गौहर आणि झेदची लगीनघाई, फोटो होत आहेत व्हायरल

गौहर आणि झेदची लगीनघाई, फोटो होत आहेत व्हायरल

सेलिब्रिटी लग्नांना लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर सुरुवात झाली आहे. 2020 हे साल काही सेलिब्रिटींच्या आयुष्यात आनंद देखील घेऊन आले आहे. त्यापैकीच एक म्हणजे बिग बॉस फेम ‘गौहर खान’. संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबारचा मुलगा झेद खान लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच्या या लग्नसोहळ्याला सुरुवात झाली आहे. त्यांच्या लग्नाची ‘चिकसा’ ही सेरेमनी सुरु झाली असून या खास दिवसाचे त्यांचे फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे. येत्या 25 डिसेंबर त्यांचा हा विवाहसोहळा होणार आहे. या दोघांनी त्यांचे लग्न मुळीच लपवले नाही. उलट त्यांनी त्यांच्या साखरपुड्यापासून सगळे फोटो सोशल मीडियावर त्यांच्या फॅन्ससाठी शेअर केले आहेत.

गौहर - झेद करणार 25 डिसेंबरला लग्न, प्री वेडिंगसाठी निवडले पुण्यातील रॉयल लोकेशन

कुडता पीला… पीला

Instagram

चिकसा सेरेमनी अर्थातच मुस्लिम धर्मियांमध्ये हळदी हा समांरभ. या समारंभाचे फोटो गौहर आणि झेदने शेअर केले आहे. या सेरेमनीसाठी या दोघांनी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. गौहर ही पिवळ्या लेहंग्यामध्ये दिसत आहे. तर झैदने पिवळ्या रंगाचा कुडता घातला आहे. या लग्नाचे नुसते फोटो नाही तर व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ते नाचताना दिसत आहे. त्यांच्या प्री वेडिंग सोहळ्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. कोरोनाच्या काळातही तिने हे रॉयल लग्न केले आहे. त्याची तयारीही तिने जोरदार केल्याचे दिसत आहे.

2020 मध्ये यांचे उजळून निघाले भाग्य, मिळाली अमाप प्रसिद्धी

डिजिटल पत्रिकाही आहे सुंदर

सध्याच्या काळात पत्रिकांचा ट्रेंडही हल्ली बदलला आहे. डिजिटल पत्रिका हा काळ सध्या दिसून आला आहे. गौहर- झेद यांची डिजिटल पत्रिकाही तितकीच सुंदर आहे. त्यांनी या पत्रिकेमध्ये त्यांची एक क्युट लव्हस्टोरी शेअर केली आहे. त्यांच्या प्रेमाची सुरुवात कशी झाली आणि ते प्रेम कसे सुरु झाले ही प्रेम कहाणी त्यांनी या पत्रिकेत दाखवली आहे. प्रेमाचा लग्नानंतरचा प्रवास त्यांनी या पत्रिकेमध्ये दाखवला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी केरिकेचर्सचा उपयोग करण्या आला आहे. ज्यामुळे ही पत्रिका अधिक क्युट दिसत आहे. 

ख्रिमसमच्या दिवशी अडकणार विवाहबंधनात

25 डिसेंबर रोजी गौहर आणि झेद विवाहबंधनात अडकणार असून त्यांचा हा शाही लग्नसोहळा मुंबईच्या आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये होणार आहे. त्यांनी त्यांच्या लग्नसोहळ्यातील वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी वेगवेगळी ठिकाणं निवडली. पुण्यातील जाधवगड हॉटेलमध्ये त्यांनी त्यांचे प्री वेडिंग शूट केले आहे. आता त्यांचा लग्नसोहळा जवळ आल्यामुळे त्यांच्या घरात लगीनघाई सुरु झाली आहे. 

लग्नाच्या लुकची प्रतिक्षा

सेलिब्रिंटीचे लग्न म्हटले की,लोकांना त्यांच्या लुकची उत्सुकता असते. गौहरने तिच्या लग्नासाठी खास तयारी केलेली दिसते. तिच्या लग्नाची पत्रिका पाहिल्यानंतर आणि तिच्या प्री वेडिंगसाठी तिने निवडलेले लोकेशन पाहता तिच्या लग्नातला तिचा लुक कसा असणार हे पाहण्याची उत्सुकता अनेकांना आहे. 


सध्या जर तुम्ही पत्रिकेसाठी काही खास शोधत असाल तर तुम्ही गौहर आणि झेदची पत्रिका नक्कीच पाहायला हवी.

Bigg Boss 14: रुबिना झाली नवी कॅप्टन, कश्मिरा शहाची एक्झिट

Make Up

MyGlamm Treat Love Care Brightening Foundation

INR 995 AT MyGlamm