सगळ्यांसमोर त्याने साराला kiss करण्याचा केला प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

सगळ्यांसमोर त्याने साराला kiss करण्याचा केला प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

आता हे जरा अतीच झालं म्हणजे अगदी चारचौघात साराला Kiss करण्याचा प्रयत्न तिच्या फॅननं केला. तिला जबरदस्तीने किस करु पाहण्याऱ्याचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. पण त्या क्षणी सारा जे काही वागली ते पाहता सारा तू जिंकलंस असं म्हणावं लागेल. जाणून घेऊया नेमकं काय झालं होत सारासोबत आणि साराने नेमकं काय केलं. जाणूया या व्हायरल व्हिडिओचे सत्य 

सेलिब्रिटी कपल आमिर-संजिदामध्ये का आला आहे दुरावा

नेमकं काय झालं?

सारा अली खान नुकतीच मालदीव्सच्या सुट्ट्यांवरुन परतली आहे. मुंबईत परतल्यानंतर तिने तिच्या फिटनेसकडे पुन्हा एकदा लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. गुरुवारी pilates वरुन परत येत असताना तिला पापाराझी आणि फॅन्सनी घेरले. तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी तिला फॅन्सनी विनंती केल्यानंतर तिने त्यांच्यासोबत फोटो काढले.  पण एका फॅनने तर फारच कहर केला. त्याने सारा अली खानसोबत हात मिळवला आणि तिचा हात पकडून तिला kiss करण्याचा प्रयत्नसुद्धा केला. फॅनने हातात घेतलेला हात पाहून सारा दोन सेकंदासाठी घाबरुन गेली. पण तिच्या सुरक्षारक्षकाने कमालीची चपळाई दाखवत त्या फॅनला पळवून लावले. लागलीच साराने त्याचा कोणताही तमाशा न करता थेट गाडीत बसणे पसंत केले. 

अनेकदा फॅन ओलांडतात त्यांच्या मर्यादा

एखाद्या स्टारचे फॅन असणं ही काही नवी गोष्ट नाही. पण फॅन्सीसुद्धा त्यांची मर्यादा ठेवायला हवी. एखादी व्यक्ती आवडते म्हणून त्यांच्या मागे लागणे सुद्धा फार चांगले नाही. अनेकदा कलाकारांसोबत त्यांचे किस्से घडतात. कलाकारांसोबत इतका लवाजमा असतानाही लोकं अशा पद्धतीने का वागतात ते कळत नाही. त्यामुळे फॅन्सनी त्यांच्या मर्यादा राखल्या पाहिजेत.

अभिनेत्री सई ताम्हणकरचा परदेशातही बोलबाला

सारा सगळ्यात आवडती

सेलिब्रिटींचा विचार केला तर स्टार किडमधील सारा अली खान  अनेकांची आवडती आहे. तिच्या अगदी पहिल्या चित्रपटापासून तिने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. तिच्या वागण्याबोलण्याची पद्धत पाहता अनेकांना तिची साधी राहणी  आणि तिचे बोलणे आवडते त्यामुळेच ती सगळ्यांचीच आवडती आहे. स्टार किड्समध्ये सगळ्यात जास्त तिचाच बोलबाला आहे. 

मालदीव्समध्ये केली सुट्टी एन्जॉय

सारा अली खान  2020 मध्ये कुली नंबर 1  आणि लव आज कल या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. लव आज कलचे चित्रीकरण पूर्ण झाले असून कुली नंबर 1चे शुटींग सध्या सुरु आहे. पण एक ब्रेक तो बनता है. सारा अली खान नुकतीच मालदीव्समध्ये जाऊन आली. भाऊ इब्राहिम आणि आई अमृता सिंहसोबत ती या वॅकेशनवर होती. या वॅकेशन दरम्यान तिने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 


आता सुट्टीवरुन परतलेली सारा पुन्हा कामाला लागली आहे. पण फॅन्स जरा जपून असा अतिशहाणपणा तुम्ही कधीच करु नका. 


#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा  POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/