फराह खान वाट पाहतेय शाहरूखच्या होकाराची

फराह खान वाट पाहतेय शाहरूखच्या होकाराची

बॉलीवूडमधील फराह खान आणि शाहरुख खानही जोडगोळी सगळ्यांनाच माहीत आहे. या जोडीने आत्तापर्यंत जे चित्रपट केले ते बॉक्सऑफिसवर सुपरहीट ठरले. ज्यामध्ये मेैं हू ना आणि ओम शांती ओमचा समावेश होतो. मैं हू ना मधील शाहरूख आणि सुश्मिताची जोडी हिट ठरली होती तर ओम शांती ओम मध्ये फराह खानने बॉलीवूडची पद्ममावती दीपिका पदुकोणला लाँच केलं होतं. जिचा चित्रपटातील ‘एक चुटकी सिंदूर की कीमत’ हा डायलॉग आजही लोकांच्या तोंडी आहे. तर आता चर्चा होत आहे ती मैं हू ना चा सिक्वलबाबत.


शाहरूख होकार देणार का?


डान्स कोरिओग्राफर ते बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शिका असा प्रवास फराह खानने मैं हू ना या चित्रपटाने सुरू केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. ज्यामध्ये शाहरूख खान, जायेद खान, सुश्मिता सेन, अमृता राव आणि बोमन ईरानी हे कलाकार होते.
 

 

 


View this post on Instagram


 

 

The joyride that was/is Main Hoon Na..#15yrsofMainHoonNa


A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder) on
या चित्रपटाची गाणी आणि जबरदस्त कथेमुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद दिला होता. पण या चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल 15 वर्षांचा काळ लोटला आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Eternally grateful♥️ @iamsrk #15yrsofmainhoonna


A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder) on
फराहच्या मते तिच्याकडे या चित्रपटाचा सीक्वल बनवण्यासाठी चांगली आयडिया आहे पण सर्व शाहरूखवर अवलंबून आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिने सांगितलं की, माझी ईच्छा आहे की, या चित्रपटाचा सीक्वल यावा आणि माझ्याकडे चांगली आयडियाही आहे. पण सगळं शाहरूखवर अवलंबून आहे. जर त्याला वाटलं तरच आम्ही चित्रपट सुरू करू शकू. कारण आजही टीव्हीवर हा चित्रपट लागल्यावर लोक आवर्जून पाहतात. अशा परिस्थितीत मैं हू ना चा सीक्वल बनवणं नक्कीच चांगली आयडिया आहे.


जेव्हा सलमान खानमुळे ऐश्वर्याला गमवावे लागले होते 5 चित्रपट


शाहरूखचा प्लॅन काय 


सध्या शाहरूखचा मूड मात्र बदलल्याचं चित्र आहे. झीरो च्या अपयशानंतर त्याने एकही चित्रपट स्वीकारलेला नाही. त्यामुळे फराह खानची मैं हू ना च्या सीक्वलची ऑफर तो स्वीकारणार का, हा प्रश्न आहे.

फराह खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास ती सध्या रोहित शेट्टीच्या बॅनरसाठी एक चित्रपट बनवत आहे. याची घोषणाही काही दिवसांपूर्वी रोहितने केली होती. पण याबाबतची अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.