मलायकाच्या लग्नाआधी अरबाज खान करणार का गर्लफ्रेंडसोबत लग्न

मलायकाच्या लग्नाआधी अरबाज खान करणार का गर्लफ्रेंडसोबत लग्न

अरबाज खानची एक्स बायको मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे हे जगजाहीर झाले आहे. नवऱ्यापासून वेगळे होण्याचे कारणही अर्जुन होते हे ही अनेकांना माहीत आहे. पण अरबाजही काही सिंगल राहिला नाही. त्यांचे लग्न तुटत नाही तोच अरबाजही एका फिरंगी अभिनेत्रीसोबत दिसू लागला ही अन्य कोणी नसून जॉर्जिया अँड्रियानी आहे. हिच्यासोबतच अरबाज लग्नबेडीत अडकणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. आधीच मलायका अर्जुनसोबत लग्न करण्याच्या चर्चा होत असताना आता अरबाजच्या लग्नाच्या बातम्याही येऊ लागल्या आहेत.

रणवीरसोबत लवकरच झळकणार ही दाक्षिणात्य अभिनेत्री

लग्नांच्या चर्चांवर काय म्हणाला अरबाज

सध्या दबंग 3चे प्रमोशन जोरदार सुरु आहे. या चित्रपटात अरबाज खान मक्खनचंद पांडेची भूमिका निभावत आहे. त्याला एका मुलाखतीदरम्यान जॉर्जिया आणि त्याच्या नात्याबद्दल प्रश्न करण्यात आला. त्याला लग्नाची तारीख विचारण्यात आली. त्यावेळी अरबाजने न चिडता त्या प्रश्नाचे उत्तर दिले. तो म्हणला, ‘मी अँडियाला डेट करत आहे हे खरे आहे. कारण मी ही गोष्ट खोटी बोलू शकत नाही. ती लोकांसमोर फारच उघड आहे. जर मी या बाबतीत खोटं बोललो तर तो माझा मूर्खपाणा असेल. पण लग्नाविषयी जर विचारत असाल तर तुम्ही थोडी घाई करत आहात. पण मी ज्यावेळी लग्नाचा विचार करेन त्यावेळी त्याची घोषणासुद्धा करेन आणि तुम्हाला ( मीडियाला) त्याचे निमंत्रणही मिळेल.’ 

अरबाजने नात्यांचा नाही केला लपंडाव

Instagram

मलायकाचे अर्जुनसोबतचे फोटो कितीही व्हायरल झाले असले तरी तिने या नात्यासंदर्भात कधीच कोणाला सांगणे पसंद केले नाही. उलट ती या गोष्टी कायमच टाळत असते. त्या उलट अरबाज खानने आपल्या नात्याविषयी मीडियाला खरे सांगणेच पसंद केले. नको त्या चर्चांना उधाण येण्यापेक्षा आहे त्या गोष्टी स्विकारण्यातच त्याने धन्यता मानली. आता तो जॉर्जियासोबत लग्न करतो की नाही हे पुढील काळात कळेलच. 

सायरा बानोला पाहता क्षणी पडले होते प्रेमात दिलीप कुमार

मलायकाच्या नात्यावर अनेकांचा आक्षेप

Instagram

मलायका आणि अरबाज वेगळे होणे हेच सगळ्यांसाठी धक्कादायक होते. खान कुटुंबातील अत्यंत परफेक्ट कपल म्हणून त्यांची ओळख होती. पण अचानक 2017 साली त्यांच्या घटस्फोटाची बातमी आली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. त्यांच्या घटस्फोटामागील कारण अर्जुन कपूर आहे असे कळताच अनेकांनी या नाक मुरडली. कारण मलायका आणि अर्जुन यांच्यात तब्बल 12 वर्षांचे अंतर आहे. मलायका त्याच्यापेक्षा एक तप मोठी आहे अशीच भावना अनेकांच्या मनात होती. त्यामुळेच त्यांचे नाते त्यांच्या फॅन्सनेदेखील स्विकारले नाही. 

अरबाज खान चालला सो सो

Instagram

अरबाज खान हा सलमान खानचा भाऊ. सलमानचे दोन्ही भाऊ चित्रपटातून फार काही यश मिळवू शकले नाही. अरबाज खानच्या बाबतीतही तसेच म्हणायला हवे. त्याने हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच चित्रपट केले आहेत. अभिनयात लोकांनी फारशी पसंती दिली नसल्यामुळे अरबाजने दिग्दर्शन आणि निर्मितीकडे वळायचे ठरवले. त्यानंतरच त्याला बऱ्यापैकी यश मिळाले. 

लग्नाच्या अफवांवरुन पडदा उठवत अरबाजने खरे काय ते सांगितल्यामुळे आता त्याच्या मागे होणारी अफवांची उडवा उडव नक्कीच काही अंशी कमी होणार आहे. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.