मुंबईची माफिया क्वीन 'गंगूबाई काठियावाडी', आलिया भटचा फर्स्ट लुक रिलीज

मुंबईची माफिया क्वीन 'गंगूबाई काठियावाडी', आलिया भटचा फर्स्ट लुक रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt)चा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित आगामी सिनेमा  'गंगूबाई काठियावाड़ी (Gangubai Kathiawadi First Look)'चा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमामध्ये आलिया भट मुंबईची माफिया क्वीन गंगूबाईची भूमिका साकारत आहे. अतिशय लहान वयात देहविक्रीसाठी गंगूबाईंवर जबरदस्ती करण्यात आली होती. देहविक्री करताना कित्येक कुख्यात गुन्हेगार गंगूबाईशी जोडले गेले. या सिनेमाद्वारे गंगूबाई आणि माफिया वर्ल्ड आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. संजय लीला भन्साली (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित या सिनेमात आलिया भट प्रेक्षकांना एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.  

(वाचा : ‘बह्मास्त्र’च्या सेटवरील आलिया-रणबीरचा ‘हा’ फोटो व्हायरल)

आलिया साकारणार माफिया क्वीनची भूमिका

'गंगूबाई काठियावाड़ी (Gangubai Kathiawadi)' सिनेमातील पहिल्या लुकचा पोस्टर आलियानं आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केलं आहे. पोस्टमध्ये आलियानं लिहिलंय की, ‘या आहेत गंगूबाई काठियावाड़ी..." आलियानं शेअर केलेल्या दोन्ही पोस्टरवर तिचा लुक आकर्षक आणि निराळा आहे. या लुकवर तिच्या चाहत्यांनी लाइक्सचा पाऊस पाडला आहे.संजय लीला भन्साली यांच्यासोबत आलियाचा हा पहिलाच सिनेमा आहे.  हा सिनेमा 11 सप्टेंबर रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. 

(वाचा : ‘हिरकणी’नंतर प्रसाद ओक करणार विश्वास पाटलांच्या ‘चंद्रमुखी’चं दिग्दर्शन)

आलिया-रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाची प्रतीक्षा

दुसरीकडे, आलिया भट आणि रणबीर कपूर यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) 2020मध्ये बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित सिनेमा ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर कपूर- आलिया भटव्यतिरिक्त सिनेमामध्ये महानायक अभिताभ बच्चन यांचीही प्रमुख भूमिका आहे. तसंच सिनेमामध्ये मौनी रॉय, नागार्जुन, डिंपल कपाडिया, प्रतीक बब्बर देखील दिसणार आहेत. अभिनेत्री मौनी रॉय 'ब्रह्मास्त्र' मध्ये खलनायिकेची भूमिका साकारत आहे. करण जोहर या सिनेमाचे निर्माते आहेत. मे 2020 पर्यंत सिनेमा मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

(वाचा : भाईजान सलमानचा व्हिलनसोबत दोस्ताना, कोट्यवधींची कार केली गिफ्ट)

आलिया भटला लागली लॉटरी, एस.एस.राजमौलीचा सिनेमा

'उडता पंजाब', 'लव्ह यु जिंदगी', 'बद्री की दुल्हनिया', 'राझी' असे हिट चित्रपट आलियानं बॉलिवूडला दिले आहेत. तिच्या नावाचा दबदबा ओळखूनच बाहुबलीच्या मेकर्सनी तिला एका चित्रपटासाठी साईन केल्याचे कळत आहे. एस.एस. राजमौली यांनी स्वत: आलियाकडून हा सिनेमा साईन करून घेतला असून बाहुबलीप्रमाणेच हा देखील एक बीग बजेट सिनेमा असणार आहे.

चित्रपट कोणता?
बाहुबलीच्या यशानंतर एस.एस.राजमौली यांना खूप प्रसिद्धी मिळाली. ज्या बाहुबलीच्या स्क्रिप्टला बॉलीवूडमधील अभिनेत्यांनी नाकारले होते. त्यांना बाहुबलीच्या यशानंतर नक्कीच पश्चाताप झाला होता. त्यामुळे आता राजमौली कोणता नवा चित्रपट घेऊन येणार ही उत्सुकता सगळ्यांनाच होती पण ही लॉटरी आलियाला लागली आहे. कारण आलियाने एस.एस. राजमौली यांचा रामा रावणा राज्यम (RRR) ही फिल्म साईन केली आहे. या चित्रपटाची औपचारिक घोषणा अद्याप करण्यात आली नसली तरी हा चित्रपट आलियाने फायनल केला आहे असे कळत आहे.

हे देखील वाचा :

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.