गौहर - झेद करणार 25 डिसेंबरला लग्न, प्री वेडिंगसाठी निवडले पुण्यातील रॉयल लोकेशन

गौहर - झेद करणार 25 डिसेंबरला निकाह, प्री वेडिंगसाठी निवडले पुण्यातील रॉयल लोकेशन

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री गौहर खानला तिचा प्रियकर झेद दरबारने लग्नाची मागणी घातली आणि गौहरने त्याच्या प्रस्तावाला होकार दिला. गौहर खान ‘बिग बॉस 7’ जिंकली होती आणि काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा घरात सिनिअर म्हणून गेली होती. बाहेर आल्यानंतर झेदने तिला लग्नाची मागणी घालत सुखद धक्का दिला. चाहत्यांनाही नक्कीच या क्षणाची आतुरता लागली होती. झेद दरबार डान्स कोरिओग्राफर असून गौहरपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. गौहर आणि झेदच्या लग्नाची तारीख निश्चित झाल्याचे सुत्रांकडून समजत आहे. यावर्षी 25 डिसेंबरला ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. या दोघांचा निकाह निश्चित झाला असून मुंबईतील आयटीसी मराठा लक्झरी हॉटेलमध्ये करण्यात येणार आहे.

Good News: कपिल शर्मा पुन्हा होणार बाबा, जानेवारीमध्ये गिन्नी देणार दुसऱ्या बाळाला जन्म

प्री - वेडिंगसाठी निवडले पुण्याचे जाधवगड हॉटेल

लग्नाच्या आधी जोडप्यांमधील क्षण टिपणे हा तर आता ट्रेंड झाला आहे. यानुसार गौहर आणि झेदने आपल्या प्री वेडिंग शूटसाठी जाधवगड हॉटेल निवडले आहे. गौहर खानच्या आवडीप्रमाणेच हे निवडण्यात आले आहे. गौहरला प्री वेडिंग शूट एखाद्या रॉयल जागी करायचे असल्यामुळे ही जागा निश्चित करण्यात आली आहे. तर झेद नेहमीच गौहरची काळजी घेताना दिसतो. त्यांचे अनेक व्हिडिओदेखील व्हायरल झाले असून नुकताच झेदचा वाढदिवस या दोघांनी साजरा केला आणि दोघेही दुबईला ट्रिपसाठी रवाना झाले होते. आता दोघांनीही निकाहची तयारी करायला सुरूवात केली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान झेद आणि गौहर दोघांचेही अनेक नातेवाईक दुबईत असल्याने तेदेखील लवकरच मुंबईत येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

गांजा प्रकरणामुळे भारतीची 'द कपिल शर्मा शो'मधून हकालपट्टी, तितली आता दिसणार नाही

22 डिसेंबरपासून होणार लग्नाच्या रितीभातींना सुरूवात

गौहर आणि झेदच्या लग्नाची 25 डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली असून 22 डिसेंबरपासून अन्य कार्यक्रमांना अर्थात मेंदी आणि संगीत या गोष्टींना सुरूवात होणार आहे. हे लग्न केवळ घरच्या माणसांच्या आणि दोघांच्याही अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. कोरोनामुळे जास्त लोकांना निमंत्रण देण्यात येणार नाही. गेल्या काही महिन्यांपासूनच या दोघांच्या  प्रेमाची चर्चा सुरू होती. मात्र दोघांनीही काहीही घोषणा केली नव्हती. मात्र शो मधून परत आल्यावर झेदने लग्नाची मागणी घालत गौहरला आणि अगदी तिच्या चाहत्यांनाही सुखद धक्का दिला. झेदच्या वडिलांनीही गौहरचा हसत हसत स्वीकार केला आहे. आपल्या मुलाच्या आनंदापुढे काहीही महत्वाचे नाही असं इस्माईल दरबार यांनी म्हटलं होते.  गौहरचे व्हायरल झालेले फोटो हेच दर्शवतात की झेदच्या कुटुंबासह गौहर अगदी मिळून मिसळून गेली आहे आणि त्यांनीही तिला ती जशी आहे तसंच स्वीकारलं आहे. गौहर नेहमी तिच्या फॅशनसाठीही ओळखली जाते.  त्यामुळे आता स्वतःच्या लग्नामध्ये गौहर कशी दिसणार याचीही सर्वांना उत्सुकता लागून  राहिली आहे.  सध्या  दोन्ही घरांमध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू असल्याची चर्चा असून लग्नाला आता केवळ एकच महिना राहिल्याने खूपच गडबड सुरू असल्याचे दिसून येते आहे. 

हिना खानसारखे सिल्की आणि चमकदार केस हवे तर फॉलो करा या टिप्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक