फ्रँड्री'मधली शालू या कारणामुळे पुन्हा आली चर्चेत

फ्रँड्री'मधली शालू या कारणामुळे पुन्हा आली चर्चेत

तुम्हाला ‘फँड्री’ चित्रपट आठवतो का? हा, आठवला असेल तर तुम्हाला या चित्रपटातील शालूही नक्कीच आठवली असणार! आता ही शालू मोठी झाली असून तिचा ग्लॅमरस अंदाज तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच पाहायला मिळतो. ही शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात. फ्रँडी या चित्रपटाच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली आणि तिच्या दिलखेचक अदांमुळे ती तमाम प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या मनात जाऊन बसली. पण सध्या सगळ्या सोशल मीडियावर तिचीच चर्चा होताना दिसत नाही. एका पोस्टनंतर जे काही झाले त्यामुळेच सध्या सगळ्यांचे लक्ष तिच्या नव्या पोस्टकडे लागून राहिले आहे. आता नेमकं काय झालंय ज्यामुळे राजेश्वरी चर्चेत आली आहे जाणून घेऊया त्या मागचे कारण

फुलराणी' येणार रुपेरी पडद्यावर,शूटिंगला सुरुवात

जरीच्या साडीत…

साडी हा प्रत्येक सेलिब्रिटीचे लुक खुलवतो हे आपण जाणतो. राजेश्वरीने एक नवे फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये ती साडी नेसली आहे. वेस्टर्न लुक देणारी ही रफल साडी असून मल्टी प्रिंट आहे त्यावर काळ्या रंगाचा सिक्वेन ब्लाऊज घातला आहे. या साडीमध्ये ती इतकी सुंदर दिसत आहे की, तिच्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस जणू पाऊस पडला आहे. खूप जणांना तिचा हा लुक आवडला आहे. तिच्या एका फॅन्सने अशी कमेंट दिली की, ती कमेंट राजेश्वरीच्या नजरेतूनही चुकली नाही. ही कमेंट अशी होती ‘आयुष्य सुंदर आहे. फक्त तू बायको म्हणून हवी’ सोशल मीडियावरुन असं प्रपोझ करण्याची हिंमत या पठ्ठ्यामध्ये होती. पण त्यावर राजेश्वरीचा रिप्लायही तितकाच खास होता. कारण तिने न रागावता त्या कमेंटवर असा रिप्लाय केला आहे की सगळ्यांना गंमतच वाटली… ‘माझ्या आयुष्याचे काय? ’ असे म्हणत तिने या फॅनचा पत्ताच काटला आहे असे म्हणायला हवे. 

अर्जून कपूरने शेअर केला मंगळसूत्राचा फोटो, मलायकासाठी केलं का खरेदी

स्टायलिश आणि ग्लॅमरस

फ्रँडीमधील शालू आता पुरती बदलून गेली आहे. तिच्या प्रोफाईलला भेट दिल्यानंतर तुम्हाला याचा अंदाज नक्कीच येईल.  ती वेस्टर्न आणि वेगवेगळ्या फ्युजन आऊटफिटवर आपले फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो फारच सुंदर आणि वेगवेगळ्या पद्धतीने काढलेले असतात. म्हणूनच तिच्या चाहत्यांना तिचे हे सारे फोटो आवडतात. तिच्या या अदा पाहात खूप जणांनी तिच्या या फोटोवर कमेंट्स दिल्या आहेत. त्याही वाचण्यासारख्या आहेत. शुद्ध  मराठीमध्ये या कमेंट दिलेल्या असून सोशल मीडियावर या अभिनेत्रीचा बोलबाला वाढतोय हे नक्की दिसून येतयं. 

अभिषेक बच्चनच्या 'दसवी'चं आग्रामध्ये शूटिंग झालं पूर्ण, शेअर केले मजेशीर किस्से

नवे ट्रेंड करते फॉलो

सेलिब्रिटी झाल्यानंतर किंवा प्रकाशझोतात आल्यानंतर फॅन्ससाठी सगळे काही करणे फार गरजेचे असते. राजेश्वरी तिच्या इन्स्टा अकाऊंटवरुन नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती नुसतेच तिचे स्टायलिश फोटो शेअर करत नाही. तर ती तिच्या अकाऊंटवरुन ट्रेंडिंग व्हिडिओ आणि रिल्ससुद्धा शेअर करते. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर हिट आहेत. 

असा लागला शोध

राजेश्वरी ही नागराज मंजुळे यांचा शोध आहे. फ्रंँड्री या चित्रपटासाठी ते नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. पुण्यात असताना त्यांनी राजेश्वरीला पाहिले होते. तोच चेहरा त्यांच्या डोळ्यापुढे होता. पण तिला फक्त त्यांनी पाहिले होते. तिचा शोध त्यांना लागत नव्हता. अखेर खूप प्रयत्नांनी त्यांना तिचा शोध लागला. पण तिचे पालक चित्रपटात काम करण्यासाठी तयार नव्हते. शेवटी नागराज मंजुळेंनी त्यांची समजूत घातली आणि तिला चित्रपटासाठी तयार केले. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याने धुमाकूळ घातला आणि राजेश्वरीला प्रसिद्धी मिळावी. 


दरम्यान, राजेश्वरीचा आता एक फॅनबेस असून तो तिच्यावर अशापद्धतीने प्रेमाचा वर्षाव करत असतो.