'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या मंचावर गीता माँ ची हजेरी

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या मंचावर गीता माँ ची हजेरी

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' हा कार्यक्रम आता निर्णायक वळणावर येऊन पोचला आहे. गेले अनेक आठवडे स्पर्धक आणि त्यांचे गुरू यांनी महाराष्ट्राला आपल्या नृत्याची चुणूक दाखवली आहे. आता या स्पर्धेत टॉप 5 स्पर्धक उरले आहेत. सेमीफिनाले च्या या कार्यक्रमात नृत्याच्या महागुरू प्रसिद्ध गीता माँ अर्थात गीता कपूर येणार आहेत. गीता माँ गेली अनेक वर्षं नृत्यसृष्टीत कार्यरत असून त्यांच्याकडून कित्येक जणांनी नृत्य शिकलं आहे. कोणताही नृत्याचा असा रियालिटी शो नसेल जिथे गीता कपूर नाव माहीत नसेल. प्रत्येक नृत्याच्या शो मध्ये गीता माँ ची एकदा तरी हजेरी लागतेच. काही दिवसातच हिंदी बेस्ट डान्सर शो देखील येत आहे. तसंच मराठी बेस्ट डान्सर शो आता लवकरच संपणार असून पहिला बेस्ट डान्सर मराठी शो मधील महाराष्ट्राला मिळणार आहे. त्यामुळे आता सगळेच नृत्याची आवड असणारे या स्पर्धकाच्या घोषणेकडे डोळे लाऊन बसले आहेत.

खुर्चीसाठी राजकारणात होणारे डावपेच लवकरच ‘खुर्ची’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर

अनोखा नृत्याविष्कार आज पाहायला मिळणार

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या मंचावर आतापर्यंत अनेक डोळे दिपवणारे नृत्याविष्कार गेले अनेक महिने प्रेक्षकांना पाहायाला मिळत आहेत. या आठवड्यात सेमी फिनाले आठवडा असून आज रात्री एक अनोखा नृत्याविष्कार 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या मंचावर पाहायला मिळणार आहे. एका कारमध्ये अपेक्षा आणि आशुतोष यांनी संपूर्ण नृत्य सादर केलं आहे. हे पूर्ण नृत्य एका टेकमध्ये केलं असून यात कोणतंही संपादन केलेलं नाही. रियालिटी शोच्या मंचावर झालेलं हे असं पहिलंच सादरीकरण आहे.   प्राची प्रजापती, दीपक हुलसुरे, अपेक्षा लोंढे, प्रथमेश माने आणि अदिती जाधव या टॉप पाच स्पर्धकांपैकी एक जण जिंकणार आहे 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'चा चषक. या सर्व स्पर्धकांनी आतापर्यंत याठिकाणी पोहचण्यासाठी अत्यंत मेहनत घेतली आहे. त्यामुळे आता या स्पर्धकांपैकी नक्की प्रेक्षक कोणाला जास्त मत देणार याची उत्सुकता सर्वांना लगाली आहे. प्रत्येक स्पर्धकांची वेगळी स्टाईल आहे. त्यामुळे नक्की कोणाला मत द्यायचे हा प्रश्न आता नृत्याच्या चाहत्यांनाही नक्की पडला असेल. 

'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सीक्वलमध्ये आलिया, तरूणींच्या जीवनावर आधारित आहे कथा

गीता कपूरच्या येण्याने शो मध्ये अधिक मजा

गीता कपूरला नृत्याची माँ असं म्हटलं जातं. धर्मेशच्या आयुष्यात गीता कपूरचे स्थान अढळ आहे हे प्रत्येकाला माहीत आहे. त्यामुळे सेमी फायनलच्या वेळी गीता कपूच्या येण्याने 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या मंचावर अधिक धमाल झाली आहे. केवळ स्पर्धकच नाही तर अगदी परीक्षक धर्मेश आणि पूजा सावंतनेही मंचावर धमाल केली आहे. हीच धमाल आज प्रेक्षकांनाही पाहयला मिळणार आहे. तर या नृत्याविष्कारानंतरच सर्वांना स्पर्धकांना मत देऊन चषकासाठी नक्की कोण मानकरी ठरणार हे निवडायचे आहे. गुरू शिष्याची कोणती जोडी आता सेमी फायनल पर्यंत येऊन जिंकणार आणि कोण मागे राहणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. याचा निर्णय पुढच्याच आठवड्यात होणार आहे. तर धर्मेश येलांडे आणि पूजा सावंत यांनी या आठवड्यात स्पर्धकांसह गीता कपूरसह मंचावर खूपच धमाल केली आहे आणि आज रात्री ही धमाल सर्वांना पाहायला मिळेल.

राखी सावंतचा हा फनी व्हिडिओ तुम्ही पाहिलात का, अजूनही आहे बिग बॉसच्या घरात

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक