ये Fasttag है क्या…. जाणून घ्या या विषयी सर्वकाही

ये  Fasttag है क्या…. जाणून घ्या या विषयी सर्वकाही

तुम्ही जर कोणत्याही ऑनलाईन पेमेंटच्या अॅपवर असाल तर तुम्हाला सातत्याने एक गोष्ट कायम दिसत असेल ती म्हणजे ‘Fasttag’. रोज गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांना या बद्दल माहीत असणे स्वाभाविक आहे. पण जर तुम्हाला या ‘Fasttag’. बद्दल काहीही माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल अगदी सोप्या पद्धतीने हे सांगणार आहोत. कारण जर तुम्ही अनेक ठिकाणी या बद्दल वाचले असेल आणि तुम्हाला या विषयी काहीही माहीत नसेल तर मग तुम्ही वाहतुकीसंदर्भातील एक मोठी गोष्ट मिस करत आहात. असे होऊ नये म्हणूनच आज जाणून घेऊया या विषयी सगळं काही

कमालच! 2 वर्षांची चिमुकली गातेय लतादीदींचं गाणं, सोशल मीडियावर धुमाकूळ

आता टोलवर थांबण्याची कटकट नाही

Instagram

जे मुंबई- पुणे किंवा टोल लागत असेल अशा ठिकाणी रोज प्रवास करतात त्यांना माहीत आहे की, टोल भरण्यासाठी किती वेळ टोल नाक्यावर उभे राहावे लागते.  पण हा ‘Fasttag’ लावल्यानंतर तुमचा प्रवास एकदम झटपट होणार आहे. ‘Fasttag’ घेतल्यानंतर तुम्हाला तो तुमच्या गाडीला लावायचा आहे. ज्या प्रमाणे तुम्ही ओला पोस्टपेडचा उपयोग करता किंवा ओला मनी वॉलेटचा  उपयोग करता अगदी तसेच असणार आहे. तुम्ही टोल नाक्यावर गेल्यानंतर तुमच्या गाडीच्या काचेला लावलेला फास्ट टॅग स्कॅन होणार आणि तुमचे पैसे आपोआप त्यातून आकारले जाणार आहेत.त्यामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही. उलट तुमचे काम पटकन होणार आहे.

कसे कराल रजिस्ट्रेशन

जर तुम्ही पेटीअम , गुगल पे किंवा फोन पे या सारख्या अॅपवर असाल तर तुम्हाला तुमच्या होम स्क्रिनवर अगदी हमखास ‘Fasttag’ दिसून येईल. तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ‘Fasttag’ कसे वापरायचे आणि कसे रिचार्ज करता येईल याची माहिती दिसेल. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ‘Fasttag’ विकत घेऊ शकता. तुम्ही टोल भरल्यानंतर तुम्हाला प्रत्येकवेळी त्याची रिसिप्ट ऑनलाईन येत राहील. हा टॅग घेताना तुम्हाला तुमच्या गाडीची सगळी माहिती यामध्ये मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला ती माहिती भरणेही अनिवार्य आहे. 

15 डिसेंबरपासून अनिवार्य

Instagram

आता जर तुमची गाडी असेल आणि तुमचा प्रवास लांबचा असेल तर मग तुम्ही आताच हे ‘Fasttag’ घ्यायला हवे. कारण 15 तारखेपासून ते अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही आताच हे विकत घ्या. म्हणजे तुम्हाला प्रवासात कोणताही अडथळा येणार नाही. त्यामुळे आताच तुम्ही ‘Fasttag’ विकत घ्या.

ऑनलाईन करु शकता पेमेंट

आता तुम्हाला याचे ऑनलाईन पेमेंटसुद्धा करता येईल तुम्हाला अगदी एका क्लिकवर ही गोष्ट करता येईल. जर तुम्ही अॅप फ्रेंडली नसाल तर तुम्हाला बँकांमध्ये जाऊनही हे पेमेंट करता येईल. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पेमेंट केले तरी काहीच हरकत नाही.

मेकअप किटमधील concealer चा असा करतात उपयोग

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.