पॉर्न व्हिडिओ बनवण्याच्या आरोपाखाली अभिनेत्रीस अटक

पॉर्न व्हिडिओ बनवण्याच्या आरोपाखाली अभिनेत्रीस अटक

‘गंदी बात’ या वेबसिरिजमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ सतत काहीना काही कारणास्तव चर्चेत असते. आता एका नव्या प्रकरणात तिचे नाव पुढे येऊ लागले आहे. या अभिनेत्रीने पॉर्न व्हिडिओ बनवून तो पोस्ट केल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला आहे. एडल्ट सीरिजमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्रीच्या अशा कृत्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. पण तिच्यावर झालेले आरोप तिच्या पीआरने फेटाळले असून गहनाने असे काहीही केलेले नाही असे सांगत तिची बाजू घेतली आहे. नेमकं हे प्रकरण काय ते जाणून घेऊया. दरम्यान, गहना ही 10 दिवस पोलिसांच्या कस्टीमध्ये असून तिच्या सुटकेचे प्रयत्न सध्या सुरु आहेत.

तो व्हिडिओ पॉर्न व्हिडिओ नव्हे

Instagram

गहना वशिष्ठने केलेला हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. हा अश्लील व्हिडिओ शेअर केल्यामुळे ती वादात अडकली होती. पण तिच्या प्रवक्त्याने हे आरोप फेटाळून लावले आहेत. तिचा हा व्हिडिओ जीवी स्टुडिओसाठी बनवण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून हा व्हिडिओ कोणत्याही पद्धतीने पॉर्न व्हिडिओ यामध्ये येत नाही असे सांगितले आहे.त्यामुळे यामध्ये गहनाचा काहीही दोष नाही असे म्हटले आहे. गहनाच्या त्या व्हिडिओचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून तिला नाहक या सगळ्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्याचेही त्याने सांगितले आहे. 

दुबईत नाही 'या' ठिकाणी होणार सलमानच्या टायगर 3 चं शूटिंग

जीवी स्टुडिओ तिचीच कंपनी

गहना ही जीवी स्टुडिओची मालकीण असून तिच यासाठी व्हिडिओची निर्मिती करते. ती दिग्दर्शन आणि निर्मिती अशा दोन्ही गोष्टी करते. त्यामुळेच तिने या व्हिडिओची निर्मिती केली. हा व्हिडिओ सगळ्या नियमांचे पालन करुन तयार करण्यात आला आहे. यामध्ये कोणतेही पॉर्न घटक नाही की ज्यामुळे तिच्यावर अशापद्धतीने आरोप करण्यात येईल.  हा व्हिडिओ अॅडल्ट व्हिडिओ या गटात येत असून त्याला ‘एरोटिक’ असा दर्जा देण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली आहे. 

गहनाला फसवले जात आहे

इतकेच नाही तर गहनाला यामध्ये फसवले जात असल्याचे देखील म्हटले जात आहे. गहनाच्या प्रवक्त्याने प्रतिस्पर्धींवर घणाघाती आरोप केला असून तिला या क्षेत्रातून बाहेर काढण्यासाठी आणि चुकीच्या पद्धतीने नाव खराब करण्यासाठी तिच्या या नव्या व्हिडिओची चुकीची प्रसिद्धी केली जात आहे. त्यामुळे हा एक प्रकारे गहनाला फसवण्यासाठी केलेला ट्रॅप असल्याचे म्हटले आहे. अशा आरोपांमुळे तिचे नाहक नाव बदनाम होऊ लागले आहे. जे आजच्या काळात फारच चुकीचे आहे.

पुढच्या आठवड्यात होणार करिना पुन्हा एकदा आई, दुसऱ्या बाळाचे करणार आगमन

कोण आहे गहना वशिष्ठ

Instagram

अभिनेत्री गहना वशिष्ठला आतापर्यंत अनेकांनी  एकता कपूरच्या गंदी बात मधून पाहिले असेल. पण गहनाची तितकीच ओळख नाही. गहना ही मिस इंडिया बिकिनीची विजेती असून तिने हिंदी आणि तेलुगु मालिकांमधून काम केले आहे. गहनाची स्वत:ची वेबसाईट असून ती त्यावर आपले व्हिडिओ पोस्ट करत असते. पण एरोटिक व्हिडिओ पोस्ट करणारी ती पहिली अभिनेत्री नाही तर अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्या त्यांचे अशा पद्धतीचे व्हिडिओ पैसे घेऊन पोस्ट करतात. यामध्ये चूक काय आहे ? आणि इतरांच्या तुलनेत मीच दोषी कशी अशीही विचारणा तिने केली आहे. 


सध्या गहना पोलिसांच्या ताब्यात असून तिची यातून सुटका होते की नाही ते लवकरच कळेल.

लांबलेल्या मालिकांचा प्रेक्षकांनाही आलाय कंटाळा