जितेंद्रच्या एका अटीमुळे मालिका क्वीन एकता कपूरने केलं नाही लग्न

जितेंद्रच्या एका अटीमुळे मालिका क्वीन एकता कपूरने केलं नाही लग्न

बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी अजूनही लग्न केलेले नाही. यामध्ये आवर्जून सलमान खानचे नाव घेतले जाते. पण आणखीही काही सेलिब्स आहेत ज्यांचे नाव या यादीमध्ये आहे. ते म्हणजे मालिका क्वीन एकता कपूर हिचे. बालाजी टेलिफिल्मचा डोलारा सांभाळणारी एकता कपूर अजूनही अविवाहीत आहे. तिला अनेकदा लग्न कधी करणार असा प्रश्न विचारल्यानंतर ती त्याचे उत्तर देण्याचे टाळते किंवा त्यावरुन काहीतरी विनोद करते. पण तिने लग्न न करण्यामागचे कारण स्वत: सांगितले आहे. जितेंद्रच्या एका अटीमुळेच एकता कपूर अजूनही अविवाहीत असल्याचे म्हटले जात आहे.


दिशा पटानीच्या हॉट फोटोबाबत काय वाटते तिच्या वडिलांना


जितेंद्र यांनी एकताला काय घातली होती अट


ekta kapoor jitendra


एकता कपूर हिचे लग्न न करण्यामागचे कारण आहेत जितेंद्र. जितेंद्र यांनी  एकताला लग्नासंदर्भात एक अट घातली होती. ते म्हणाले होते की, लग्न आणि काम या पैकी एकाची निवड तुला करावी लागेल. एकताने कामाला पंसती देत लग्नाचा विचार मनातून काढून टाकला आणि तिने कामात स्वत:ला वाहून घेतले.


मला लग्न करायचे नव्हते


एकताने एका मुलाखतीत लग्नाबाबत असे सांगितले की,माझ्या अनेक मित्रांची लग्न झाली आहेत. पण काहींची लग्न काहीच महिन्यात,वर्षात संपुष्टात आली आहे. आता ते सगळे एकटे आहेत.मी अनेकांचे घटस्फोट होताना पाहिले आहेत. त्यामुळे माझे आहे ते आयुष्य चांगले आहे आणि मी खूश आहे.


चुकीच्या बातमीमुळे करण वाहीवर आला बलात्काराचा आरोप


नुकतीच एकता झाली आई


mom ekta


एकताला लग्न करायचे नव्हते. पण तिला आई व्हायचे होते. सरोगसीच्या माध्यमातून तिने आई होण्याचा निर्णय घेतला. तिला सरोगसीच्या माध्यमातून मुलगा झाला आहे. एकताचा भाऊ अभिनेता तुषार कपूरही 2016 साली सरोगसीच्या माध्यमातून बाबा झाला. त्यालाही एक मुलगा असून त्याने त्याचे नाव लक्ष्य असे ठेवले आहे. हे दोघे भाऊ-बहीण सरोगसीच्या माध्यमातून आई-वडील झाले असून ते सिंगल आहेत आणि खूश आहेत.


एकता कपूरच्या करिअरची गाडी सुस्साट


एकता कपूर ही बालाजी टेलिफिल्म्सची सर्वेसर्वा असून तिने उत्तम  मालिका केल्या आहेत. क्योंकी सास भी कभी बहू थी पासून ते आताच्या नागिन 3 या मालिकेपर्यंत किंवा सध्या सुरु असलेल्या मालिका या अर्ध्यापेक्षा जास्त बालाजी टेलिफिल्म्सच्या आहेत. बालाजी टेलिफिल्मने केलेले चित्रपटही चांगले आहेत. आता तर बालाजीने ALTBalajiच्या अंतर्गत वेबसिरिज करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे एकता कपूरच्या करीअरची गाडी सुस्साट आहे असे म्हणायला हवे.


श्रद्धा कपूर खास व्यक्तीसोबत वेकेशनवर


एकताने ठेवला सलमान खानचा आदर्श


सलमान खान जिथे जाईल तिथे त्याला तू लग्न कधी करणार ?असा प्रश्न केला जातो. त्यावर तो कधीच बोलत नाही. एकदा एका कार्यक्रमात एकताला हा प्रश्न विचारल्यानंतर तिने सलमानचे लग्न झाल्यानंतर 3 ते 4 वर्षांनी मी लग्न करेन असे उत्तर दिले होते. त्यामुळे एकताने सलमान खानचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे असे म्हटले जायचे.


(फोटो सौजन्य- Instagram)