‘गलीबॉय’चा कहर, पाच दिवसात 75 कोटींचा गल्ला

‘गलीबॉय’चा कहर, पाच दिवसात 75 कोटींचा गल्ला

सध्या सगळीकडे रणवीर सिंग आणि त्याच्या ‘गलीबॉय’ चा बोलबाला आहे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी प्रदर्शित झालेला रणवीर सिंग आणि आलिया भटच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या तीन दिवसातच या चित्रपटाने 50 कोटींंची कमाई करत सर्वांचं लक्ष वेधलं असून आता पाच दिवसात ‘गलीबॉय’ने कहर केला आहे. पाच दिवसात 100 कोटींचा गल्ला या चित्रपटाने जमवला आहे. झोया अख्तरच्या दिग्दर्शनाखाली आतापर्यंत बनलेल्या चित्रपटांमध्ये ‘गलीबॉय’ हा चित्रपट तिचा सर्वात यशस्वी चित्रपट मानला जात आहे. केवळ चाहतेच नाही तर समीक्षकांनीदेखील या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर सध्या हा चित्रपट चांगलाच धुमाकूळ घालत असल्याचं चित्र आहे. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 75 कोटीचा बिझनेस केला असून सर्वांकडूनच या चित्रपटाची प्रशंसा केली जात आहे.


‘गलीबॉय’ ठरला बेंचमार्कट्रेड अनालिस्ट तरण आदर्शने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या चित्रपटाच्या कमाईचे आकडे शेअर केले असून या चित्रपटाची कमाई म्हमेज एक बेंचमार्क ठरल्याचं म्हटलं आहे. रविवारपर्यंत या चित्रपटाने 72.45 कोटींचा व्यवसाय केला आणि आज पाचव्या दिवशी या चित्रपटाने 75 कोटीचा आकडा पार केल्याचंही त्यानं म्हटलं आहे. कोणत्याही चित्रपटाच्या कमाईसाठी तरण आदर्शचे ट्विट पाहिले जातात आणि याआधी उरी या चित्रपटानेदेखील चांगली कमाई केली असून या चित्रपटाच्या पुढे ‘गलीबॉय’ची कमाई जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट यांच्या अफलातून अभिनयाने सजलेला आणि अन्य कलाकारांच्याही अप्रतिम अभिनयाने साकार झालेला हा चित्रपट सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. त्यामुळेच प्रत्येक जण हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघण्याचा अनुभव घेत असल्याचं चित्र आहे.


झोयाचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट


gully boy


झोयाच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा ‘गलीबॉय’ चित्रपट ठरला आहे. झोयाचा यापूर्वी आलेला ‘दिल धडकने दो’ या चित्रपटाने 76.88 कोटी कमाई केली होती तर ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटाने जगभर 90.27 कोटीचा गल्ला जमवला होता. तर ‘गलीबॉय’ने पाच दिवसांमध्ये हे सर्व रेकॉर्ड तोडून रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. याच आठवड्यात हा चित्रपट 100 कोटी कमवणार हे नक्की. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. इतकंच नाही तर आगाऊ तिकिट बुकिंगमध्ये या चित्रपटाने आठ कोटी इतकी कमाई केली. त्यामुळे हा चित्रपट चांगली कमाई करणार हे आधीच ट्रेड अनालिस्टकडून सांगण्यात आलं होतं.


रणवीरची चलती


ranveer as gully boy


मागील वर्षाच्या शेवटी प्रदर्शित झालेला रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ आणि आता दोन महिन्याच्या फरकात प्रदर्शित झालेला ‘गलीबॉय’ या चित्रपटांमुळे सध्या रणवीरची चलती असल्याचं दिसून येत आहे. अर्थात यामागे त्याची असलेली मेहनतही आहे. पण तरीही यावर्षी रणवीरने आपल्या अभिनयाने आपण कोणाहीपेक्षा कमी नाही हे दाखवून दिले आहे. मागच्यावर्षीदेखील ‘पद्मावत’मधील खिलजी या व्यक्तिरेखेने सर्व प्रेक्षकांचं मन रणवीरनं जिंकून घेतलं. एकंदरीतच आता रणवीर की चल पडी असं म्हणायला हरकत नाही. आता रणवीर यावर्षी अजून कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांना नवी मेजवानी देणार याच विचारात सध्या प्रेक्षक आहेत.


फोटो सौजन्य - Instagram, Tweeter


हेदेखील वाचा - 


अभिनेत्री करिश्मा कपूर करतेय कमबॅक


‘माझं लग्न झालं आहे’ म्हणाली आलिया भट


‘प्रेम कधीच इतकं तितकं नसतं; ते एक तर असतं किंवा नसतं’