‘ग्रँड मस्ती’ करणारी अभिनेत्री आहे गरोदर, शेअर केला फोटो

‘ग्रँड मस्ती’ करणारी अभिनेत्री आहे गरोदर, शेअर केला फोटो

सध्या बॉलीवूडमध्ये खूपच गुड न्यूज येत आहेत. आता अजून एका अभिनेत्रीने आपण गरोदर असल्याचं सांगितलं आहे. ‘ग्रँड मस्ती’ करणारी ही अभिनेत्री म्हणजे ब्रुना अब्दुल्लाह. ब्रुनाने आपण गरोदर असल्याचं फोटो शेअर करून सांगितलं आहे. ब्रुनाने मागच्या वर्षी तिचा बॉयफ्रेंड एलान फ्रेजरबरोबर साखरपुडा केला होता. ब्रुनाने लग्न केलेलं नाही. पण आपण आई बनणार असून आपलं बाळ आता 22 आठवड्यांचं असल्याचं तिने शेअर केलं आहे. ब्रुनाने खूपच कमी वेळामध्ये बॉलीवूडमध्ये नाव कमावलं. ब्रुना एक मॉडेल असून खूपच चांगली डान्सरही आहे.


लग्नापूर्वी आई होण्यात काहीच अडचण नाही
 

 

 


View this post on Instagram


 

 

The best day 🌼☀️ . . #underthematterhorn #zermatt #switzerland #us


A post shared by Bruna Abdullah (@brunaabdullah) on
ब्रुनाने नुकतीच एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आणि ती आपल्या बाळासाठी अतिशय आनंदी आहे असं तिने सांगितलं आहे. आपल्या घरातील वातावरणही अतिशय आनंदी असून सगळेच अतिशय सकारात्मक आहेत असंही तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. यासाठी लग्नाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. तर एकत्र राहण्यासाठी प्रेमाची गरज असते. काही जण लग्नाचं बंधन हे मनाविरूद्ध निभावत असतात तर काही जण घटस्फोट घेऊन वेगळे होतात. त्यामुळे या बंंधनाची सध्या काही गरज आहे आहे असं वाटत नाही. सध्या आई होण्याचा अनुभव घेत असून ब्रुना प्रियकर एलानबरोबर वेळ घालवत आहे. शिवाय ब्रुनाने याबाबत आपलं मतही मांडलं, ‘प्रेम हे दोन व्यक्तींना एकमेकांसोबत घट्ट बांधून ठेवतं. लग्न हे प्रेमाचं एक नाव आहे हे खरं असलं तरीही खरंच असं होतं का? माझ्या आयुष्यातील हे सुंदर सरप्राईज आहे’ अशा भावनाही ब्रुनाने व्यक्त केल्या आहेत. बाळाविषयी बोलताना ब्रुनाने म्हटलं आहे की, बाळाचं आरोग्य सध्या उत्कृष्ट असून बेबी उत्तम आणि अगदी व्यवस्थित आहे. सध्या सगळेच बाळाची आतुरतेने वाट पाहात असून ब्रुना खूपच आनंदी आहे.


आईची जबाबदारी घेण्यासाठी तयार


ब्रुनाने दिलेल्या मुलाखतीमध्ये आईची जबाबदारी घेण्यासाठी आपण तयार असल्याचं सांगितलं आहे. ती आणि तिचा प्रियकर आता व्यवस्थित सेटल असून दोघेही जबाबदारी पेलण्यासाठी तयार असल्याचं ब्रुनाने सांगितलं आहे. सध्या ते दोघेही बाळाची वाट पाहत असून घरात सगळीकडे खूपच आनंद असल्याचंही तिने म्हटलं आहे. ब्रुनाने बॉलीवूडमध्ये ग्रँड मस्ती, आय हेट लव्ह स्टोरी आणि देसी बॉईज या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शिवाय तिने ‘नच बलिये’ या रियालिटी शो मध्येदेखील आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. ब्रुना अतिशय चांगली डान्सर असून तिला या शोमध्ये देखील चांगले गुण प्रत्येकवेळी मिळाले होते.


काही दिवसांपूर्वीच अॅमीने पण सांगितलं गरोदर असल्याचं


काही दिवसांपूर्वीच बॉलीवूडची अजून एक अभिनेत्री अॅमी जॅक्सननेही आपण गरोदर असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर काही दिवसातच तिने आपल्या बॉयफ्रेंडबरोबर साखरपुडा केला असल्याचेही फोटो पोस्ट केले आहेत. तर दुसरीकडे अर्जुन रामपालनेही आपली गर्लफ्रेंड गरोदर असल्याचं फोटो शेअर करून सांगितलं आणि आपण अतिशय आनंदी असल्याचंही सांगितलं आहे. सध्या बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्री गरोदर असल्याचं दिसून येत आहे.  शिवाय त्याचं लग्न झालं नसलं तरीही बाळाची जबाबदारीदेखील व्यवस्थित सांभाळण्याची त्यांची तयारी असल्याचं दिसून येत आहे.


फोटो सौजन्य - Instagram


अभिनेत्री ब्रुना अब्दुल्लाचं सिझलिंग हॉट फोटोशूट


अभिनेत्री रश्मी देसाईला होता ‘हा’ गंभीर आजार, म्हणून वाढत होतं वजन


ऐश्वर्यासारखी हुबेहुब दिसणारी मॉडेल सोशल मीडियावर होतेय व्हायरल