#CoronaVirusमुळे घरी बसून कंटाळलात तर हे टिकटॉक व्हिडिओ पाहा

#CoronaVirusमुळे घरी बसून कंटाळलात तर हे टिकटॉक व्हिडिओ पाहा

सोमवारपासूनच अनेकांना #WorkFromHome लागू करण्यात आले आहे. इतर वेळी कितीही सुट्टी हीवी असली तरी आता अनेकांना घरी राहून राहून कंटाळा यायला लागला आहे.दिवसभर बातम्या बघणं आणि काम करुन कंटाळा आला असेल तर हे मस्ट टिकटॉक बघा कारण कदाचित हे टिकटॉक व्हिडिओ तुम्ही पाहायला हवेत. कारण हे व्हिडिओ तुम्हाला थोडे रिलॅक्स करतील अशी आमची अपेक्षा आहे. बाहेरुन मस्त काहीतरी चमचमीच मागवा आणि हे फनी व्हिडिओ एन्जॉय करा. पाहा असेच काही खास व्हिडिओ

CoronaVirus: चित्रीकरण बंद असूनही कर्मचाऱ्यांना देण्यात येणार वेतन

एक आशिक

टिकटॉकवर असे काही व्हिडिओ आहेत. जे तुम्हाला खळखळून हसायला भाग पाडतात. ते आशिक आणि मजनूचे. आता हे खरंच प्रेमात इतके दुखावले असतात असे नाही तर त्यांची अॅक्टिंगच इतकी खतरनाक असते की, यांना नेमकं काय झालं आहे कळत नाही. बरं याचे फॉलोवर्सच त्यांना अशा गोष्टी करायला प्रेरणा देतात. आता हा टिकटॉक व्हिडओ पाहिल्यावर तुम्हाला नक्की हसायला येईल.

तो चित्रपट नाकारल्याचा मला आजही पश्चाताप होतो - जूही चावला

मुलगा मुलगीमध्ये बदलणे

आपल्याकडे मुलाने जरा मुलींसारखे वागण्याचा प्रयत्न केला की, त्याला काहीही बोललं जातं. पण हल्ली या व्हिडिओचा ट्रेंडच आला आहे. म्हणजे एका सेकंदात मुलामधून मुलीमध्ये स्वत:ला बदलत आहेत. त्यांना असे पाहिल्यानंतर एका क्षणासाठी ही लोकं नक्की आहेत तरी कोण?असे वाटते. कारण या मुलांनी केलेला मेकअप इतका परफेक्ट असतो की, तो मुलींनाही लाजवून जातो आणि भाव खावून जातो. 

मराठी मुली जोरदार

बरं या सगळ्यामध्ये मराठी डायलॉग आणि मुलीसुद्धा मागे नाहीत. कोणतेही नवीन डायलॉग आले की, त्यांना टिकटॉक केलाच म्हणून समजा. बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, प्रेम आणि अॅटिट्युट असे हे टिकटॉक बघायला भारी वाटतात. पण कधीकधी हे डायलॉग तुम्हाला खळखळून हसवतातसुद्धा 

चॅलेंजवाले टिकटॉक

आता जर तुम्ही टिकटॉकवर नसाल तर बरेच आहे म्हणा. कारण याचा ट्रेंड तुम्हाला फॉलो करायचा म्हणजे खाऊची गोष्ट नाही. तुम्हाला यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. आता सांगायचे झाले तर यामध्ये नवनवीन चॅलेंज येत राहतात. आता एकाने ते चॅलेंज पूर्ण केले की, मग काय सगळे टिकटॉकवासी हे चॅलेंज करायला सुरुवात करतात. यामध्ये कधीकधी मजा सुद्धा येते म्हणा. पण आता टिकटॉकवाल्या विनोदाची खरचं गरज आहे. घरी बसून फारच कंटाळा आला आहे. तुम्हालाही जर काय करु असा प्रश्न पडला असेल तर काही काळासाठी हे टिकटॉक बघा म्हणजे तुम्हाला कंटाळा येणार नाही. 


आता महत्वाची गोष्ट सध्या तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज आहे. सुदैवाने तुम्हाला घरी राहून काम करण्याची संधी मिळालीच आहे तर मस्त काम करा. आराम करा आणि या दिवसात तुम्ही जे केले नाही ते करा. 

View this post on Instagram

for life .. 👊🤙🤞 (how I spent my birthday)

A post shared by Alia ☀️ (@aliaabhatt) on

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.