इशा गुप्ताचे हॉट फोटोशूट, तूप खाऊन मेंटेन केली फिगर

इशा गुप्ताचे हॉट फोटोशूट, तूप खाऊन मेंटेन केली फिगर

बॉलीवूडमधील सुंदर अभिनेत्री इशा गुप्ता जी नेहमी सोशल मीडियावर आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. गेल्या महिन्यात तिने आपल्या इन्स्टाग्रामवरील पोस्ट डिलीट करून सगळ्यांनाच धक्का दिला होता. सोशल मीडियावर आपल्या बोल्डनेसने नेहमी धुमाकूळ घालणाऱ्या  इशा गुप्ताच्या मिलियन फॉलोअर्सना हे जाणून घ्यायचे होते की तिने सर्व फोटोज आणि व्हिडिओज का डिलीट केले? मात्र इशाने पुन्हा एकदा आपल्या स्टनिंग आणि सिझलिंग फोटोसह इन्स्टाग्रामवर धमाकेदार कमबॅक केले आहे आणि पुन्हा एकदा हॉट फोटोशूटचे फोटो पोस्ट करून आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. इशाचे हे फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहेत. इशाने आपली फिगर अप्रतिम मेंटेन ठेवली आहे. ती नेहमीच योगा करत असते आणि तिच्या या सर्व फोटोंमध्ये तिने अत्यंत मादक अदा दाखवल्या आहेत. 

अभिनेत्री इशा गुप्ताही चढणार लवकरच बोहल्यावर, नात्यात असल्याची कबुली

इशा गुप्ताचा सेक्सी लुक

इशाने आपल्या इन्स्टाग्रामवर सध्या पोस्ट केलेले फोटो हे अत्यंत सेक्सी असून तिचे हे फोटो जुन्या फोटोशूटमधीच आहेत. इशाने आपल्या अकाऊंटवर अतिशय मादक आणि सेक्सी फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने आपल्या शरीराचे कर्व्हज दाखवले आहेत. इतकंच नाही तर आपल्या या मेंटेन्ड फिगरचे गुपितदेखील तिने सांगितलं आहे. एका फोटोला कॅप्शन देताना इशाने म्हटले, ‘आईच्या हाताचे देशी तूप खाऊन मी हे फोटो पोस्ट करत आहे, Bye...’ इशाने अनेक फोटो पोस्ट केले असून यामध्ये लाल क्रॉप टॉप आणि व्हाईट बिकिनी बॉटममध्ये इशाने सेक्सी पोझ देत फोटो काढले आहेत. तर काही फोटो हो ब्लॅक अँड व्हाईट असून त्यातही इशा अतिशय सुंदर दिसत आहे. इशाने नेहमीच बोल्ड शूट केले असून चित्रपटातही तिने बोल्ड सीन दिले आहेत. इशाचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडला आहे. तर काही जणांनी मात्र तिला अशा फोटोशूटमुळे ट्रोलही केले आहे. ‘अशा तऱ्हेचे शूट करून तुला जर बॉलीवूडमध्ये काम मिळेल असं वाटत असेल तर त्याचं उत्तर नाही असं आहे’ अशा स्वरूपाच्या कमेंट्सही काही जणांनी तिच्या फोटोवर पोस्ट केल्या आहेत. मात्र इशाचा बोल्डनेस पाहता तिला या ट्रोलिंगने काहीही फरक पडेल असं वाटत नाही. कारण इशा नेहमीच आपल्या  मनाला जे हवं ते करत आली आहे. 

अजून एका अभिनेत्रीचे निधन, 29 व्या वर्षीच कॅन्सरमुळे गमावले प्राण

मॅन्युअलबरोबर नातं स्वीकारलं

View this post on Instagram

🖤

A post shared by Esha Gupta (@egupta) on

इशाने काही महिन्यांपूर्वीच आपला बॉयफ्रेंड मॅन्युअल कॅम्पोस गुलरबरोबर असणारं नातं स्वीकारून अधिकृतरित्या आपण त्याच्या प्रेमात असल्याचे स्पष्ट केले होते. सध्या दोघेही कोरोनामुळे वेगवेगळ्या ठिकाणी असले तरीही रोज व्हिडिओ कॉल एकमेकांची काळजी घेत असल्याचेही स्पष्ट केले होते. मॅन्युअल हा उद्योगपती असून आपल्यावर त्याचे खूपच प्रेम असल्याचेही तिने सांगितले. इशाने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर आपल्या बॉयफ्रेंडसह फोटो शेअर करत जे कॅप्शन लिहिले आणि त्यातून तिने आपण नात्यात असल्याचे स्पष्ट केले आहे. इशाने या फोटोला स्पॅनिश कॅप्शन दिली, ‘te amo mucho mi amor’ याच अर्थ ‘मी तुझ्यावर खूप प्रेम करते, माय लव्ह’ असे इशाने म्हटले. मात्र सध्या हा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर नाही. मॅन्युअल हा माबेल कॅपिटलचा सीईओ आणि मालक आहे. त्याने युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधून एमबीए केले असून लॉ अँड फायनान्सची बॅचलर डिग्रीही मिळवली आहे. तर इशाने आतापर्यंत बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र तिला म्हणावे तसे ग्लॅमर मिळाले नाही. पण तरीही इशा आपल्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते. इशा लवकरच अमिषा पटेलच्या ‘देसी मॅजिक’ या चित्रपटात दिसेल. तसंच ओटीटी प्लॅटफॉर्मवरही इशा ‘रिजेक्ट्स’ मधून आपले डिजीटल पदार्पण करत आहे. यामध्ये ती एका पोलीस अधिकाऱ्याच्या  भूमिकेत आहे.  

KKK10: मराठमोळा धर्मेश ठरला पहिला फायनलिस्ट, तर तेजस्वी करतेय कमाल