#Nostalgia : गौरीने शाहरूख-काजोलचा हा लुक केला होता डिझाईन

#Nostalgia : गौरीने शाहरूख-काजोलचा हा लुक केला होता डिझाईन

शाहरूखच्या फॅन्ससाठी आजचा दिवस फारच खास आहे. कारण आज किंग खान शाहरूखबाबत एक नाही दोन नाही तर तब्बल तीन बातम्या व्हायरल होत आहेत. मग तुम्हीही असाल तर शाहरूख फॅन तर जाणून घ्या SRK बाबतचे हे लेटेस्ट अपडेट्स.

गौरीने शाहरूखचा स्पेशल फोटो केला शेअर

गौरी खानने गुरुवारी #throwbackthursday मध्ये शाहरूख-आणि काजोलच्या गाजलेल्या बाजीगर चित्रपटाचा हा फोटो शेअर केला. या फोटोसोबतच तिने सांगितली याबाबतची एक आठवणही.

शाहरूख खान आणि काजोलचा बाजीगर हा चित्रपट बॉलीवूडमधील एक आयकॉनिक चित्रपट आणि शाहरूखच्या करिअरमधील मैलाचा दगड मानला जातो. या चित्रपटाची गाणी, कथा आणि डायलॉग्ज्स आजही फॅन्सना अगदी तोंडपाठ आहेत. एवढंच नाहीतर शाहरूख-काजोलचं या चित्रपटातील ये काली काली आँखे हे गाणं त्याकाळी खूपच गाजलं होतं आणि त्यांचा लुकही आवडला होता. या चित्रपटानंतर शाहरूख बॉलीवूडचा बाजीगर बनला होता. तर याच गाण्यातील खास लुकबाबत गौरीने सांगितलं की, दोघांचा हा लुक तिने डिझाईन केला होता. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये गौरीने लिहीलं आहे की, मला विश्वासचं बसत नाही की, 90s मध्ये हा लुक मी डिझाईन केला होता. ती जीन्स, लेगवॉर्मर टीशर्ट, बुलेट बुलेट बेल्ट, लाल शर्ट आणि हँडपेंटेड जीन्स या माझ्या फेव्हरेट्स आहेत. 

शाहरूख आणि काजोलची एव्हरग्रीन जोडी

शाहरुख आणि काजोलची जोडीही मोठ्या पडद्यावर सर्वात जास्त पसंत केली जाणाऱ्या जोड्यांपैकी एक आहे. या जोडीचा हा पहिला एकत्र आलेला चित्रपट होता. या चित्रपटानंतर शाहरूख-काजोल जोडीचे 'कुछ-कुछ होता है', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'कभी खुशी कभी गम', 'माय नेम इज खान' सारखे सुपरहिट चित्रपट एकत्र दिले.

अबरामसोबत शाहरूखने केलं बाप्पाचं विसर्जन

मागचे काही दिवस प्रत्येकजण गणपती बाप्पाच्या भक्तीत गुंग होता. याला अपवाद बॉलीवूड स्टार्सचाही नव्हता. शाहरुख खाननेही आपल्या घरी मुलगा अबरामसोबत गणपतीची पूजा केली आणि गणपतीचं विसर्जनही केलं. शाहरुख खानने ट्विटरवर पूजेचा फोटो शेअर केला. या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये शाहरूखने लिहीलं होतं की, 'पूजा झाली, विसर्जन झालं, गणपती बाप्पा मोरया. जगभरातील सुख प्रत्येक घरात आणि प्रत्येक कुटुंबाला मिळो.'

तुमच्या माहितीसाठी शाहरुख खान प्रत्येक सण आपल्या घरी धूमधडाक्यात साजरा करतो. जन्माष्टमीच्या दिवशी दहीहंडी फोडतानाही शाहरूख दिसतो तर याशिवाय ईद आणि दिवाळी हे सणही शाहरूखकडे जोरदार असतात.

SRK च्या फॅन्सनी सुरू केलं बर्थडे काऊंटडाऊन

साधारणतः फॅन्स प्रत्येक स्टारच्या जन्मदिवशी त्याला शुभेच्छा देतात. पण आता बॉलीवूडच्या किंग खानचा वाढदिवस आहे म्हटल्यावर काहीतरी खास असणारच ना. त्यामुळेच की काय शाहरूखच्या वाढदिवसाच्या 50 दिवसआधी शाहरूख फॅन्सनी काऊंटडाऊनचं ट्विट केलं आहे. #Twitter वर शाहरूख फॅन्सनी #50daysforsrkday या हॅशटॅगने ट्वीट केलं आहे. प्रत्येकजण आतापासूनच शाहरूखला शुभेच्छा देत आहे आणि त्याच्या आगामी चित्रपटाच्या घोषणेची वाट पाहत आहे.