#GoodNews : कुस्तीपटू गीता फोगट लवकरच होणार आई

#GoodNews : कुस्तीपटू गीता फोगट लवकरच होणार आई

दंगल गर्ल गीता फोगटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या प्रेग्नंसीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबतच तिने मातृत्वाबाबतच्या आपल्या भावनाही शेअर केल्या आहेत. ज्या तिच्या फॅन्सना आवडत आहेत. 

 

कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकलेली दंगल गर्ल गीता फोगटने आपला एक गोड फोटो तिच्या सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. जो तिच्या फॅन्सना खूप आवडत आहे. या फोटोसोबतच गीताने ती प्रेग्नंट असल्याची बातमी शेअर केली आहे. तसंच मातृत्वाबाबतच्या भावनाही शेअर केल्या आहेत. पाहा गीताचा हा गोड फोटो. 

गीताने तिच्या बेबी बंपवर दोन्ही हाथ ठेवून एका निसर्गरम्य पर्वत रांगा असलेल्या ठिकाणी हा सुंदर फोटो काढला आहे. या फोटोसोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे तेही फारच सुंदर आहे. जे ती सध्या अनुभवत आहे.

गीता फोगटने लिहीलं आहे की, 'एका आईचा आनंद तेव्हाच सुरू होतो जेव्हा तिच्यामध्ये एका नव्या जीवाची सुरूवात होते. जेव्हा पहिल्यांदा एका तान्ह्या जीवाची धडधड ऐकू येते, खेळीमेळीत त्याची पिटुकली किक आपल्या आठवण करून देते की, तुम्ही एकट्या नाही आहात. तुम्ही तोपर्यंत आयुष्याचा अर्थ समजू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही मातृत्वाचा अनुभव घेत नाही.

या कॅप्शनसोबत गीताने प्रेग्नंसी, बेबीबंप आणि मदरहूड इन साईड अशा शब्दांचे हॅशटॅग वापरले आहेत. इन्स्टाग्रामवर सध्या हा फोटो व्हायरल होत आहे. आत्तापर्यंत लाखभर लोकांनी हा फोटो लाईकसुद्धा केला आहे.

2016 साली गीता फोगटने कुस्तीपटू पवन कुमार सरोहाशी लग्न केलं होतं. गीताप्रमाणेच पवनसुद्धा इंटरनॅशनल कुस्तीपटू आहे. कुस्तीतील गीता फोगट, तिच्या बहिणी आणि वडिल महावीर फोगट यांच्या जीवनप्रवासावर आधारित दंगल हा हिंदी सिनेमाही येऊन गेला आहे. जो सुपरहिट ठरला होता. गीताने खतरों के खिलाडी या रिएलिटी शोमध्येही भाग घेतला होता.