श्रिया पिळगांवकर दिसणार ब्रिटीश सीरिज ‘बीचम हाऊस’मध्ये

श्रिया पिळगांवकर दिसणार ब्रिटीश सीरिज ‘बीचम हाऊस’मध्ये

मराठमोळी मुलगी श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) च्या सर्व फॅन्ससाठी खूषखबर. मिर्झापूर या लोकप्रिय वेबसीरिजमधील स्वीटी म्हणजेच श्रियाला मिळाला आहे इंटरनॅशनल प्रोजेक्ट तोही गुरिंदर चढ्ढा या नावाजलेल्या दिग्दर्शिकेचा. लवकरच श्रिया बीचम हाऊस (Beecham House) या ब्रिटीश टीव्ही सीरियलमध्ये झळकणार आहे.


बीचम हाऊसमधला श्रियाचा लुक


श्रियाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बीचम हाऊसमधला तिचा लुक रिव्हील केला. या लुकमध्ये श्रिया अगदी एखाद्या सुंदर राजकन्येसारखी दिसत आहे. तिच्या एका फॅनने तशी कमेंटही इन्स्टावर केली आहे की, ती नुकत्याच आलेल्या अल्लाद्दीन चित्रपटातल्या राजकुमारी जास्मीनप्रमाणे दिसत आहे. पाहा श्रियाचा हा लुक -

या सीरियलमध्ये श्रियाच्या भूमिकेच नाव चंचल असं आहे. जी बीचम हाऊसमध्ये मुलांची देखभाल करण्यासाठी येते. श्रियाने काही दिवसांपूर्वी आपल्या या भूमिकेबद्दल सांगितलं होतं की, चंचलच्या भूमिकेला अनेक शेड्स आहेत. ती सुंदर ही आहे आणि बिनधास्तही आहे. या बीचम हाऊसमध्ये ती प्रेमातही पडते आणि तिला प्रेमाबद्दल अनेक गोष्टीही कळतात.  


श्रियाचा ड्रीम प्रोजेक्ट

श्रियासाठी हा प्रोजेक्ट फारच महत्त्वाचा आहे कारण हा तिचा पहिलाच इंटरनॅशनल सीरीज आहे. श्रियाने जेव्हा या सीरियलचं ट्रेलर शेअर केलं होतं तेव्हा म्हटलं होतं की, हा आहे बीचम हाऊसमधला माझा पहिला लुक. हा माझ्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट आहे. ही माझी पहिली इंटरनॅशनल सीरीज, पीरियड ड्रामा असून जिचं दिग्दर्शन पावरहाऊस @GurinderC करत आहे. मला या निमित्ताने अद्भूत कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळत आहे.


काय आहे बीचम हाऊस


ही ब्रिटीश टीव्ही सीरियल एक पीरियड असून यामध्ये 19 व्या शतकाचा काळ दाखवण्यात येणार आहे. या सीरियलमध्ये एक सुंदर वाडा दाखवण्यात आला असून संपूर्ण कहाणी हा वााडा आणि त्यात राहणाऱ्या माणसांच्या अवतीभोवतीच फिरते. या वाड्याला नाव देण्यात आलं बीचम हाऊस. काही दिवसांपूर्वी श्रियाने या सीरियलचा पहिला लुकही इन्स्टावर शेअर केला होता.


beecham-house-1


या सीरियलमध्ये श्रियासोबतच टॉम बॅटमन, लेस्ली निकोल, मार्क वॉरेन आणि पल्लवी शारदा हेही दिसणार आहेत.


beecham-house-2


श्रिया नेहमीच काहीतरी वेगळं आणि चाकोरीबाहेरचं करताना दिसते. मग ते हिंदी असो वा बीचम हाऊससारखा इंटरनॅशनल प्रोजेक्ट असो.


हेही वाचा -


अभिनेत्री रश्मी देसाईला होता ‘हा’ गंभीर आजार, म्हणून वाढत होतं वजन


अभिनेत्री करिश्मा कपूर करतेय कमबॅक


कॅन्सरवर मात करत अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं पहिलं 'फोटोशूट'