अंकिताशी लग्न करण्याआधी मिलिंद सोमणच्या आयुष्यात होत्या या हॉट अभिनेत्री

अंकिताशी लग्न करण्याआधी मिलिंद सोमणच्या आयुष्यात होत्या या हॉट अभिनेत्री

मिलिंद सोमण हा अजूनही कितीतरी मुलींचा हार्टथ्रोब आहे. त्याचं व्यक्तिमत्वच इतकं भारावून टाकणारं आहे की, कोणीही त्याच्या प्रेमात पडेल. वयाच्या 54 व्या वर्षीही मिलिंदचा फिटनेस अप्रतिम आहे. मिलिंदने अंकिता कोनवरशी लग्न केल्यानंतरही अनेक तरूणींनी ‘तू आमचं मन तोडलंस’ असे मेसेज सोशल मीडियावर केले होते.  मात्र मिलिंदच्या आयुष्यात आलेली अंकिता ही पहिली मुलगी नक्कीच नाही. तिच्या आधी मिलिंद सोमणचं पहिलं लग्न होऊन घटस्फोट झाला होता. मात्र त्याआधीही मिलिंदचं आयुष्य हे अगदी तरूणपासूनच ‘हॉट आणि हॅपनिंग’ राहिलं आहे. मिलिंदने अंकिताशी लग्न केलं, पण अंकिता त्याच्या वयाच्या अर्ध्या वयाची आहे. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली होती. मात्र मिलिंदने आतापर्यंत इतके निर्णय आयुष्यात घेतले त्यात कधीही कोणा दुसऱ्याचा विचार केला नाही. मग त्याचे न्यूड फोटोशूट असो अथवा त्याचे अफेअर्स. मिलिंद सोमणच्या आयुष्यात नक्की कोणकोणत्या हॉट अभिनेत्री होत्या हे आपण जाणून घेऊया. 

1. मधू सप्रे

मिलिंद सोमणचं सर्वात पहिलं आणि गाजलेलं अफेअर म्हणजे मधू सप्रे. मिस युनिव्हर्स, 1992 ची दुसरी रनर अप असणारी मधू आणि मिंलिंद यांच्या नात्याला तेव्हापासूनच सुरूवात झाली आणि त्याकाळी हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांनी अनेक प्रोजेक्टमध्ये एकत्र कामही केले. दोघांनी एका फोटोशूटसाठी नेकेड पोझ दिली होती आणि त्यावेळी हे प्रकरण खूपच गाजलं होतं. 1995 मध्ये मात्र हे दोघेही वेगळे झाले आणि त्याचं कारण कोणालाच कळू शकलं नाही. 

मराठमोळ्या ‘राधाकृष्ण’ सुमेध मुदगरलकरचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल अवाक

2. शहाना गोस्वामी

यानंतर 2010 मध्ये मिलिंदने शहाना गोस्वामीला डेट करायला सुरूवात केली. 2009 मध्ये त्याचे फ्रेंच अभिनेत्रीसह लग्न तुटल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने आयुष्याला सुरुवात करत शहानाबरोबर आपण प्रेमात असल्याचे कबूल केले होते. बऱ्याच कार्यक्रमांना ही जोडी एकत्र दिसायची. मात्र शहानाबरोबर त्याचे नाते 3 वर्ष टिकू शकले. त्यानंतर ते दोघेही वेगळे झाले. त्यानंतर शहाना गोस्वामी पुन्हा दिसली नाही. 

श्रीदेवीच्या मुलाखतीदरम्यान पडला होता खूशी कपूरला ओरडा

3. दिपानीता शर्मा

View this post on Instagram

#deepanitasharma #instagram #bollywood #modeling

A post shared by supermodels world (@super_models_world) on

याबद्दल तसं तर अधिकृत घोषणा कुठेच झाली नव्हती आणि मिलिंद सोमण आणि दिपानीता शर्मा दोघांनीही कधीही हे मान्यदेखील केले नाही. पण 2012 च्या दरम्यान प्रदर्शित झालेल्या जोडी ब्रेकर्स या चित्रपटातून या दोघांची तुफान केमिस्ट्री दिसून आली होती. त्याशिवाय हे दोघेही लिव्ह इन मध्ये राहात होते असंही म्हटलं जातं. पण त्यांच्यासोबत त्यावेळी बिपाशा बासूदेखील राहात होती असं सांगण्यात येतं. मात्र याबद्दल कुठेच अधिकृत कधी कळून आले नाही. 

4. गुल पनाग

मिलिंद आणि गुल पनाग हेदेखील नात्यात असल्याचे सांगण्यात येते. मात्र मिलिंदने यावर आमचे केवळ व्यावसायिक संबंध आहेत असे स्पष्ट केले होते. पण गुल आणि मिलिंद अनेक कार्यक्रमांना त्यावेळी एकत्रही दिसायचे आणि बऱ्याच प्रोजेक्टवर दोघे एकत्र काम करत होते. त्यामुळे बॉलीवूडमध्ये आतली बातमी देणारे त्यावेळी हे ‘ओपन सिक्रेट’ आहे असं म्हणायचे. 

या कारणामुळे तोडावा लागणार आहे ' गंगुबाई काठियावाडी'चा सेट

5. मेलिन जंपनॉई

View this post on Instagram

#mylenejampanoi

A post shared by Gemini Portfolio (@geminiportfolio) on

व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्या सेटवर मिलिंद आणि फ्रेंच अभिनेत्री मेलिन जंपनॉई यांची भेट झाली. त्यानंतर प्रेमात असलेल्या दोघांनी 2006 मध्ये गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये लग्न  केलं. पण दोघे जास्त काळ एकत्र राहिले नाहीत. काही कारणांमुळे मिलिंद आणि मेलिन 2009 मध्ये घटस्फोट घेऊन वेगळे झाले.