दुर्गावतीच्या सेटवर भूमी पेडणेकरला मिळालं 'सरप्राईझ'

दुर्गावतीच्या सेटवर भूमी पेडणेकरला मिळालं 'सरप्राईझ'

भूमी पेडणेकर (Bhumi pednekar)बॉलीवूडची एक यशस्वी अभिनेत्री आहे. शिवाय सध्या तिचे एकापाठोपाठ अनेक चित्रपट हिट होत आहेत. यामागे भूमीची मेहनत आणि अभिनयकौशल्य नक्कीच आहे. सध्या भूमी तिच्या 'दुर्गावती' (Durgavati) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. भूमीला तिच्या यशासाठी एका पाठोपाठ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार मिळत आहेत. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी दुर्गावतीच्या सेटवर तिच्यासाठी एक सरप्राईझ प्लॅन करण्यात आलं. अचानक मिळालेल्या या सरप्राईझमुळे भूमीला फार आनंद झाला. 

भूमी पेडणेकर यशाच्या शिखरावर

भूमी पेडणेकरला तिच्या  यशासाठी एका पाठोपाठ अनेक चित्रपटपुरस्कार मिळत आहेत. या गोष्टीचा आनंद साजरा करण्यासाठी दुर्गावतीच्या टिमने भूमीसाठी एक सरप्राईझ पार्टी आयोजित केली होती. भूमीला ही बातमी कळू नये यासाठी खास काळजी घेण्यात आली. दिवसभराचं शूटिंग संपल्यावर लगेचच या पार्टीला सुरूवात करण्यात आली. या अचानक समोर आलेल्या या सरप्राईझमुळे भूमी भावूक झाली. चित्रपटाच्या टिमने भूमीसाठी खास केक आणला होता. केक कापल्यानंतर प्रत्येक टिम मेंबरने तिला खास शुभेच्छादेखील दिल्या. भूमीला मिळत असलेल्या यशासाठी तिच्या टिमने हे खास सरप्राईझ दिलं होतं. या सरप्राईझसाठी भूमीने तिच्या टिमचे आभार व्यक्त केले. 

दुर्गावतीची हिरो भूमी पेडणेकर

भूमीने आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. टॉयलेट एक प्रेमकथा, दम लगा के हैशा, सांड की आंख, बाला, पती-पत्नी और वोह, भूत पार्ट वन, शुभमंगल सावधान, सोनचिडिया, लस्ट स्टोरीज या चित्रपटांमधील भूमिकांसाठी भूमीच्या अभिनयाचं विशेष कौतुक करण्यात आलं. दम लगा के हैशा या चित्रपटात भूमि पेडणेकरने एका लठ्ठ बाईची भूमिका केली होती. ज्यासाठी तिने जवळजवळ 30 किलो वजन वाढवलं होतं. लठ्ठपणामुळे लग्नानंतर येणाऱ्या अडचणींवर आधारित हा चित्रपट होता. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर भूमीला तिचं वजन पुन्हा पूर्ववत केलं. करन जोहरच्या तख्तमध्येही तिची प्रमुख भूमिका असणार आहे. दुर्गावतीमध्ये भूमी पेडणेकर एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दुर्गावती या चित्रपटाचा विषय एका महाराणीच्या जीवनावर आधारित आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती अभिनेता अक्षय कुमार, भूषण कुमार, विक्रम मल्होत्रा करत आहेत. एका पोस्टरमधूनदेखील या चित्रपटाची हिरो भूमी पेडणेकर असणार असं जाहीर करण्यात आलं आहे. ज्यामुळे दुर्गावतीमध्ये तिची नेमकी काय भूमिका असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

काय आहे दुर्गावतीचं कथाानक

बॉलीवूडमध्ये सध्या पिरियॉडीक चित्रपटांचा ट्रेंड सुरु आहे. दुर्गावतीदेखील याच पठतीला एक चित्रपट आहे. दुर्गावती या गोंडावाच्या(पटना) महाराणी होत्या. एवढंच नाही तर  त्या लढवय्या होत्या. आजही त्यांच्या पराक्रमाच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या लढवय्येपणाची आणि पराक्रमाची आठवण करुन देण्यासाठीच या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. या चित्रपटात राणी दुर्गावतीच्या भूमिका भूमी पेडणेकर करत आहे. भूमीने अनेक चित्रपटांमधून निरनिरळ्या भूमिका केल्या आहेत. मात्र या प्रकारची भूमिका ती पहिल्यांदाच करत आहे. ज्यामुळे तिच्या अभिनयाबाबत भूमीकडून चाहत्यांच्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम 

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा -

एके काळी लोकप्रिय होत्या 'या' अभिनेत्री आता बॉलीवूडमधून झाल्या आहेत गायब

फुकरे'फेम जोडी लवकरच अडकणार लग्नबंधनात, समुद्रकिनाऱ्यावर करणार लग्न

'दबंग' सलमानचा हळवेपणा पुन्हा दिसला, पूरग्रस्त गाव घेतले दत्तक