ADVERTISEMENT
home / Festival
या वर्षी या दिवसापासून सुरु होतेय चैत्र नवरात्र

या वर्षी या दिवसापासून सुरु होतेय चैत्र नवरात्र

नवरात्र म्हटली की, आपल्याला एकच नवरात्र सर्वसाधारणपणे आठवत असेल की, चैत्र महिन्यातही नवरात्र येते तिला ‘चैत्र नवरात्र’ असे म्हटले जाते. चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच चैत्र नवरात्र. हिंदू धर्मामध्ये या दिवसाला फार महत्व आहे. ही नवरात्र फार वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. हिंदू धर्मामध्ये वर्षातून चार वेळा नवरात्र साजरी केली जाते. चारी नवरात्रीचे वेगळेपण हे फार वेगळे आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी ही नवरात्र केली जाते. पुराणांमध्ये या नवरात्रीचा उल्लेख हा आत्मशुध्दी आणि मुक्तीचा आधार असा केला जातो. तर शारदीय नवरात्रीला वैभव आणि भोगप्रदान मानले जाते.

चैत्र नवरात्रीचे महत्त्व आणि पूजा विधी, जाणून घ्या घटस्थापनेचा शुभमुहूर्त

चैत्र नवरात्र म्हणजे काय?

चैत्र नवरात्र

Instagram

चैत्र नवरात्र साजरी करण्यामागे सगळ्यांच्या वेगवेगळ्या श्रद्धा आहेत. पण सर्वसाधारणपणे चैत्र नवरात्रीत सूर्याचे राशी परिवर्तन होते आणि याच दरम्यान सूर्य  हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो. चैत्र नवरात्रीपासून नववर्ष पंचांगाची गणना सुरू होते. सूर्याच्या मेष राशीत प्रवेश इतर सर्व राशींवर प्रभाव टाकते. म्हणूनच हा कालावधी फार शुभ मानला जातो. या दरम्यान कुठलेही शुभ कार्य  कोणताही मुहुर्त न काढता केले तरी चालू शकते. असे म्हणतात की, या काळात आदिशक्ती देवी आपली माया पांघरुन पृथ्वीवर असते. त्यामुळे सगळे दिवस हे शुभ असतात.

ADVERTISEMENT

यंदा चैत्र नवरात्री कधी आहे ?

चैत्र नवरात्रीविषयी जर तुम्ही पहिल्यांदाच ऐकत किंवा वाचत असाल तर यंदा ही नवरात्र 13 एप्रिल रोजी सुरु होणार आहे. या नवरात्रीची माहिती तुम्हाला असली पाहिजे. 13 एप्रिलपासून सलग 9 दिवस तुम्ही ती साजरी करु शकता. इतर नवरात्रीप्रमाणे या नवरात्रीतही देवीची पूजा केली जाते. पण या वेळी प्रत्यक्ष मूर्तीचे  आणणे गरजेचे नसते. तुम्ही घरातही एखाद्या फोटोची स्थापना करुन घटस्थापना करु शकता. या नवरात्रीत देवीच्या नऊ वेगवेगळ्या रुपाची पूजा केली जाते. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीच्या रुपाची पूजा केली जाते हेच देवीचे घटस्थापना करतानाचे रुप असते. तुम्ही अगदी तुमच्यापद्धतीने मातेचे पूजन करु शकता. यंदा नवरात्रीची सांगता ही 22 एप्रिल रोजी होणार आहे. 

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, मित्रपरिवासाठी खास संदेश (Navratri Wishes In Marathi)

असे करा व्रत

बऱ्याच जणांना ही नवरात्र करायला फार आवडते. या नऊ दिवसात जर तुम्हाला काही वेगळे करायचे असेल तर तुम्ही मनातून वाईट विचार काढून देवीची मनोभावे पूजा करा. व्रत करताना अनेक नियम सांगितले जातात. पण प्रत्येकाच हे सगळ्या नियमांचे पालन करणे शक्य  नसेल तरी ठीक आहे तुम्ही जास्तीत जास्त या काळात सकारात्मक राहा. सात्विक खा, देवीची पूजा करा.  म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल. 

  • अखंड ज्योत लावा. त्यामुळे घरात सकारात्मक उर्जा कायम राहील. 
  • या दिवशी हलका आणि चांगला आहारा म्हणजे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल. 
  • जर या काळात तुम्हाला काही चांगले वाचायचे असेल तर चांगल्या गोष्टीचे पठण करा. म्हणजे तुम्हाला नक्कीच बरे वाटेल. 
  • वातावरण बदलाचा हा काळ असल्यामुळे शरीर कमजोर झालेले असते. जर तुम्ही मन शांत करुन मन:शांती दिली तर तुम्हाला त्याचा आनंद अधिक मिळेल. 

    आता यंदाची चैत्र नवरात्र नक्कीच साजरी करा.

    नवरात्रीसाठी खास उपवासाचे पदार्थ, यावर्षी चाखा वेगळी चव
07 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT