प्रेग्नंसीच्या बातमीवर भडकली गौहर खान, म्हणाली…

प्रेग्नंसीच्या बातमीवर भडकली गौहर खान, म्हणाली…

सेलिब्रिटींच्या प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यात मीडियाला फारच रस असतो. त्यांचे अपकमिंग प्रोजेक्टस, अफेअर्स ,लग्न, गूड न्यूज अशा सगळ्या गोष्टी त्यांना जाणून घ्यायच्या असतात. पण कधीकधी आपल्या बातमीकडे आकृष्ट करण्यासाठी अशी एखादी गोष्ट केली जाते की, त्यामुळे सेलिब्रिटींचाही राग अनावर होतो. असेच काहीसे झाले नवविवाहित अभिनेत्री गौहर खानसोबत. तिच्या लग्नाला काही महिने होत नाही तोच तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांनी जोर धरला आहे. गौहर खानने तिच्या प्रेग्नंसीची बातमी वाचल्यानंतर ती इतकी भडकली की, तिने ट्विट करत आपला राग व्यक्त केला आहे. पण गौहर प्रेग्नंट आहे अशा बातमीने जोर का धरावा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर वाचा ही बातमी

झैदची पोस्ट पडली महागात

खरंतरं गौहर प्रेग्नंट आहे असे वाटायला गौहरचा नवरा झैदची पोस्टच जबाबदार आहे, जैदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत ‘शू….. कोई आ रहा है’, अशा आशयाचा एक व्हिडिओ शेअर केला. प्रेक्षकांनी ही एक ओळ ऐकतच शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. त्याच्या या व्हिडिओ खाली गौहर प्रेग्नंट आहे अशाच कमेंट पडू लागल्या.  घरी येणारा नवा पाहुणा म्हणजे तान्हुले बाळच असणार असे म्हणत तो व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होऊ लागला. त्याच्या या व्हिडिओनंतरच एका मीडिया हाऊसने लग्नाच्या तीन महिन्यानंतर गौहर आई होणार असल्याची बातमी केली आणि एकच गोंधळ उडाला. दरम्यान, हा व्हिडिओ झैदने त्याच्या नव्या गाण्यासाठी केला आहे. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर कळते. 

माझ्या नवऱ्याची बायकोचा येणार सिक्वल, या फोटोमुळे जोरदार चर्चा

गौहरने घेतला समाचार

गौहर खानने या बातमीकडे मुळीच दुर्लक्ष केले नाही. तिने लगेचच त्याचा एक स्क्रिनशॉट काढत चुकीची बातमी केल्याचा राग व्यक्त केला आहे. तिने यात लिहिले आहे की, तुमचे डोके ठिकाणावर आहे का? आधी 12 वर्ष मोठी असल्याची बातमी चुकीची आता ही नवीन बातमीही तशी.. एखाद्या गोष्टीचा अभ्यास करुन ती बातमी का दिली जात नाही. माझ्या वडिलांचे हल्लीच निधन झाले आहे. आम्ही कुटुंब या दु:खात आहोत. त्यामुळे बिनबुडाच्या बातमी देणे थांबवा.मी प्रेग्नंट नाही. धन्यवाद!, अशा खरमरीत शब्दात तिने ही टीका केली आहे.

उर्मिला मातोंडकरचा कमबॅक, बारा वर्षांनंतर करणार चित्रपटात काम

रॉयल सोहळा पार

गौहर खानचे लग्न हे एखाद्या स्वप्नवत सोहळ्यासारखे होते. नव्या वर्षात तिने या नव्या आयुष्याला सुरुवात केली झैद हा गायक असून त्याचे असंख्य चाहते आहेत. तर मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली गौहर खान ही बिग बॉसच्या 7 व्या सीझनची विजेती आहे.तिचे सीझन तिने तिच्या आदर्शावर दणाणून सोडले होते.2020 दरम्यान झैदसोबत तिच्या अफेअर्सची चर्चा जोर धरु लागली. त्यानंतर त्यांनी त्यांचे नाते कबुल है करत लग्न केले. या  वर्षाची सुरुवात ही त्यांच्या रॉयल लग्नसोहळ्याने झाली. 


दरम्यान, गौहर खानही प्रेग्नंट नाही या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. 

महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकरावर आधारित बॉलीवूड गाणी