शाहीद कपूरबरोबर ‘या’ अभिनेत्रीने करावं एकत्र काम, चाहत्यांची मागणी

शाहीद कपूरबरोबर ‘या’ अभिनेत्रीने करावं एकत्र काम, चाहत्यांची मागणी

शाहीद कपूर सध्या खूपच डिमांडमध्ये आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नुकताच शाहीदचा ‘कबीर सिंग’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाला मिक्स प्रतिक्रिया आल्या असल्या तरीही बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाल दाखवत आहे. तसंच शाहीदच्या आजपर्यंतच्या सर्व चित्रपटांपैकी या चित्रपटाला सर्वात जास्त चांगलं ओपनिंग मिळालं असून लवकरच हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये समाविष्ट होईल असंही म्हटलं जात आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना शाहीदचा अभिनय आवडला असून शाहीदने यामध्ये अप्रतिम कबीर रंगवला असल्याचंही प्रेक्षकांकडून कौतुक केलं जात आहे. या चित्रपटाची तुलना मूळ चित्रपटाशीदेखील केली जात असली तरीही शाहीदने मात्र कबीर म्हणून आपली छाप सोडली आहे हे नक्की. तसंच शाहीद आणि कियाराची केमिस्ट्रीदेखील या चित्रपटात अप्रतिम दिसून आली आहे. त्यामुळे आता शाहीद पुढचा चित्रपट कोणता आणि कोणत्या अभिनेत्रीबरोबर साकारणार असा प्रश्नही त्याच्या चाहत्यांना सतावू लागला आहे. त्यामुळे एका ट्विटर पोलवर शाहीदला पुढे कोणत्या अभिनेत्रीबरोबर काम करताना पाहायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला आणि यामध्ये आलेल्या चाहत्यांचं बहुमत कोणत्या अभिनेत्रीला मिळालं हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 

शाहीदने साराबरोबर करावं काम

Instagram

शाहीदने नेहमीच आपल्या अभिनयाने बॉलीवूडमध्ये आणि प्रेक्षकांंच्या मनावर राज्य केलं आहे. कोणत्याही शर्यतीत न राहता त्याने आपला वेगळा मार्ग हाताळत अप्रतिम चित्रपट दिले आहेत. पण त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा असा हा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट म्हणावा लागेल. विचारण्यात आलेल्या पोलप्रमाणे दिशा पटानी, सारा अली खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यापैकी शाहीदबरोबर काम करण्यासाठी बहुमत मिळालं आहे ते म्हणजे सारा अली खानला. आपल्या पहिल्याच चित्रपटापासून प्रेक्षकांचं आणि अगदी मीडियाचंदेखील मन जिंकून घेतलेल्या सारा अली खानने शाहीदबरोबर पुढचा चित्रपट करावा असं प्रेक्षकांना वाटत आहे. तर दुसरं प्राधान्य देण्यात आलं आहे ते दिशा पटानीच्या नावाला. त्यामुळे शाहीदबरोबर काम करण्यासाठी सध्या या दोन अभिनेत्रींना प्रेक्षकांनी प्राधान्य दिलं आहे. 

निर्मात्यांंनी द्यावं याकडे लक्ष

Instagram

सध्या प्रेक्षकांना काय वाटत आहे हे सोशल मीडियामुळे सर्वांनाच जाणून घेणं सोपं झालं आहे. आता कबीर सिंगच्या यशानंतर शाहीदला तर अनेक निर्मात्यांकडून चित्रपटांचे प्रस्ताव मिळत आहेत. त्यामुळे चित्रपटात त्याची अभिनेत्री म्हणून कास्ट करण्यासाठी निर्मात्यांना आता दोन चांगले पर्याय उपलब्ध आहेत, जे प्रेक्षकांना पाहायचे आहेत. सारा अली खानने ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ या दोन्ही चित्रपटातून आपल्या अभिनयाची क्षमता दाखवून दिली आहे. तर सध्या ती इम्तियाज अलीच्या ‘लव आज कल 2’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात अभिनेता कार्तिक आर्यनबरोबर हिमाचल प्रदेशमध्ये व्यस्त आहे. ही जोडी नक्कीच पडद्यावर कमाल दाखवेल असा विश्वास प्रेक्षकांनाही आहे त्यामुळे निर्मात्यांनीही यावर विचार करायला आता हरकत नाही असंच म्हणावं लागेल. शाहीदने आपल्या करिअरमध्ये अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या असून त्या प्रत्येक भूमिकेला त्याने आतापर्यंत न्याय दिला आहे. पंकज कपूरचा मुलगा ही ओळख त्याने कधीच पुसून टाकली असून स्वतःची अशी एक इमेज त्याने बॉलीवूडमध्ये तयार केली आहे. त्यामुळे शाहीद आता पुढचा चित्रपट कोणता निवडतो आणि कशा प्रकारे प्रेक्षकांची मनं जिंकून घेतो हे लवकरच कळेल.