‘फुलराणी' येणार रुपेरी पडद्यावर,शूटिंगला सुरुवात

‘फुलराणी' येणार रुपेरी पडद्यावर,शूटिंगला सुरुवात

मराठी चित्रपटांचे चाहते असाल तर तुमच्यासाठी आहे एक आनंदाची बातमी. कारण एक भन्नाट मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘फुलराणी’ असे या चित्रपटाचे नाव असून या नावावरुन प्रेक्षकांच्या आठवणी आधीपासून जुळलेल्या आहेत. फुलराणी म्हटले की, आपल्याला नाटक आठवल्यावाचून राहत नाही. प्रेक्षकांच्या मनामनात घर केलेले असे हे नाटक कित्येक वर्ष सुरु आहे. त्यामुळे नावावरुनच हे प्रेक्षकांच्या अगदी जवळचे असणार आहे हे दिसत आहे. होळी आणि रंगपंचमीचा मुहूर्त साधत या चित्रपटाच्या चित्रीकरणाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट एक प्रेम कहाणी असणार हे जरी माहीत असले तरी देखील चित्रपटाबाबत काही अंशी गुप्तता पाळण्यात आली आहे. या चित्रपटात कलाकार कोण असणार ? मुख्य भूमिकेत कोण असणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

अभिषेक बच्चनच्या 'दसवी'चं आग्रामध्ये शूटिंग झालं पूर्ण, शेअर केले मजेशीर किस्से

अशी असणार ‘फुलराणी’

 पिग्मॅलिअम कलाकृतीवर आधारीत असा ‘फुलराणी’ हा चित्रपट आहे. हा चित्रपट एक प्रेमकथा आहे. एक वेगळी फुलराणी या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे हे कळत आहे. विश्वास जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली आहे. विश्वास जोशी यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर फुलराणीचे पोस्टर दिसत आहे. त्यांनी शेअर केलेल्या पहिल्या पोस्टरमध्ये एक हॅट घातलेला तरुण सिगरेटचे झुरके ओढतोय. त्याच्या कोपऱ्यात पांढऱ्या शुभ्र फुलांचा गजरा ठेवण्यात आलेला आहे.  चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये अद्याप कोणालाही टॅग करण्यात आलेले नाही. त्यामुळे या चित्रपटात कलाकार कोण असणार असा प्रश्न पडणे साहजिक आहे.  पण अद्याप यावरुन पडदा उठलेला नाही. 

रश्मी अनपट साकारणार आर्या, वीणा जगतापने या कारणाने सोडली मालिका

शूटिंगला सुरुवात

कोरोना काळामुळे अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण थांबले होते. पण आता पुन्हा चित्रीकरणाला वेग आला आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण सुरु झाले आहेत. अनेक नवे आणि दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.त्यात आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे.  तो म्हणजे ‘फुलराणी’ या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले असून  त्या संदर्भातील एक पोस्टही विश्वास जोशी यांनी केली आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या काळात हा चित्रपट लवकरच फ्लोवर येण्याची शक्यता आहे. 

प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले करणार 'मेरे साई' मध्ये भूमिका

आणखी एका मराठी चित्रपटाची प्रतिक्षा

दरम्यान, मराठीत आणखी एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो म्हणजे ‘वेल डन बेबी’ या चित्रपटात पुष्कर जोग आणि अमृता खानविलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. आता लवकरच सोशल प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. खूप दिवसांनी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे म्हटल्यावर अनेकांनी उत्सुकता वाढली आहे. 


आता प्रतिक्षा आहे ती फुलराणी पाहण्याची या चित्रपटात कोणत्या कलाकारांची वर्णी लागली आहे ते पाहणे फारच महत्वाचे ठरणार आहे.