सहा महिन्यातच बंद होणार एकता कपूरची 'नागिन 5', नवीन मालिकेची घोषणा

सहा महिन्यातच बंद होणार एकता कपूरची 'नागिन 5', नवीन मालिकेची घोषणा

एकता कपूरच्या 'नागिन' या मालिकेचे अनेक चाहते आहेत. ज्यामुळे नागिनचे एका पाठोपाठ एक असे प्रत्येक सीझन टेलिव्हिजनवर सुपरहिट ठरले. सुपरनॅचरल पॉवरवर आधारित मालिका प्रेक्षकांना नेहमीच आवडतात मात्र एकताच्या नागिनची बातच निराळी होती. मागच्या वर्षीपर्यंत तरी ही मालिका नेहमीच टॉप रेटिंगवर होती. एवढंच नाही लॉकडाऊननंतर लगेचच यासाठी एकताने घाईघाईत नागिनच्या पाचव्या सीझनलाही सुरूवात केली. मात्र आता हा सीझन सुरू होऊन सहा महिने होत नाहीत तोवर एकताने ही मालिका चक्क बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या वर्षी ऑगस्टपासून नागिन 5 ही मालिका प्रसारित होण्यास सुरूवात झाली होती. मात्र या वर्षी फेब्रुवारीत ही मालिका बंद होणार असून त्याजागी आता एकता कपूरची नवी मालिका सुरू होणार आहे. 

Instagram

नागिनच्या चाहत्यांना धक्का

एकताचा हा निर्णय ऐकून नागिनचे सर्व सीझनचे चाहते नक्कीच नाराज होणार आहेत. कारण हा शो टेलिव्हिजनवरील एक सुपरहिट शो मानला जात होता. ज्यांनी या मालिकेचे सर्व सीझन पाहिले असतील त्यांना नागिनचा पाचवा सीझन असा अचानक बंद झालेला नक्कीच आवडणार नाही. नागिनच्या पाचव्या सीझनमध्ये सुरभि चंदना, शरद मल्होत्रा आणि मोहित सेहगल मुख्य भूमिकेत आहेत. हा सीझन सुरू झाला तेव्हा त्यात हिना खान, धीरज धूपर आणि मोहित मल्होत्राच्या मुख्य भूमिका होत्या. ज्यामुळे या मालिकेला चांगलाच प्रतिसाद आणि टीआरपी मिळाला होता. मात्र हळू हळू जस जसं कथानक पुढे सरकू लागलं तस तसं मालिकेचा टीआरपी घसरू लागला. त्यामुळेच कदाचित एकताने ही मालिका आता बंद करण्याचा निर्णय घेतला असावा. आता पर्यंत एकता कपूरच्या या मालिकेत अदा खान, मौनी रॉय, सुरभि ज्योती, निया शर्मा, जैस्मिन भसीन, रश्मी देसाई, हिना खान या अभिनेत्रींनी नागिणची भूमिका साकारली होती. ज्या अभिनेत्रींना चाहत्यांकडून चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र पाचव्या भागाला आणि त्यातील कलाकारांना हवा तसा प्रतिसाद मिळू शकला नाही. ज्यामुळे एकताला आता हा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मालिकेचा शेवटचा भाग शूट झाला असून लवकरच प्रेक्षकांना याची कल्पना देत ही मालिका बंद केली जाणार आहे. 

Instagram

एकताच्या नव्या मालिकेला होणार सुरूवात

एकता या मालिकेच्या जागी आता व्हॅंपाअरवर आधारित एक मालिका सुरू करणार आहे. या मालिकेचं नाव आणि ती कधी सुरू होणार याबाबत अजूनही कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. शिवाय त्यामध्ये कोणकोणते कलाकार असणार याचीही चर्चा नाही. मात्र नागिन 5 फेब्रुवारीत बंद होऊन त्याजागी एकता जास्त टीआरपी असेल अशी नवी मालिका सुरू करणार हे मात्र नक्की. टीआरपी वाढवण्यासाठी एकता आता त्या जागी पुन्हा एक सुपरनॅचरल पॉवरचा आणि व्हॅंपाअरआधारित मालिका सुरू करणार आहे. मात्र ही मालिका नागिनप्रमाणेच सुपरहिट ठरणार का आणि तिचेही अनेक सीझन करावे लागणार का हे काळच सांगू शकेल.