नुकतीच बाहुबलीला 3 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने पुन्हा एकदा बाहुबलीचे कर्ताधर्ता एस,एस. राजमौली सगळ्यांना आठवले. एखाद्या कथेला सत्यात उतरवताना त्यांनी बाहुबली नावाचे कॅरेक्टर पडद्यावर असे काय साकारले की, बाहुबली घराघरात जाऊन पोहोचला. आता एस,एस. राजमौली एक आणखी प्रोजेक्ट करावा अशी लोकांची इच्छा आहे. ज्या रामायण या मालिकेने सगळ्यांना वेड लावले आहे ते रामायण मोठ्या पडद्यावर आणि राजमौलींच्या मार्गदर्शनाखाली व्हावे असे अनेकांना वाटत आहे. त्यामुळेच आता बाहुबलीनंतर एस.एस. राजमौलीनी रामायण बनवण्याची मागणी तीव्र होऊ लागली आहे. इतकेच नाही तर राजमौलीने रामायण करावे यासाठी #rajmoulimakeramayana हा हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागला आहे.
No ancient story, not even Homer's Iliad or Odyssey, has remained as popular through the course of time. The Life of Shri Rama appears as old as civilization and has a fresh appeal for every generation.#RajamouliMakeRamayan pic.twitter.com/YyPVqZ4T2x
— ABVP MadhyaBharat (@ABVPMadhybharat) May 3, 2020
Shree Ram is waiting for you @ssrajamouli Sir
— நவீன புத்தன் (@ModernBuddhan) May 3, 2020
Please Make Ramayan#RajamouliMakeRamayan pic.twitter.com/nqz4l1rxm1
Ram is not a just a name, Ram is past,present & future. ❤
— Sudhanshu Joshi (@sudhanjoshi) May 3, 2020
We request @ssrajamouli sir to recreate this masterpiece.#RajaMouliMakeRamayan@arungovil12 @iamSunilLahri@ChikhaliaDipika pic.twitter.com/u33N0PCvH1
आता अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, राजमौली खरंच ‘रामायण’ विषयावर चित्रपट बनवणार का? रविवारपासून अचानक ही बातमी अचानक सगळीकडे व्हायरल होऊ लागली. पण या बाबतीत अधिक माहिती घेतल्यानंतर असे कळले की, रविवारी अचानक ट्विटरवर एक हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. #rajmoulimakeramayana हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागल्यानंतर अशी बातमी फिरु लागली की, राजमौली रामायणावर चित्रपट बनवणार आहे. पण यामध्ये काहीच तथ्य नाही असे कळत आहे. कारण राजमौलींनी या संदर्भात कोणतीही माहिती दिली नाही. त्यांच्या फॅन्सना त्यांनी ‘रामायण’ मोठ्या पडद्यावर आणावे असे वाटत होते. रामायण मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी राजमौली एकदम बेस्ट असल्याचे अनेकांना वाटते म्हणूनच त्यांनी राजमौली यांच्या नावाने हा हॅशटॅग तयार केला आहे.
दीपिकाने कच्च्या कैरीचा फोटो केला शेअर, गरोदर असल्याचा चाहत्यांचा अंदाज
रामायण ही मालिका लॉकडाऊनमध्ये सगळ्यात जास्त पाहिली जात आहे. या मालिकेचा टीआरपी पुन्हा एकदा वर आहे. या मालिकेतील कलाकारांच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. या मालिकेमुळे डीडी चॅनेलला ही खूप चांगले दिवस आले आहेत. 90 च्या काळात अॅनिमेशनच्या माध्यमातून सीता हरण- हनुमानाची लिला- लंका जाळणे- रावणयुद्ध या सगळ्यामुळेच ही मालिका लोकांनी डोक्यावर धरली होती. त्या काळातील तंत्रज्ञांनी लोकांना खिळवून ठेवले. सध्या अॅमिनेशन आणि लढाईच्या बाबतीत एस, एस. राजमौली यांच्या बाहुबली या चित्रपटाचे नाव सगळ्यात वर घेतले जाते. या चित्रपटाने सगळ्यांना अक्षरश: वेड लावून टाकले होते. त्यामुळेच राजमौलींनी हा प्रोजेक्ट हाती घ्यावा आणि त्यांनी त्यांच्या नव्या स्कील्सनी रामायण सादर करावे असे अनेकांना वाटत आहे.
एस. एस. राजमौली सध्या एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये फारच व्यग्र आहेत .RRR नावाचा एक बीग बजेट चित्रपट ते करत आहेत. या चित्रपटात रामचरण, अजय देवगण, ज्युनिअर NIR आणि आलिया भट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 400 कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाचे शुटींग सुरु झाले असून वेळापत्रकाप्रमाणे 30 जुलै रोजी हा चित्रपट रिलीज होणे अपेक्षित होते. पण कोरोना व्हायरसमुळे आता हा प्रोजेक्टही अडकून पडला आहे, बाहुबलीनंतर हा त्यांचा मोठा प्रोजेक्ट असणार आहे.
त्यामुळे सध्या तरी राजमौली रामायणावर आधारीत कोणताही चित्रपट तयार करणार नाही हे नक्की!