काश्मीरचा चुकीचा नकाशा पोस्ट करणे फरहानला पडले भारी

काश्मीरचा चुकीचा नकाशा पोस्ट करणे फरहानला पडले भारी

सध्या देशात पेटलेला वणवा थांबायचे नाव घेत नाही. सोशल मीडियावर आक्षेपार्ह अशा अनेक पोस्ट पडत आहेत. त्यामुळे तुम्ही जर काहीही पोस्ट करत असाल तर तुम्हाला विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. फरहान अख्तरच्या बाबतीत अशीच एक गोष्ट घडली आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावर काश्मीरचा नकाशा शेअर केला आणि अवघ्या काहीच वेळात त्याला तो काढून टाकावा लागला शिवाय याच प्लॅटफॉर्मवरुन माफीदेखील मागावी लागली.

‘नटसम्राट’ श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड, सिनेसृष्टीवर पसरली शोककळा

नेमकं प्रकरण काय?

सध्या देशभरात नागरिकता संशोधन अधिनयम (CAA)  आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन (NRC)विरोधात वातावरण चांगलेच तापलेले आहे. अनेकांनी याला विरोध दर्शवला आहे. बॉलीवूडचे तारेही यात मागे नाही.आज गुरुवारी फरहान अख्तर ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन करणार आहे. त्याने याची माहिती देण्यासाठी भारताचा एक नकाशा शेअर केला. हा नकाशा शेअर करत असताना त्याने या नकाश्यामध्ये पाक व्याप्त काश्मीर हा भाग वगळून टाकला होता. त्याने बुधवारी दुपारी ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्याच्या या पोस्टवर लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली. अगदी काहीच तासाच तो यासाठी ट्रोल होऊ लागला. त्याला त्याची चूक लक्षात आल्यानंतर त्याने तातडीने ही पोस्ट काढून टाकली आणि सोशल मीडियाच्या माध्यामातून माफी मागितली. 

फरहानने केले नियमाचे उल्लंघन

आता फरहानने सोशल मीडियावर अशी काही पोस्ट केल्यानंतर फरहान ट्रोल होणार नव्हता असे झालेच नसते. भारतीय कायद्यानुसार देशाचा नकाशा अशा पद्धतीने शेअर करणे हा कलम 121 कायद्याअंतर्गत त्याला शिक्षा होणे रास्त आहे. कारण त्याने पाक व्याप्त काश्मीरचा भाग वगळून हा फोटो शेअर केला. त्याच्याकडून चूक झाली असे म्हणण्यापेक्षा त्याने ते मुद्दाम केले त्यामुळेच त्याला शिक्षा व्हायला हवी अशी मागणी सोशल प्लॅटफॉर्मवरुन करण्यात आली आहे.

संजय लीला भन्सालीच्या मागे लागलीय नकार घंटा

फरहानला लक्षात आली आपली चूक

Instagram

आता सोशल मीडियावर इतका तमाशा सुरु आहे म्हटल्यावर पुढे काहीही विपरित होऊ नये यासाठी फरहानने मागे पुढे न पाहता ती पोस्ट डिलीट करुन टाकली. पण तरिही त्यामागील ससेमिरा काही थांबला नाही. उलट लोकांनी त्याची अधिक कानउघडणी करायला सुरुवात केली.  पण यावर फरहान अख्तरने शांतच राहणे पसंत केले. त्याने नकाशा काढल्यानंतर एकच पोस्ट शेअर केली त्यामध्ये त्याने देशाचा असा नकाशा शेअर करणे चांगले नाही असे म्हणत माफी मागितली आहे. 

फरहान अख्तरचा करिअरग्राफ

फरहानच्या करिअरचा विचार करता त्याचा ‘स्काय इज पिंक’ नावाचा चित्रपट नुकताच रिलीज झाला. प्रियांका चोप्रासोबत त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. त्याच्या या चित्रपटाने चांगली कमाई केली. 


आता फरहानचे हे नकशा प्रकरण त्याला किती नुकसान पोहोचवते ते पाहावे लागले.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.