ADVERTISEMENT
home / मनोरंजन
बालकलाकार ज्या आता दिसतात ‘ग्लॅमरस’, बघा ओळखता येतं का

बालकलाकार ज्या आता दिसतात ‘ग्लॅमरस’, बघा ओळखता येतं का

टीव्ही मालिकांमधील बालकलाकारांच्या भूमिकांना अतिशय महत्त्व असतं. काही मालिका मुलांना केंद्रस्थानी ठेऊन बनवण्यात येतात. यापैकी काही मालिकांमधील कलाकार हे प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहातात. काही वेळा तर या मुलांच्या व्यक्तीरेखा इतक्या प्रसिद्ध होतात की, त्या मुलांना बघण्यासाठी प्रेक्षक टीव्हीसमोर बसतात. असे काही बालकलाकार आता मोठ्या झाल्या असून अतिशय ग्लॅमरस दिसतात. टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या या बालकलाकार आताही काही मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका करत आहेत तर त्यापैकी काही या मोठ्या पडद्याकडे वळल्या आहेत. बघूया कोण आहेत या बालकलाकार ज्या आता दिसतात ग्लॅमरस.

एहसास चन्ना

Instagram

“कसम से” आणि “देवों के देव- महादेव” या मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना जिंकून घेतलेल्या एहसासने चित्रपटांमध्येही बालकलाकाराची भूमिका केली आहे. लहानपणी बऱ्याच चित्रपटात एहसासने मुलांची भूमिका केली होती. तिने “कभी अलविदा न कहना” चित्रपटात शाहरुख खानच्या मुलाची तर  “वास्तुशास्त्र” आणि “माय फ्रेंड गणेशा” या चित्रपटांमध्येही मुलाची भूमिका केली होती. पण एहसास आता मोठी झाली असून युट्यूब व्हिडिओज आणि वेबसिरीजमध्ये काम करताना दिसते. तिचा हा हॉट आणि ग्लॅमरस अवतारही तिच्या चाहत्यांना आवडत आहे. 

ADVERTISEMENT

श्रिया शर्मा

Instagram

“कसौटी ज़िंदगी की” या मालिकेतील छोटी स्नेहा तर तुमच्या सर्वांच्या लक्षात असेलच. ही भूमिका साकारली होती श्रिया शर्माने. तसंच श्रियाने बालकलाकार म्हणून “लागा चुनरी में दाग”, “थोड़ा प्यार थोड़ा मॅजिक” आणि “चिल्लर पार्टी” यासारख्या चित्रपटांमधूनही काम केलं आहे. श्रिया आता 21 वर्षांची झाली असून सध्या श्रिया तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. दक्षिण फिल्म इंडस्ट्रीमध्ये श्रियाने नाव कमावलं आहे. 

अवनीत कौर

ADVERTISEMENT

Instagram

डान्स रियलिटी शो “डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर” मध्ये स्पर्धक म्हणून पहिल्यांदा अवनीत कौर दिसली होती. पण आता अवनीत टीव्ही इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध नाव म्हणून ओळखली जाते. अवनीतने राणी मुखर्जीबरोबर चित्रपट “मर्दानी” मध्येही काम केलं आहे. 17 वर्षांची अवनीत आता खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. सध्या अवनीत टीव्हीवरील “अलाद्दीन” या मालिकेमध्ये राजकुमारी जास्मिनची भूमिका साकारत आहे. 

पुन्हा एकदा सनी ठरतेय गुगलवर ‘नंबर 1’

तुनिषा शर्मा

ADVERTISEMENT

Instagram

तुनिषा शर्माला बघितल्यानंतर तुम्ही तिच्या वयाचा अंदाजही लावू शकणार नाही. 16 वर्षांची तुनिषा शर्मा दिसायला खूपच सुंदर आहे. तिने एकदा नाही तर दोन वेळा कतरिना कैफच्या लहानपणीची भूमिका चित्रपटांमध्ये केली आहे. तसंच तुनिषाने आतापर्यंत “भारत का वीर पुत्र- महाराणा प्रताप” आणि “चक्रवर्ती अशोक सम्राट” अशा ऐतिहासिक मालिकांमध्येही काम केलं आहे. सध्या तुनिषा “इंटरनेट वाला लव” या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. 

अशनूर कौर

Instagram

ADVERTISEMENT

मालिका “ये रिश्ता क्या कहलाता है” या मालिकेत नायराच्या लहानपणीची भूमिका असो वा “न बोले तुम न मैंने कुछ कहा” मधील नाविकाची भूमिका असो अशनूर कौरने आपल्या अभिनयाने सर्वांनाच आपलंसं केलं. याशिवाय बऱ्याच मालिकांमध्ये अशनूर कौरने काम केलं आहे. पण आता अशनूर मोठी झाली असून ‘पटियाला बेब्स’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तसंच तिने “संजू” आणि “मनमर्जियां” या चित्रपटातही काम केलं आहे. 

श्वेता तिवारीने आपल्या दुसऱ्या नवऱ्याची केली पोलिसात तक्रार, मुलीला मारल्याचा आरोप

रिमा शेख

Instagram

ADVERTISEMENT

“न आना इस देस लाडो”, दिया और बाती हम” आणि “देवों के देव- महादेव” अशा जवळजवळ 15 टीवी मालिकांमध्ये काम करणारी रिमा शेख लहान पडद्यावरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. रिमाने वयाच्या 8 व्या वर्षापासूनच काम करायला सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत ती काम करत आहे. आता रिमा खूपच वेगळी दिसायला लागली आहे. 

उल्का गुप्ता

Instagram

ऐतिहासिक मालिका “झांसी की रानी” तुम्हाला सगळ्यांनाच लक्षात असेल. मालिकेतील महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री कृतिका सेंगरही सर्वांच्या लक्षात राहिली आहे. पण लहानपणीची राणी लक्ष्मीबाई साकारली ती उल्का गुप्ताने. लहानपणीच्या मनूची भूमिका उल्काने इतकी चांगली केली की, कदाचित तिच्या जागी आता प्रेक्षकांना दुसऱ्या कोणालाही इमॅजिन करणं जमणार नाही. यानंतर उल्का गुप्ताने “सात फेरे” आणि फिअर फाइल्स” सारख्या मालिकांमध्येही काम केलं. सध्या उल्का तेलुगू, बंगाली आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करते. आता उल्काचा लुक पूर्ण बदलला असून ती खूपच वेगळी आणि ग्लॅमरस दिसते. 

ADVERTISEMENT

हिना पांचाळच्या ‘दिलखेचक अदा’ तुम्ही पाहिल्यात का

13 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT