धमालमस्ती करत ईशा देओलचं दुसरं 'बेबी शॉवर'

धमालमस्ती करत ईशा देओलचं दुसरं 'बेबी शॉवर'

बॉलीवूड अभिनेत्री ईशा देओल दुसऱ्यांदा ‘आई’ होणार आहे. काही महिन्यांपूर्वीच ईशाने सोशल मीडियावरुन तिच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती. ईशाने तिच्या इन्स्टा अकाऊंटवरुन राध्याचा एक फोटो शेअर केला होता. ज्यावर ‘आय अॅम बिईंग प्रमोटेड टू बिग सिस्टर’ असं लिहीलं होतं. नुकतंच ईशाच्या  दुसऱ्या बाळाचा बेबी शॉवर सेरिमनी अर्थात डोहाळेजेवणाचा कार्यक्रम झाला. ईशाला तिच्या कुटुंब आणि मित्रमंडळींनी ही सरप्राईझ बेबी शॉवर पार्टी दिली होती. ज्या कार्यक्रमात ईशा फारच आनंदी आणि खूश दिसली. तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणाचं तेज दिसून येत होतं. यावेळी ईशाने पीच कलरचा गाऊन घातला होता. पती भरत तख्तानी, मुलगी राध्या, बहिण अहाना आणि इतर मैत्रिणींसह ती पार्टी एजॉंय करत होती. बेबी शॉवर पार्टीत ईशाने फार धमालमस्ती केली. काही मजेशीर गेम्सदेखील बेबी शॉवर पार्टीसाठी ठेवण्यात आले होते. ईशाने या पार्टीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ईशा देओल आणि भरत तख्तानी याचं दुसरं बाळ


ईशा देओल आणि भरत तख्तानी  2012 मध्ये विवाहबद्ध झाले होते. लग्नानंतर पाच वर्षांनी या दोघांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांच्या पहिल्या मुलीचे नाव राध्या आहे. राध्या आता दोन वर्षांची आहे. हेमामालिनी कृष्णभक्त असल्याने ईशाने तिच्या मुलीचं नाव राध्या असं ठेवलं. ईशाने तिच्या पहिल्या डोहाळजेवणाचे फोटो आणि प्रेंगन्सीच्या सर्व बातम्या तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावरुन शेअर केल्या होत्या. या डोहाळजेवणात ईशाने लाल रंगाचा लेंहगा घातला होता. ईशाची बहीण अहानाने तेव्हा तिच्यासाठी सरप्राईज बेबी शॉवर पार्टी आयोजित केली होती.
या बेबी शॉवर पार्टीची थीम लव्हेंडर ठेवण्यात आली होती. कारण ईशाला लव्हेंडर रंग खूप आवडतो. या पार्टीसाठी ईशाने लव्हेंडर रंगाचा गाऊन घातला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. आता पुन्हा ईशा आणि भरत तख्तानी यांच्या घरी लवकरच बाळ येणार असल्याने त्यांच्या घरी आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

ईशा देओलचे चित्रपट


लग्नानंतर ईशाने चित्रपटातून काम करणं कमी केलं. यापूर्वी ईशाने ‘क्या दिल ने कहा’, ‘कुछ तो है’, ‘युवा’, ‘धूम’, ‘काल’, ‘नो एन्ट्री’, ‘टेल मी ओ खुदा’ या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच ईशाने तामिळ चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तिला ‘कोई मेरे दिल से पुछे’ या हिंदी चित्रपटासाठी उत्तम अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कारदेखील  मिळाला आहे.


Good news: कॉमेडी क्वीन भारती सिंहच्या घरी येणार नवा पाहुणा


गणेश गायतोंडे परत येतोय.... पाहिलात का Sacred Games 2 चा टीझर


‘कलंक’ च्या अपयशानंतर आदित्य रॉय कपूर दिसणार हटके रूपात


 


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम