टीव्ही जगत गाजवलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्री सध्या आहेत गायब

टीव्ही जगत गाजवलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्री सध्या आहेत गायब

टीव्ही अभिनेत्रींशिवाय  कोणतीही मालिका आपण अजिबातच कल्पनेत आणू शकत नाही. एकता  कपूरच्या मालिकांचा विचार केला तर अभिनेत्री या मालिकेचा कणा असतात. इतकंच नाही हिंदी असो वा मराठी मालिका. अभिनेत्रींना सर्वात जास्त दर्जा दिला जातो. याआधी टीव्हीमधून घराघरात पोहचलेल्या काही अशा अभिनेत्री आहेत ज्या सध्या टीव्हीवर दिसतही नाहीत. एकेकाळी प्रेक्षकांनी या अभिनेत्रींना डोक्यावर उचलून धरलं होतं. मात्र आता या अभिनेत्रींचे  कुठेही नाव नाही. यापैकी कोणतीही अभिनेत्री आता लहान अथवा मोठ्या कोणत्याही पडद्यावर काम करताना दिसत नाहीत. कोण आहेत अशा अभिनेत्री जाणून घेऊया. 

1. राजश्री ठाकूर

‘सात फेरे’ या मालिकेतील सलोनीच्या भूमिकेतील राजश्री ठाकूरला कोण विसरू शकतं. राजश्रीने या मालिकेत अशी भूमिका साकारली होती जिचा रंग सावळा असल्याने समाजात तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. राजश्रीची ही भूमिका सर्वांनाच खूप आवडली होती. त्यानंतर राजश्रीने बराच गॅप घेऊन ‘भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप’ या मालिकेत काम केले होते. मात्र राजश्रीने भारंभार मालिकांमधून काम केले नाही. पण आपल्या अप्रतिम अभिनयामुळे राजश्रीने नाव कमावले. लग्न झाल्यानंतर मात्र राजश्री टीव्हीपासून दूरच राहिली. राजश्रीला एक मुलगी असून ती सध्या आपल्या कुटुंबाबरोबर रमली आहे. पुन्हा तिला कोणत्याही मालिकेमध्ये पाहण्यात आले नाही. 

2. भैरवी रायचुरा

‘बालिका वधू’मधील आनंदीच्या आईची भूमिका असो अथवा ‘हम पाँच’ मधील काजल भाईची भूमिका असो आपला वेगळाच ठसा अभिनेत्री भैरवी रायचुराने उमटवला होता. आजही काजल भाई म्हटलं की भैरवीचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. तिची ही भूमिका इतकी गाजली की आजही तिला याच भूमिकेसाठी जास्त ओळखले जाते. ससुराल गेंदा फूल, वो रहेने वाली महलों की, गुटरगूं अशा अनेक मालिकांमधून तिने काम केले. पण भैरवी गेल्या काही वर्षांपासून लहान पडद्यापासून दूरच आहे. भैरवी निर्माती म्हणूनही काम पाहते. मात्र काही वर्षांपासून भैरवी पडद्यावर दिसलेली नाही. तिच्या चाहत्यांना नक्कीच तिला पुन्हा एकदा टीव्हीवर पाहायची इच्छा आहे. याशिवाय काही वर्षांपूर्वी भैरवीने ‘खतरों के खिलाडी’ या रियालिटी शो मध्ये सहभागी व्हायची इच्छाही व्यक्त केली होती. 

केतकी चितळे वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा चर्चेत, आता नेमके काय झाले?

3. शेफाली शर्मा

‘बानी इश्क दा कलमा’ या मालिकेतून घराघरातून पोहचलेला चेहरा म्हणजे अभिनेत्री शेफाली शर्मा. शेफालीला या मालिकेतून खूपच प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर तिने दिया और बाती हम, तेरे बिन यासारख्या मालिकांमधूनही काम केले होते. मात्र त्यानंतर शेफाली शर्मा टीव्हीपासून दूर गेली. गेल्या काही वर्षांपासून शेफाली छोट्या अथवा मोठ्या पडद्यावर दिसली नाही. शेफालीला काही दिवसातच प्रसिद्धी मिळाली होती. मात्र आता ती कोणत्याही मालिकेत दिसत नाही. 

मराठमोळे आशिष पाटील आणि रुतुजाच्या लावणीवर रेमो फिदा, चित्रपटाची दिली ऑफर

4. नौशीन अली सरदार

View this post on Instagram

NAUSHEEN ALI SARDAR #nausheenalisardar

A post shared by Actress 24/7 (@marvelactress) on

‘कुसुम’ या एकता कपूरच्या प्रसिद्ध मालिकेतून प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळलेली अभिनेत्री म्हणजे नौशीन अली सरदार. तिची ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरली होती. कुसुममधून तिला तुफान यश मिळलं. काही मालिकांमध्ये त्यानंतर तिने गेस्ट अपिरिअन्स साकारला. मात्र त्यानंतर नौशीन गायबच झाली. त्यानंतर ती केवळ एका वेबसिरीजमध्ये दिसली. मात्र या वेबसिरीजमध्ये प्रेक्षकांनी तिला ओळखलेही नाही इतका बदल तिच्यात झाला आहे. तिला पुन्हा यश मिळालेच नाही. 

सलमान खान फार्महाऊसवर करत आहे शेती, भर पावसात चालवला ट्रॅक्टर

5. श्वेता क्वात्रा

View this post on Instagram

Diwali Nights 💜 @manavgohil @zahratabeetha

A post shared by Shweta Kawaatra (@shwetakawaatra) on

एकता कपूरच्या ‘कहानी घर घर की’ मालिकेतून पल्लवी अग्रवालची भूमिका साकारलेली श्वेता क्वात्रा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यानंतर श्वेताने कुसुम, कृष्णा अर्जुन, सी.आय.डी., जस्सी जैसी कोई नही इत्यादी मालिकांमधून काम केले. मानव गोहीलसह लग्न केल्यानंतर मात्र श्वेता लहान पडद्यापासून दूर गेली. आपल्या मुली आणि नवऱ्यासह सध्या श्वेता आयुष्य आनंदात घालवत आहे. मुलीच्या जन्मानंतर श्वेता पुन्हा कधीही मालिकांमध्ये दिसली नाही. मात्र आजही तिचे चाहते तिच्या कमबॅकची नक्कीच वाट पाहात आहेत.