बिग बींच्या फॅशन स्टेटमेंटमागील मराठमोळा चेहरा

बिग बींच्या फॅशन स्टेटमेंटमागील मराठमोळा चेहरा

'देवियों और सज्जनों' असं म्हणत पुन्हा एकदा बिग बींचा खास रिएलिटी शो KBC 11 आपल्या भेटीला आला आहे. अमिताभ बच्चन त्यांच्या आयकॉनिक स्टाईलमध्ये जसं प्रेक्षकांना संबोधित करतात. तशीच ओळखली जाते त्यांची अनोखी स्टाईलही. जी प्रत्येक केबीसी सिझनमध्ये काही ना काही वेगळी असते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल बिग बींची स्टायलिस्ट आहे मराठी मुलगी प्रिया पाटील.  

बिग बींची फॅशन ठरवणारी प्रिया पाटील

बिग बींच्या प्रत्येक क्लासिक सूटपासून ते ब्लेजर्स आणि प्रिटेंज टाईजवर तिने अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या हटके लुक्समागे आहे त्यांची स्टायलिस्ट असलेली प्रिया पाटील. यंदाच्या केबीसी सिझनसाठीही अमिताभ यांचं प्रियानेच स्टाईलिंग केलं आहे. प्रिया गेली 7 वर्ष कौन बनेगा करोडपतीशी निगडीत आहे. खरंतर बिग बींसाठी खास 10 स्टायलिस्टची टीम आहे जे त्यांचे लुक्स परफेक्ट बनवण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतात. पण गेल्या वर्षीपासून प्रिया त्यांना पर्सनलीसुद्धा स्टाईल करत आहे. हे खरंच कौतुकास्पद आहे.

बिग बींच्या सूटसाठी इटलीचं कापड

यंदाच्या सिझनसाठी अमिताभ बच्चन यांच्या सूट्सचं कापड खास इटलीहून मागवण्यात आलं आहे. ज्याची क्वालिटी खूपच चांगली असतं. अमिताभ यांच्या सूट्ससाठी सर्वोत्तम मटेरिलयल निवडण्याकडे प्रियाचा कल असतो. शो सुरू होण्याआधी बच्चन साहेबांना एक स्टाईल गाईड दाखवण्यात येतं. ज्यावर मग ते आपली कमेंट देतात. जर त्यांना आवडलं तरच ते सूट्स शिवण्यासाठी फायनल केले जातात. यंदाच्या 11 व्या सिझनमध्ये प्रिया बिग बींच्या टाय बांधणाच्या स्टाईलमध्ये प्रयोक करणार आहे. तसंच या सिझनमध्ये बिग बी थ्री-पीस सूटमध्ये दिसणार आहेत. ज्याची पद्धत वेगळी असणार आहे. कारण त्यांच्या टायसाठी एल्ड्रीज किंवा प्रेट नॉटचा वापर करण्यात येणार आहे.

बटणं मागवली जातात विविध देशातून

फक्त कापडच नाहीतर बिग बींच्या कोट्ससाठी विविध देशातून बटणसुद्धा मागवली जातात. ज्यामध्ये इटली, टर्की, जपान आणि कोरियाचा समावेश आहे. ही बटन्स खास स्पेशल डिझायनरकडून बनवून घेतली जातात. प्रत्येक गोष्ट बारकाईने केली जाते. कारण बिग बींच्या या शोचं शूटींग बराच वेळ चालतं. त्यामुळे त्यांच्या कंफर्टकडे लक्ष दिलं जातं. 

बिग बींना काय आवडतं?

बिग बींना आवडतो क्लासिक लुक. तसंच बिग बींना आवडतात गडद रंग. स्टाईलच्या बाबतीतही ते गोष्टी साध्या आणि सरळ लुकलाच पसंती देतात.

प्रियाचा बिग बींना स्टाईल करण्याचा अनुभव

एका मुलाखतीत प्रियाने सांगितलं होतं की, माझी डिझाईन्स बिग बींना स्टाईलिश दाखवत नाहीत तर उलट अमिताभजी माझ्या डिझाईन्सना चांगल बनवतात. ते जे घालतात ते स्टाईल स्टेटमेंट बनून जातं. तसंच तिने हेही सांगितलं होतं की, बिग बी त्यांच्या स्टाईलबाबत स्वतः अनेक पर्याय सुचवतात आणि इतरांनी सुचवलेल्या गोष्टीही ऐकतात.

मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजना स्टाईल करते प्रिया

अमिताभ बच्चन यांच्याशिवाय अभिनेत्री किरण खेर यांचं स्टाईलिंगसुद्धा प्रियाने केलं आहे. आता तुम्हाला कळलं असेलच की, किरण खेर यांच्या सुंदर साड्या आणि ज्वेलरीमागे होता एक मराठी चेहरा. त्यामुळेच त्यांनी घातलेल्या पैठण्याही अगदी ऑन पॉईंट असायच्या. तसंच विविध रिएलिटी शोजसाठीही प्रियाने स्टाईलिस्ट म्हणून काम केलंय. 

'मराठी पाऊल पडते पुढे' या उक्तीनुसार यशाच्या पायऱ्या चढणाऱ्या प्रिया पाटीलला #POPxo मराठीकडून खूप खूप शुभेच्छा. 

हेही वाचा -

सणासुदीसाठी आले तेजाज्ञाचे ‘दागिना कलेक्शन’

ग्लॅमरस आणि स्टायलिश कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा ‘फॅशन फंडा’

मुंबईत आवर्जून भेट द्यायला हवी अशा फॅशन स्ट्रीट्स