Good News: अभ्या अर्थात समीर परांजपे झाला बाबा, कन्यारत्नाचा जन्म

Good News: अभ्या अर्थात समीर परांजपे झाला बाबा, कन्यारत्नाचा जन्म

मराठी मालिकांमुळे काही कलाकार हे आपल्या घरातीलच एक होऊन जातात. असाच सध्या आपल्या घराघरामध्ये पोहचलेला कलाकार म्हणजे अभ्या - अभिमन्यू अर्थात समीर परांजपे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून अभिमन्यूने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. अभ्याच्या अर्थात समीरच्या घरी आता एका गोंडस परीचा जन्म झाला आहे. समीरची पत्नी अनुजा परांजपेने मुलीला जन्म दिला असून ही गुड न्यूज शेअर केली आहे. पाच दिवसांपूर्वी मुलीचा जन्म झला असून समीर अत्यंत आनंदी आहे. यावर्षात अनेक सेलिब्रिटींची लग्न आणि अनेकांच्या घरी गुड न्यूज येत आहे. समीरच्या घरीही अशीच गुड न्यूज आल्याने समीरचा आनंद गगनात मावत नाहीये. याशिवाय समीरची मालिकाही खूप गाजत आहे.

'माझ्या मित्राची गर्लफ्रेंड' फेम अभिनेत्री प्राजक्ता परब अडकली विवाहबंधनात

क्लास ऑफ 83 मधील अस्लम

समीरने नाटकांमधून काम करायला कॉलेजमध्ये असतानाच सुरूवात केली होती. त्याला गोठ या मराठी मालिकेतून घराघरात ओळख मिळाली. पण खरी ओळख मिळाली ती वेबसिरीजमध्ये साकारलेल्या अस्लम खान या भूमिकेमुळे. क्लास ऑफ 83 मधील इमानदार अस्लम सर्वांच्याच लक्षात राहिला. त्यानंतर सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील अभ्या तर सर्वांंचाच लाडका झाला. सध्या ही मालिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. समीर परांजपेचा मालिकांमधील ग्राफ आता चांगलाच वाढला आहे. तर समीरची बायको अनुजा परांजपे ही सॉफ्टवेअर इंजिनिअर असून ती पुण्यात असते.  समीर मूळचा पुण्याचा असून मालिकेच्या चित्रीकरणासाठी तो मुंबईत असतो. अनुजा आणि बाळ दोघेही व्यवस्थित असण्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान सध्या मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याने समीरला किती वेळ देता येईल याचीही उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागून राहिली आहे. मात्र या गुड न्यूजनंतर चाहत्यांनी आपला आनंद व्यक्त करत सोशल मीडियावर समीरला मनापासून लाईक आणि कमेंट्सच्या स्वरूपात अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. 

शाहिद कपूर साकारणार आता महाभारतातील 'कर्ण'

समीरला गायनाचाही आवड

समीर केवळ उत्तम कलाकार नाही तर त्याला उत्तम गाताही येतं. समीर आपल्या सोशल मीडियावरही खूपच अॅक्टिव्ह असतो. आपले फोटो नेहमी पोस्ट करत असतो. तर त्याने Bandish Bandits या सिरीजमधील एक ठुमरी आपण गात  असल्याचा प्रयत्न करत आहोत असं कॅप्शन देत गुस्ताखी माफ असंही म्हटलं आहे. मात्र समीरचं गाणं ऐकल्यानंतर आपोआपच आपलं मन गुंततं. समीर उत्तम गातो. त्यामुळे आता पुढे एखाद्या सेलिब्रिटी गाण्याच्या रियालिटी शो मध्ये समीर दिसला तर कोणाला नवल वाटायला नको. समीरने अनेक मालिकांमध्ये काम केले असून आपल्या अभिनयाचा ठसा तर उमटवलाच आहे. केवळ मराठीच नाही तर त्याने हिंदी वेबसिरीजमधूनही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. आता समीर पुढचा कोणता प्रोजेक्ट करणार याचीही उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागली आहे. विशेषतः समीरचा तरूणाईमध्ये जास्त फॅन फॉलोईंग आहे. त्याची अभ्या ही व्यक्तिरेखा सर्वांनाच खूप आवडत आहे. 

समीर, अनुजा आणि त्याच्या गोंडस परीला ‘POPxo मराठीकडून’ मनःपूर्वक शुभेच्छा!

जिया खानच्या बहिणीने केला साजिद खानवर विनयभंगाचा आरोप

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक