साधारण मार्चच्या मध्यावर बंद पडलेली थिएटर अद्याप बंद आहेत. जूनपासून सुरु झालेल्या #MissionBeginAgain मुळे हळुहळू मुंबई, महाराष्ट्र आणि विविध राज्य पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. पण अजूनही काही गोष्टी आहेत ज्या अद्याप सुरु झालेल्या नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे ‘थिएटर’ एरव्ही शनिवार-रविवारी मस्त मुव्ही प्लॅन करणारे आपण नेटफ्लिक्स, हॉटस्टार यांचा आधार घेत आहोत. पण आता त्याचाही कंटाळा येऊ लागला आहेत. त्यामुळे अनेकांना उत्सुकता असेल की, मनोरंजनाचे उत्तम ठिकाण असलेली ही थिएटर्स नेमकी कधी उघडणार आहेत? या प्रश्नाचे उत्तम निर्माता शेखर कपूर यांनी ट्विट करुन दिले आहे. त्यांच्या या एका ट्विटमुळे बॉलीवूडमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.कारण अनेक चित्रपट चांगली कमाई करतील अशी अपेक्षा होती. पण कोरोना संकटामुळे सगळे काही बदलून गेले आणि आता सगळे कधी पूर्वपदावर येईल याचा अंदाज नाही.
आता शेखर कपूर यांनी ट्विट केलेल्या ट्विटमध्ये आहे तरी काय? असा प्रश्न पडला असेल तर शेखर कपूर यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, आताची परिस्थिती पाहता देशात थिएटर्स उघडणे किमान 1 वर्ष तरी शक्य नाही. त्यामुळे अर्थातच 100 कोटीची गल्ला जमवणारी चित्रपटांची यादी आता दिसणार नाही. चित्रपट व्यवस्था आता पूर्णपणे ढासळेल यामध्ये काहीच शंका नाही.आता ज्यांना यामध्ये आपले नुकसान करुन घ्यायचे नाही. अशांनी सरळ सोशल प्लॅटफॉर्मचा मार्ग अवलंबायला हवा या व्यतिरिक्त काही पर्याय नाही.
#BiggBoss14 मध्ये लॉकडाऊन स्पेशल थीम, स्पर्धकांना मिळणार 'या' गोष्टींची सूट
Theatres are not going to open for atleast a year. So all hype around first weeks bussiness of 100+ crores is dead. So the theatrical Star System is dead.
— Shekhar Kapur (@shekharkapur) July 14, 2020
Stars will have to go to existing OTT platform or stream films themselves through their own apps. Technology is quite simple
कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता अनेक शिथील केलेले नियम काही ठिकाणी पुन्हा कडक करण्यात आले. पण असे असले तरी काही क्षेत्र नियमांचे पालन करुन पुन्हा सुरु करण्याची परवानगीही देण्यात आली. ज्यामध्ये शूटिंगचा समावेश आहे. मालिका, चित्रपट यांचे शूटिंग सुरु झाले आहेत. अनेकांनी त्यांच्या सेटवर कशापद्धतीने शूटिंग सुरु आहे हे देखील दाखवून दिले आहे.
सुश्मिता सेनच्या भावाला मिळाली बिग बॉस 14 ची ऑफर, मात्र राजीवची आहे एक अट
मार्च महिन्यांपासून थिएटर बंद झाल्यामुळे अनेक मोठे चित्रपट रखडले आहेत. यामध्ये ‘83’, ‘सूर्यवंशी’ ‘शंकुतला’, ‘राधे’ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. पण यातील काही चित्रपटांनी कोणताही वेळ आणि पैसा न घालवता आहे त्या परिस्थितीत सोशल प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज करायचे ठरवले आहे. सडक, लक्ष्मीबॉम्ब,शंकुतला, दिल बेचारा आणि अन्य काही चित्रपटांचा यामध्ये समावेश आहे.
आता एकूणच परिस्थिती पाहता चित्रपटांचे बुरे दिनच सुरु आहेत. असे म्हणायला हवे. कारण या तीन महिन्यात कोणत्याही प्रकारचे शूटिंग किंवा नवे प्रोजेक्ट साईन करण्यात आले नाहीत. आता कुठे शूटिंगला परवानगी दिल्यानंतर टीव्ही मालिका सुरु झाल्या आहेत. पण शेखर कपूर यांनी म्हटल्याप्रमाणे जर खरंच झाले तर चित्रपटांभोवती आणि कलाकारांभोवती एक मोठं संकट फिरतयं असंच म्हणावं लागेल.
थोडक्यात काय अजूनही आपण आशा सोडायला नको. जसे सगळे पूर्वी सुरु होते तसे नक्कीच पुन्हा सुरु होणार आहे.