मराठीतला पहिला वेब सिनेमा ‘संतुर्की’ चा ट्रेलर प्रदर्शित

मराठीतला पहिला वेब सिनेमा ‘संतुर्की’ चा ट्रेलर प्रदर्शित

सध्या फिल्मी जगात अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या जोड्या चर्चेत आहेत, त्यांच्या जोडीपेक्षा त्यांना संबोधणारी नावेच विशेष चर्चेत आहेत जसे की ,विराट आणि अनुष्काची जोडी म्हणजे 'विरूष्का', दिपीका-रणवीर म्हणजे 'दिपवीर', प्रियांका - निक म्हणजे 'प्रिक' आणि बरेच काही .... त्याचप्रमाणे मराठीमध्येदेखील एक जोडी ‘फेमस’ होत आहे जी आहे ‘संत्या आणि सुर्कीची जोडी’ म्हणजेच ‘संतुर्कीची’ ! 


संतुर्कीची जोडी आली प्रेक्षकांच्या भेटीला


महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली सुप्रसिद्ध मराठी वेबसिरीज ‘गावाकडच्या गोष्टी’ ने एक नवं वळण घेतलं आहे, वेबसिरीजचे दोन पर्व जरी संपले असले तरी हा पूर्णविराम नाही...कोरी पाटी प्रॉडक्शनच्या गावाकडच्या गोष्टीमधील लोकप्रिय जोडी ‘संत्या-सुरकी’ यांची प्रेमकथा आपल्याला नितीन पवार दिग्दर्शित ‘संतुर्की’ या वेबसिनेमाद्वारे पाहता येणार आहे. मराठी मनोरंजन जगातील हा पहिलावहिला प्रयोग असून व्हॅलेंटाईन डे चं औचित्य साधून दर्शकांसाठी आपला पहिला टीजर प्रदर्शित केला होता, टीजरला प्रेक्षकांचा भरगोस मिळाल्यानंतर सर्वत्र चर्चा रंगली ती फक्त "संतुर्कीची!...संतुर्की या वेबसिनेमाचा ट्रेलर दिनांक 27 मे रोजी कोरी पाटी प्रॉडक्शन्स या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित झाला.

Subscribe to POPxoTV

साधी आणि सर्वांना आपलीच वाटावी अशी कहाणी असलेली गावाकडच्या गोष्टी या वेबसिरीज चे दोन यशस्वी पर्व झाले. गावा-शहरांपासून अगदी सातासमुद्रापार या वेबसिरीजची चर्चा झाली होती. सातारा जिल्ह्यातील केळेवाडी गावात जन्मलेल्या वेबसिरीजला जगभरातून प्रेम मिळालं. या वेबसिरीजमध्ये ‘संत्या आणि सुरकी’ हे पात्र सर्वाधिक लोकप्रिय झालं. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही काही कारणास्तव त्याचं लग्न होऊ शकलं नाही. लग्न होऊन गेलेली सुरकी पुन्हा संतोष समोर येते तेव्हा त्याची होणारी तगमग...किंवा तिच्या मुलाने ‘मामा’ महटल्यावर होणारी गंमत सगळ्यांना भावली पण याच सोबत सगळ्यांना वेध लागले की इतक जीवापाड प्रेम करणारी ही दोघं एकमेकांपासून वेगळी का झाली? याचचं  उत्तर या कोरी पाटी प्रॉडक्शनच्या संतुर्की सिनेमात आहे. वास्तविक आतापर्यंत असे विषय बऱ्याचदा हाताळून झाले आहेत. पण आता यामध्ये नक्की नवीन काय असणार आहे आणि यातील कलाकारांनी या विषयाला कसा न्याय दिला आहे हा प्रेक्षकांसाठी जास्त आतुरतेचा विषय आहे. जीवापाड प्रेम करत असणाऱ्या व्यक्ती वेगळ्या होऊन जेव्हा परत येतात तेव्हा नक्की घडतं हे पाहण्यात प्रेक्षकांनाही मजा येईल.


नवे चेहरे झळकले


संतुर्की या वेबसिनेमामध्ये संतोष राजेमहाडीक,रश्मी साळवी हे मुख्य भूमिकेत दिसणार असून के.टी.पवार,तृप्ती शेडगे,शुभम काळोलिकर,समाधान पिंपळें हे कलाकार देखील असणार आहे. सिनेमाचे लेखन व दिग्दर्शन नितीन पवार यांनी केल आहे,छायांकन उमेश तुपारे याचं आहे तर कला दिग्दर्शन सुशीलकुमार निगड़े यांनी केलं आहे प्रॉडक्शनची बाजू अविनाश पवार यांनी सांभाळली आहे. या वेबसिरीजमध्ये सर्व नवे चेहरे झळकले असून सर्व कलाकारांनी चांगलं काम केलं आहे. अशा कथा नेहमीच प्रेक्षकांना आवडत असतात. त्यामुळे अशा वेबसिनेमांमधून नव्या प्रतिभाशाली कलाकारांनाही आपला अभिनय दाखवता येतो. यानंतर आता कोरी पाटी प्रॉडक्शन पुन्हा नवा कोणता विषय आणि वेबसिनेमा घेऊन येणार याकडेदेखील प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.


हेदेखील वाचा - 


अभिनयानंतर अभ्यासतही रिंकूचं ‘सैराट’ यश


एकता कपूरने तिच्या चार महिन्याच्या बाळासाठी घेतला हा निर्णय


रकुल प्रीतचा नव्या फोटोशूटमध्ये हॉट आणि ग्लॅमरस अवतार