‘गली बॉय’ रणवीरच्या ‘मेरे गली मैं’ गाण्याचं ओरिजनल व्हर्जन तुम्हाला माहीत आहे का?

‘गली बॉय’ रणवीरच्या ‘मेरे गली मैं’ गाण्याचं ओरिजनल व्हर्जन तुम्हाला माहीत आहे का?

गली बॉय (Gully Boy) रणवीर सिंग (Ranveer Singh) ची सध्या प्रत्येक गल्लीत सुरू आहे. दिवसेंदिवस हा फिव्हर वाढतो आहे. अपना टाईम आयेगा या रॅप गाण्यानंतर आता या चित्रपटाचं दुसरं गाणं ‘मेरे गली मैं’ रिलीज झालं आहे.या गाण्यात गली रॅपचा जबरदस्त तडका आहे आणि रणवीर सिंहने पुन्हा एकदा धमाकेदार अंदाजात रॅप केलं आहे. 


‘अपना टाईम’नंतर ‘मेरे गली मैं’


रणवीर सिंगच्या आगामी गली बॉयचं नवीन गाणं रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं तरूणाईला भावणार असून ते लवकरच तरूणाईच्या आवडत्या गाण्यांपैकी एक होईल यात शंका नाही. या गाण्याचं शूटींगही उत्तम करण्यात आलं आहे. या गाण्याचं लिखाण, कंपोजिंग आणि गायलंही आहे Divine आणि Naezy या मुंबईच्या दोन रॅपर्सनी.

Subscribe to POPxoTV

या चित्रपटातील गाण्याचं ओरिजनल व्हर्जनही मुद्दाम बघण्यासारखं आहे. जे या दोन रॅपर्सनीच बनवलं होतं.


या चित्रपटाची प्रेरणा असलेले खरे ‘गलीबॉय’ Divine आणि Naezy
 

 

 


View this post on Instagram


 

 

Sher is sheher ka, gaane machate tehelka! 💗💥🙌 @vivianakadivine


A post shared by Naved Shaikh (@naezythebaa) on
'गली बॉय' चित्रपटाची टॅगलाईन आहे ‘अपना टाईम आयेगा.’ यावरूनच कळतं की, ही कहाणी आहे आकांक्षा आणि प्रेरणेने भरलेली असणार. खरोखरच ही कहाणी आहे मुंबईतल्या धारावीतील दोन देसी रॅपर्स Naezy आणि Divineची. जी कोणीही ऐकली तरी त्यांना नक्कीच यातून प्रेरणा मिळेल. या दोन्ही रॅपर्सना भारतीय रॅप आणि हिप-हॉप रिडीफाईन करण्याचं श्रेय जातं. पंजाबी रॅपप्रमाणे यांची गाणी दारू, मुली यांच्यावर नसून ती सामान्य माणसाचा संघर्ष आणि गरीबीशी झुंज देणाऱ्याबाबत असतात. ज्याच्याशी कोणतीही सामान्य व्यक्ती रिलेट करू शकते. हे दोघंही रॅपर असले तरी ते मुंबईतील वेगवेगळ्या भागात राहतात.
 

 

 


View this post on Instagram


 

 

#GullyGang


A post shared by D I V I N E (GULLYGANG) (@vivianakadivine) on
Divine चं खरं नाव व्हिवीयन फर्नांडिस असून तो जेबी नगर झोपडपट्टीचा रहिवासी आहे. Divine ला प्रसिद्धी मिळाली ती 2011 मध्ये जेव्हा त्याने बीबीसी आयोजित 'Fire In The Booth Series' रेडिओ कार्यक्रमात भाग घेणारा पहिला भारतीय रॅपर बनला.
 

 

 


View this post on Instagram


 

 

#Gully state of mind


A post shared by Naved Shaikh (@naezythebaa) on
तर Nazey उर्फ नावेद शेखने 13 व्या वर्षीचं रॅपिंग करायला सुरूवात केली. त्याने कुर्लाच्या चाळीत प्रसिद्ध रॅपर शॉन पॉलचं गाण ऐकलं. त्याल ते आवडलं आणि त्याने आपल्या रॅपिंगला सुरूवात केली. एवढंच नाहीतर Naezy ची ही कहाणी 'बॉम्बे 70' नावाच्या डॉक्युमेंट्रीच्या रूपातही शूट करण्यात आली आहे. तसंच त्याने आधीही अनुराग कश्यपच्या मुक्काबाज चित्रपटासाठी पैंतरा हे रॅप केलं आहे. पण लोकांच्या नजरा या दोघांकडे तेव्हा वळल्या जेव्हा या जोडीने बनवलं मेरी गली में हे रॅप.


‘गली बॉय’साठी रणवीरनेही घेतली भरपूर मेहनत
 

 

 


View this post on Instagram


 

 

Wolfpack 🐺 @vivianakadivine @naezythebaa #gullyboy


A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on
रणवीर या चित्रपटात मुंबईतल्या धारावी या झोपडपट्टीतील एका तरूणाची भूमिका करत आहे. जो आपल्या संगीताच्या माध्यमातून आपल्या भावना मांडतो. या भूमिकेसाठी रणवीरने तब्बल 10 महिने रॅपर डिव्हाईन आणि नाजीकडून रॅपचं ट्रेनिंग घेतलं. कोणत्या शब्दांवर जोर द्यावा आणि रॅपिंग अजून प्रभावशाली कसं करावं याबाबतीत रणवीरला या रॅपर्सनी मार्गदर्शन केलं. या चित्रपटातील आपली भूमिका अजून वास्तववादी वाटावी म्हणून रणवीरने स्वतः चित्रपटातील चार गाणी गायली आहेत.


सिम्बा’नंतर रणवीर ‘गल्ली बॉय’ लुकमध्ये येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला


झोयाचा ‘गली बॉय’

झोया अख्तर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. या आधी झोयाने ‘दिल धडकने दो’ (2015), ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ (2011), ‘लक बाय चान्स’ (2009) यांसारखे उत्तम चित्रपट दिले आहेत. हा चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज होत असून यामध्ये रणवीरच्या अपोझिट आलिया भट्ट दिसणार आहे. रणवीरच्या वडिलांच्या भूमिकेत विजय राज तर आईच्या भूमिकेत अमृता सुभाष आहे. तर सोबतच कल्की, विजय वर्मा आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्याही भूमिका आहेत.  


हेही वाचा : 


2019 मध्ये बॉलीवूडमधल्या 'नव्या' जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला


वर्ष 2019 मध्ये बॉलीवूडमध्ये धडकणार महिला बायोपिक