‘साकी गर्ल’ कोएना मित्रा सध्या चर्चेत आली आहे ती बिग बॉस 13 मुळे. इतकी वर्ष इंडस्ट्रीमधून अचानक गायब झालेली कोएना ज्यावेळी बिग बॉसमध्ये दिसली त्यानंतर तिला ओळखणे कठीण होते. इतक्या वर्षात कोएना मित्रासोबत काय झाले हे कोणालाच माहीत नाही. कोणी ते जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. पण आता बिग बॉस 13मध्ये कोएनानेच तिच्या खासगी आयुष्याचा खुलासा केला आहे. जाणून घेऊया तिच्या आयुष्याशी निगडीत महत्वाच्या गोष्टी
संजय लीला भन्सालीच्या ‘गंगुबाई काठीयावाडी’मध्ये आलिया भटची वर्णी
म्हणून कोएना मित्रा अजूनही Single
बिग बॉस 13 मध्ये कोएना मित्राने तिच्या रिलेशनशीपचा खुलासा केला आहे. ती एका टर्कीश तरुणासोबत रिलेशनशीपमध्ये होती. पण हे रिलेशनशीप फारच वाईट वळणावर येऊन संपले याचे कारण असे की, तिचा टर्कीश बॉयफ्रेंड हा एका विमान कंपनीत पायलट होता. तो तिच्यावर हक्क दाखवू लागला. तिने कुठेही जाणं त्याला पसंद नव्हते. त्याने तिला एकदा बाथरुममध्ये बंद करुन ठेवले होते. त्याला कोएनाला त्याच्या पालकांना भेटायला घेऊन जायचे होते. एकदा लग्न झाल्यानंतर कोएनाने पुन्हा परत जाऊ नये म्हणून तिचा पासपोर्ट फाटून टाकेन, अशी धमकीही दिली होती. त्यानंतर तिचे रिलेशनशीप 2010 साली संपुष्टात आले. या रिलेशनशीप आधी ती राजीव सिंह नावाच्या एका मॉडेलसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा होती. पण हे नाते फार काळ टिकले नाही.
कोएनाची प्लास्टिक सर्जरी
कोएनाने चित्रपटात फार काही काम केले नाही. पण तिने केलेला ‘साकी’ वरील डान्स अनेकांच्या लक्षात राहिला. पण त्यापेक्षाही लक्षात राहिली ती तिची प्लास्टिक सर्जरी. 2010 साली कोएनाने सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली. पण ही सर्जरी तिला फारच भारी पडली कारण या सर्जरीनंतर तिचे आयुष्य संपूर्ण बदलले. तिचे रुप तर बदललेच पण त्यामुळे तिच्या हाडांना सूजही येऊ लागली. तिच्या या सर्जरीनंतर तिला हसताही येत नव्हते. पण या बद्दल तिने कधीच कोणाला काहीच सांगितले नाही. पण तिच्या या बदलेल्या चेहऱ्यामुळे तिला काम मिळणे कठीण झाले होते. तिच्या जवळच्या व्यक्तींनाही तिचा नवा चेहरा नकोसा झाला होता.
सिनिअर सिटीझन’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार मोहन जोशी
चेक बाऊन्स प्रकरण
कित्येक दिवस सगळ्यांपासून दूर केलेली कोएना अचानक एकदा समोर आली ती चेक बाऊन्स प्रकरणामुळे. तिने एका मॉडेलकडून 22 लाख रुपये घेतले होते. पण हे पैसे परत देणे तिला जमले नाही. तिने दिलेला 3 लाख रुपयांचा चेकही बाऊन्स झाला त्यामुळे तिला 6 महिन्यांच्या कारावासाची शिक्षाही झाली होती.
देश सोडण्याची आली वेळ
कोएनाला काम मिळणे कठीण झाले होते. तिच्या त्या प्लास्टिक सर्जरीनंतर तिचे करिअरच संपले होते. पण तिने हार मानली नाही तिने तिचा एक व्हिडिओ तयार करुन तिच्या परदेशातील मित्राला पाठवला. त्यानंतर तिने कॅमेरामन ठेवून स्वत:चे व्हि़डिओ करायला सुरुवात केली. त्यानंतर तिने लॉस एंजिलसला राहणेच पसंत केले.
बिग बॉसचा प्रवास
बिग बॉस 13 मध्ये कोएना मित्रा आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. कारण तिला इतक्या वर्षानंतर लोकांनी पाहिले. या रिअॅलिटी शोमध्ये फार काळ ती टिकली नाही. पण सलमान खान तिने आल्यानंतर काही मत मांडली ती अनेकांना पटली नाहीत.
असा हा कोएना मित्राचा प्रवास कदाचित अनेकांना माहीत नसेल. पण तिने प्लास्टिक सर्जरीनंतर बराच संघर्ष केला आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.