VIRAL VIDEOS: तुम्ही पाहिलेत का हे व्हिडिओ

VIRAL VIDEOS: तुम्ही पाहिलेत का हे व्हिडिओ

सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल व्हायला काही वेळ लागत नाही. एखादा व्हिडिओ पोस्ट करायला आणि तो व्हिडिओ हिट व्हायला वेळ लागत नाही. आज आपण असे काही व्हायरल व्हिडिओ पाहणार आहोत ज्या व्हिडिओजनी सोशल मीडियाला वेड लावले आहेत. पाहुयात असे काही व्हिडिओ जे सोशल मीडियावर झाले आहेत सुपर- डुपर हिट

हिना पांचाळचा गोव्यामध्ये हॉट 'हिप्स डोन्ट लाय' डान्स

मोदींना हरवायला पाहिजे

हल्लीच्या मुलांना स्पर्धेत टिकण्यासाठी काय काय करावं लागतं हे सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न ही मुलगी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. ही मुलगी गुजरातची असून तिने तिचा सगळा दिनक्रम सांगितला आणि शाळांनी मुलांना कशी सूट द्यायला हवी ते देखील सांगितले. ही मुलगी इतकी धीटपणाने बोलत होती की, तिचा प्रत्येक शब्द पालकांना पटला असेल. या व्हिडिओमध्ये ती पंतप्रधान मोदींना हरवण्याची गोष्टसुद्धा करत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच हसायला येतं. 

काम करुन छान दिसून दाखवा

संतूर साबणाची जाहिरात तुम्ही पाहिली असेल तर त्याची टॅगलाईनच आहे की, मेरी उमर का पता नही लगता. का तर संतुर साबण वापरते म्हणून पण या संतूर साबणाच्या जाहिरातीत काम करणाऱ्या मॉडेलला या वैदर्भीयन मुलीने चांगलाच दणका दिला आहे. कारण सर्वसामान्य महिलांप्रमाणे तुम्ही काम करुन दाखवा. मग बघू तुमचे वय दिसते की नाही. आता या मुलीने एकच ब्रँड टार्गेट केला असला तरी ही सगळ्या सौंदर्यप्रसाधानांना चपराक आहे. 

आजी आणि नातवाचा सुरेख टिकटॉक

हल्ली जो तो टिकटॉकवर आहे. काहींचे टिकटॉक व्हिडिओ इतके सुरेख असतात की, पाहात राहावेसे वाटतात असाच आहे आजी आणि नातवाचा टिकटॉक सध्याच्या घडीला हा टिकटॉक इतका व्हायरल होत आहे की, ज्याच्या त्याच्या मोबाईलमध्ये हा टिकटॉक दिस आहे. यामध्ये आजी इतका सुंदर अभिनय करत आहे की पाहता क्षणीच तुमच्या ओठांवर हसू आल्यावाचून राहात नाही.

‘तारक मेहता’मधील अभिनेत्री प्रिया अहुजाच्या घरी आला नवा पाहुणा, शेअर केला फोटो

अरे मला खाली उतरवा

मध्यंतरी पॅराग्लायडिंग करतानाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. हातात सेल्फी स्टीक घेऊन हा माणूस आकाशात झेपावतो खरा. पण अगदी काहीच सेकंदात त्याला खाली उतरावेसे वाटते. तो त्या माणसाला खाली उतरायला सांगतो. पण खाली येण्यासाठीही त्याला थोडा वेळ लागणार असतो. तो त्याला खाली उतरण्याआधी पाय वर करायला सांगतो. पण हा माणूस पायच वर करत नसतो. यावेळी त्याचे जे संभाषण सुरु असते ते इतके विनोदी असते की हसायला आल्यावाचून राहत नाही.

लग्नाचे विनोदी व्हिडिओ

आता शेवटचा व्हिडिओ हा एखाद्या व्यक्तीचा नाही तर तुम्ही फेसबुक किंवा युट्युबवर पाहिला असेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अशी लग्न नेमकी होतात कुठे असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. या व्हिडिओसंदर्भात काही बोलण्यापेक्षा तुम्ही पाहिलेलाच बरा.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच  POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty  लिंकवर क्लिक करा.