडतात. काही कमेंट या वाईट आणि तिला ट्रोल करणाऱ्या असतात. पण ज्या दिवसापासून राखी बिग बॉसच्या घरातून बाहेर आली आहे. त्या दिवसापासून तिच्यावर प्रेमाचा वर्षावर होत आहे.. तिने तिचे हे बालपणातील फोटो शेअर केल्यानंतरही अनेकांनी तिच्या या फोटोला भरभरुन लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. त्यामुळे सगळीकडे सध्या फक्त राखी सावंतीच चर्चा जोरदार सुरु आहे. 

राखी सावंत करत असते सतत कॉमेडी

राखी सावंत आणि इंटरटेन्मेंट सतत सुरुच असते. तिने नुकतेच काही नवे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये तिने तिचा चेहरा वेगवेगळ्या नटींच्या वेगवेगळ्या गाण्यांवर लावला. कधी ती नागिणमधील श्रीदेवी झाली. तर कधी माय नेम इज खानमधील काजोल. तिचा हा अवतार पाहूनही लोकांना हसू आवरेना झाले. एकूणच काय राखी सावंतही अशीच आहे. सगळ्यांना कायम हसवणारी आणि कधी कधी अशीच इमोशल करणारी 

तुम्ही अद्याप राखीचा हे फोटो पाहिले नसतील तर नक्की पाहा आणि लाईक करा. 

नागिननंतर आता राखीला लागलं आहे नवं वेड, व्हिडिओ व्हायरल