शाहरूखला 'जाडा' म्हटल्याने आर्यन खानने मारले होते एका मुलीला

शाहरूखला 'जाडा' म्हटल्याने आर्यन खानने मारले होते एका मुलीला

शाहरूख खान जितका प्रसिद्ध आहे तितकीच त्याची मुलंही प्रसिद्ध आहेत. किंबहुना आर्यन, सुहाना आणि अबरामला जास्त फॉलो केले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का? शाहरूखचा मुलगा आर्यन खानने एका मुलीला मारले होते. त्याचे कारण शाहरूखने करण जोहरच्या एका शो मध्ये सांगितले होते. आर्यनमुळेच आपण आपल्या  तब्बेतीकडे लक्ष देऊन वर्कआऊट करण्याचा निर्णय घेतल्याचेही शाहरूखने सांगितले होते. शाहरूखने सांगितलेला हा किस्सा पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. शाहरूखचे आपल्या मुलांवरील प्रेम तर जगजाहीर आहे. पण त्याची मुलंंही त्याच्यावर तितकंच प्रेम करतात. त्याचंं हे उत्तम उदाहरण आहे. 

अग्गबाई सासूबाई' फेम आसावरी खऱ्या आयुष्यातदेखील आहे सुगरण

आर्यन खानने 9 वर्षांचा असताना मारले होते मैत्रिणीला

आपले वडील जाड आहेत यामुळे आर्यनला खूपच त्रास झाला होता. याच गोष्टीमुळे त्याने आपल्या मैत्रिणीला मारल्याचा किस्सा घडल्याचे शाहरूखने सांगितले. आर्यन तेव्हा फक्त 9 वर्षांचा होता. सुपरस्टार शाहरूखने हा किस्सा सांगितला होता, ‘माझ्या मुलाला वाटले मी जाडा आहे. त्याने त्यासाठी एका मुलीला मारले. पहिले त्या मुलीने मला शिवी दिली. पण त्यावेळी आर्यन शांत राहिला तो  काहीही बोलला नाही. त्यानंतर ती म्हणाली की, कौन बनेगा करोडपतीमध्ये तुझे वडील खूप खराब दिसतात पण त्यावेळीही त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि त्याने रागावर नियंत्रण ठेवले. पण जेव्हा शेवटी ती म्हणाली की, तुझे वडील जाडे आहेत, तेव्हा मात्र त्याने तिला लाथ मारली.’ यानंतर पुढे शाहरूख म्हणाला, ‘मी त्याच्यावर खूप रागावलो त्यावर त्याने मला सांगितले की, तिचा काहीच दोषच नाही. दोष तुमचा आहे. तुम्ही जाडे का आहात? तुम्ही अजिबात खराब दिसत नाही. तुम्ही केबीसीमध्ये सुंदरच दिसता. तुम्ही तिने दिलेल्या शिवीप्रमाणे नाहीत, तुम्ही अतिशय चांगले वडील आहात पण तुम्ही जाडे आहात, बाबा.’ त्याचे हे उत्तर ऐकून शाहरूखने आयुष्यात वर्कआऊट करायला सुरूवात केली आणि त्यानंतर ओम शांती ओमसाठी आपली टोन्ड बॉडी बनवली असेही शाहरूखने सांगितले. शाहरूख नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेताना आणि त्यांचे मन जपताना दिसून  येतो. कितीही कामात असला तरीही आजपर्यंत शाहरूखने आपल्या मुलांसाठी शाळेत त्यांच्या कार्यक्रमांना जाणं कधीही चुकवलेले नाही. 

अभिनेत्री इशा गुप्ताही चढणार लवकरच बोहल्यावर, नात्यात असल्याची कबुली

शाहरूख सध्या लॉकडाऊनमध्ये करतोय मदत

शाहरूखने झिरो या चित्रपटात शेवटचे काम केले होते. मात्र तो त्याच्या अनेक बिझनेसमध्ये सध्या लक्ष घालत आहे. त्याशिवाय शाहरूखने सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांची मदत केली आहे. त्याने 25 हजार पीपीईदेखील महाराष्ट्रासाठी पुरवले. त्याशिवाय त्याने आपले चार मजली ऑफिस क्वारंटाईन केंद्र म्हणून दिले आहे. त्यामुळे अगदी आरोग्य मंत्र्यांनीही त्याचे आभार मानले होते. शाहरूख नेहमीच आपली सामाजिक बांधिलकीही जपताना दिसून येतो. सध्या शाहरूख कोणत्याही चित्रपटासाठी काम करत नसला तरीही लवकरच त्याला मोठ्या पडद्यावर पुन्हा बघता येईल अशी आशा त्याची चाहते करत आहेत. त्याशिवाय शाहरूखची मुलगी सुहानाही बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. सध्या त्यासाठीच ती तयारी करत असून शाहरूखचाही तिला पाठिंंबा असल्याचे म्हटले जाते. ती नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. 

मराठी सेलेब्सना क्वारंटाइनमध्येही फिट ठेवणारी जोडी