एकता कपूरने तिच्या चार महिन्याच्या बाळासाठी घेतला हा निर्णय

एकता कपूरने तिच्या चार महिन्याच्या बाळासाठी घेतला हा निर्णय

टेलीव्हिजन हिंदी मालिका माध्यमातील लोकप्रिय दिग्दर्शिका एकता कपूर सरोगसीच्या मदतीने 27 जानेवारीला आई झाली. त्यानंतर काही दिवसातच तिने ही बातमी सोशल मीडियावर जाहीर केली होती. आता तिच्या चार महिन्याच्या बाळासाठी एकताने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एकताच्या बाळाचं नाव रवी आहे. रवी चार महिन्यांचा झाला आहे. इतर आईप्रमाणे एकताला तिच्या मुलाबरोबर वेळ घालवण्याची ईच्छा आहे. मात्र ती एक वर्किंग वुमन असल्यामुळे सतत बाळासोबत राहणं तिला शक्य होत नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठीच तिने हा निर्णय घेतला आहे. एकताने तिच्या बाळासाठी ऑफिसमध्येच क्रेचचा सेटअप तयार केला आहे. जिथे तिचे बाळ आरामात आणि आनंदात बागडू शकतं. बाळासोबत वेळ घालवण्यासाठी हा निर्णय तिने फार आधीच घ्यायला हवा होता असं तिला वाटत आहे. कारण या क्रेच सेटअपमुळे ती जास्तीत जास्त तिच्या बाळासोबत राहू शकते. बाळासोबत आईचं बॉडिंग वाढण्यासाठी प्रत्येक आईने बाळाला जास्तीत जास्त वेळ देणं गरजेचं आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

First Mother’s Day as a mother naaaaah that was three years ago! #motheroftwo


A post shared by Erk❤️rek (@ektaravikapoor) on
रवीसाठी एकता झाली भावूक


काही दिवसांपूर्वी तिने तिच्या बाळासोबचा एक फोटो आणि भाननिक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने लिहीलं होतं की, मी माझ्या बाळासोबत शक्य तितका वेळ घालविण्याची ईच्छा आहे. मात्र यासाठी मला ऑफिसमधून लवकर घरी जावं लागतं. एकताच्या मते आता ती बऱ्याचदा तिच्या बाळासोबत ऑफिसमध्ये जाते. ज्यामुळे रवी तिच्या ऑफिस टीमसोबत मजेत खेळतो. जेव्हा एकचा एखाद्या मिटींगमध्ये बिझी असते तेव्हा एकताची टीम तिच्या बाळाची काळजी घेते, त्याच्यासोबत रवीचं खूप छान मनोरंजनदेखील होतं. रवी लहान असूनही तो एकताच्या ऑफिस टीमसोबत मैत्री झाली आहे.  रवी आतापासूनच ऑफिस टीमच्या लोकांना ओळखतो. एकता कपूरचा भाचा आणि तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य देखील सरोगसीच्या माध्यमातूनच जन्माला आहे. एकताचे रवी आणि लक्ष्यवर प्रंचड प्रेम आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Pls send ur love and blessings for lil ravie. ! JAI MATA DI JAI BALAJI


A post shared by Erk❤️rek (@ektaravikapoor) on
प्रत्येक ऑफिसमध्ये असायला हवं क्रेच


एकताच्या मते प्रत्येक ऑफिसमध्ये अशा प्रकारच्या क्रेच सेटअपची गरज असते. कारण प्रत्येक ऑफिसमध्ये अशा अनेक वर्किग वुमेन्स असतात ज्यांची मुलं त्यांच्यापासून दूर असतात. प्रत्येक आईला ती काम करत असतानादेखील तिचे मुल तिच्या जवळपास असावं असं वाटत असतं. ज्यामुळे ती शांतपणे तिचं काम करू शकते. बाळाची चिंता नसल्यामुळे तिच्या करिअरवर परिणाम होत नाही. यासाठीच रवी मोठा झाल्यावरदेखील एकता तिच्या ऑफिममध्ये क्रेच तसेच ठेवणार आहे. तिने हे यापूर्वीच असं करायला हवं होतं असं तिला वाटत आहे. मात्र आता उशीर होऊनही या निर्णयाबाबत तिला नक्कीच आनंद होत आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

My boys ! Two sons !!! #mysunandmoon


A post shared by Erk❤️rek (@ektaravikapoor) on
सीरियल क्वीन एकता कपूरकडे आला नवा पाहुणा


डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यासाठी बाळासोबत हसत खेळत करा 'हे' व्यायाम


असे बॉलीवूड सेलिब्रिटी ज्यांनी आई-वडील होण्यासाठी घेतला सरोगसीचा आधार


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम