दिशा पटनीच्या या नखऱ्यांमुळे निर्माते झाले हैराण,मांडली व्यथा

दिशा पटनीच्या या नखऱ्यांमुळे निर्माते झाले हैराण,मांडली व्यथा

यश कधीच डोक्यावर चढू द्यायला नको असे म्हणतात ते काही उगाच नाही. मिळालेले यश पचवून पाय जमिनीवर घट्ट ठेवण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. पण आता दिशा पटनीला याचा विसर पडू लागला आहे, असे चर्चा होऊ लागल्या आहेत. लागोपाठ 4 सुपरहिट चित्रपटांमधून झळकल्यानंतर आता दिशा पटनीला कामाप्रती निष्ठा राहिली नाही.ती सेटवर स्वत:च्या मनाप्रमाणे वावरत असल्याची तक्रार एका चित्रपट निर्मात्याने केली असून तिच्या या नखऱ्यामुळे संपूर्ण चित्रपटाची टीम हैराण असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या कारणासाठी प्रियांका आणि निकला नाही व्हायचंय 'आई-बाबा'

काय आहे निर्मात्याची दु:खद गाथा

Instagram

सध्या दिशा पटनी एका चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहे.या चित्रपटाच्या सेटवर ती नित्यनियमाने जाते पण  तिच्या मनानुसारच काम करते. ती सेटवर जास्त वेळ राहत नाही.ती ऐकत नाही, असे निर्मात्याने सांगितले आहे तिला अनेकदा काय करायचे ते माहीत नसते म्हणजे ती इतकी गोंधळलेली असते की. तिच्या या वागण्याचा परिणाम चित्रपटाच्या शुटींगवर होत आहे. त्याने एका मुलाखतीदरम्यान दिशा पटनीची तक्रार केली आहे. 

दिशा दिसणार ‘मलंग’मध्ये

Instagram

दिशा पटनी लवकरच ‘मलंग’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती आदित्य रॉय कपूर आणि अनिल कपूर यांच्यासोबत दिसणार आहे. या मोहित सुरी या चित्रपटाचे दिग्दर्शक असून पुढच्यावर्षी 2020 फेब्रुवारीमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.ती या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. कदाचित याच चित्रपटाच्या सेटवर ती नखरे करत असावी असा अंदाज बांधला जात आहे.आता अपेक्षित वेळेनुसार हा चित्रपट पूर्ण होईल की नाही ही शंकाच आहे.

शिल्पा शेट्टी 13 वर्षांनी दिसणार सिल्व्हर स्क्रिनवर, 'निकम्मा' चित्रपटातून करणार कमबॅक

दिशा पटनी आणि टायगर श्रॉफ

दिशा पटनी आणि टायगर श्रॉफ हे इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध कपल आहे. त्यांच्या रिलेशनशीपबद्दल अनेकांना माहीत आहे. दिशा पटनी अनेकदा टायगर श्रॉफसोबत बाहेर दिसते. त्या दोघांनी बाघी2 या चित्रपटात काम केले. त्या आधीपासूनच त्यांच्या रिलेशनशीपची चर्चा आहे.  

दिशाचा कायम हॉट अंदाज

Instagram

दिशा नेहमीच तिच्या कपड्यांसाठी ट्रोल होत असते. तिचे कमी कपडे घालणे नेहमीच ट्रोल करत असते. तिचे कित्येक फोटो वादग्रस्त ठरले आहेत. फोटोशूट व्यतिरिक्तही ती इतरवेळी जे कपडे घालते त्यावरुन तिला नेहमीच जज केले जाते. एकूणच दिशा पटनीचा अंदाज हा नेहमीच हॉट असतो. टायगरसोबत असतानाही तिचा वेगळाच अंदाज पाहायला मिळतो. 

सुश्मिता सेननंतर तिच्या भावाच्या नात्यात दुरावा,प्रसिद्धीसाठी करत नाही ना दिखावा

धोनी गर्लचा हा प्रवास

दिशाचा पहिला चित्रपट हा ‘धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा होता.या चित्रपटातील हा लुक अनेकांना आवडला होता. यामध्ये महेंद्रसिंह धोनीची पहिली गर्लफ्रेंडच्या रुपात दिसली होती. तिच्या त्याच गोडपणाचे अनेकजण चाहते होते. पण या एका चित्रपटानंतर तिचा अंदाज फारच बदलला. त्यानंतर ती बाघी2 , कुंफू योगा, भारत या चित्रपटांमध्ये दिसली. तिने आतापर्यंत केलेल्या सगळ्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईसुद्धा केली. त्यामुळे याचा फायदा दिशाला नक्कीच झाला होता. 


पण आता दिशाचा हा बदललेला अंदाज तिला वर घेऊन जातो की, खाली हे पाहावे लागेल. पण दिशामुळे या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यत्यय येत आहे हे नक्की!