#Naagin4 साठी एकता कपूर आहे परफेक्ट नागिनच्या शोधात

#Naagin4 साठी एकता कपूर आहे परफेक्ट नागिनच्या शोधात

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध नाव म्हणजे एकता कपूर. टीव्हीवर एकता कपूरच्या बॅनर बालाजी प्रॉडक्शन्सच्या अनेक मालिका गाजल्या आहेत. त्यापैकीच एक सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे नागिन. हिंदी मनोरंजन चॅनल्सपैकी एका चॅनलवर प्रदर्शित होणारी एकता कपूर (Ekta Kapoor) ची वार्षिक मालिका नागिन 4 (Naagin 4) ला सुरू होण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत. पण त्याआधीच एक मोठी बातमीसमोर येत आहे.

एकता कपूर (Ekta Kapoor) चा हा लोकप्रिय टीव्ही शो नागिन 4 (Naagin 4) आता काहीच दिवसात सुरू होऊही शकतो किंवा लांबणीवरही जाऊ शकतो. ही मालिका लांबणीवर जाण्याची काही कारण समोर येत आहेत. त्यातील एक कारण म्हणजे या मालिकेच्या मेकर्सना मिळत नाहीयं परफेक्ट नागिन.

View this post on Instagram

I don't know from where I had taken this screen shot...so I am not giving the credit because this pic is so old... N I really don't know the I'd of editor.. So please don't mind.. The editor who edit this is just osum.... I m telling u this is just marvelous... 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 @imouniroy @anitahassanandani #naagin3 🙏🙏😊😊🙏🙏 Om Namah shivaya 🙏 ⏺️🕉️⏺️🕉️⏺️🕉️⏺️🕉️⏺️🕉️⏺️🕉️⏺️ #Naagin3 #Naagin #naagin2 #naagin3🐍 #nagin #nagin3 #bepanahpyaarr ⏺️🕉️⏺️🕉️⏺️🕉️⏺️🕉️⏺️🕉️⏺️🕉️⏺️ #surbhijyoti #mouniroy #anitahassanandani ⏺️🕉️⏺️🕉️⏺️🕉️⏺️🕉️⏺️🕉️⏺️🕉️⏺️ @surbhijyoti @imouniroy @anitahassanandani ❤️⏺️❤️⏺️❤️⏺️❤️⏺️❤️⏺️❤️⏺️❤️ #adaakhan @adaakhann @rakshandak27 @sudhaachandran 🕉️❤️🕉️❤️🕉️❤️🕉️❤️🕉️❤️🕉️❤️🕉️ #bela #shravani #shivangi #shesha #Vish #shivanya #vishakha #naagmani ️🕉️⏺️🕉️⏺️🕉️⏺️🕉️⏺️🕉️⏺️🕉️⏺️🕉️ #behir #rivanya #shrahir #pearlvpuri #mahir #mahirsehgal #naagin3finale #naagrani #yhm #Shagun #Raghbirmalhotra ❤️⏺️❤️⏺️❤️⏺️❤️⏺️❤️⏺️❤️⏺️❤️ Don't Repost Till one Day 🙏🙏 No copyright infringements intended 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

A post shared by Naagin Returns (@naaginreturns) on

गेली तीन वर्षही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत टीआरपीचे नवे रेकॉर्डस सेट करत आहे.टीव्ही शोला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे आता निर्माती एकता कपूरला या टीव्ही शोच्या पुढच्या सिझन धमाकेदार सुरूवात करायची आहे आणि यासाठी तिला कोणतीही कमतरता ठेवायची नाही. पण यामध्ये एक अडचण निर्माण झाली आहे.सूत्रानुसार, मालिकेच्या आयकॉनिक नागिनच्या भूमिकेसाठी एकता कपूरला नव्या अभिनेत्रीला लाँच करायचं आहे. पण तिला अजूनही हवा तसा चेहरा मिळालेला नाही. जो मौनी रॉय किंवा सुरभी ज्योतीच्या लेव्हलला मॅच करेल. त्यामुळे या भूमिकेसाठी सध्या अनेक ऑडिशन्स सुरू आहेत. पण कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. 

नागिन हा एक सुपरनॅचरल टीव्ही शो असून याला बरंच फॅन फॉलोइंग आहे. या टीव्ही शोच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनची कमान टीव्ही आणि बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) ने सांभाळली होती. पण तिसऱ्या सिझनमध्ये अभिनेत्री सुरभी ज्योती (Surbhi Jyoti) ला कास्ट करण्यात आलं होतं. सुरभी ज्योतीने नागिनची  आयकॉनिक भूमिका चांगल्या पद्धतीने साकारली होती. यानंतर मेकर्सनी या टीव्ही शोच्या पुढच्या सिझनची घोषणा केली. या मालिकेबाबत मिळालेल्या माहितीनुसार अजून कोणत्याही ऑडिशन्समधील कलाकार एकता कपूरला इंप्रेस करण्यात यशस्वी झालेली नाही. त्यामुळेच आता हा टीव्ही शोची सुरूवात लांबणीवर पडणार की काय असा प्रश्न आहे. पण एकताची ही समस्या दूर होऊ शकते.

टीव्ही मालिका 'बहू हमारी रजनीकांत' मधून रजनीची भूमिका करून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रिद्धीमा पंडीत मात्र एकता कपूरच्या नागिन या मालिकेत काम करण्यासाठी उत्सुक आहे. नुकत्याच सुरू झालेल्या टीव्ही शो हैवानमध्ये ती एका इंटरेस्टींग भूमिकेत दिसत आहे. ही मालिकासुद्धा एकता कपूरचीच आहे. सूत्रानुसार रिद्धीमाला सुपरनॅचरल शोजमध्ये काम करण्याबाबत विचारलं असता ती म्हणाली की, मला संधी मिळाल्यास नागिन मालिकेत काम करायला आवडेल. अशा हिट फ्रॅचाईजीसोबत नाव जोडण्यास कोणत्याही कलाकाराला आवडेल.

आता एकताने तिच्या नव्या चेहऱ्याची मागणी पाठी टाकल्यास तिला रिद्धीमासारखा चेहरा नागिनसाठी मिळू शकतो. आता पाहूया एकताच्या या लोकप्रिय नागिन 4 साठी कोणत्या चेहऱ्याची निवड होते ते.

P.S : POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन. त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत. शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुूटदेखील आहे. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौंदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.