सोशल मीडीयाचं आवडतं बाळ आणि सैफिनाचा मुलगा तैमूर याचा आज 2 रा वाढदिवस आहे. या छोट्या नवाबचा वाढदिवस खूपच खास आहे, कारण तैमूर सध्या त्याच्या आईबाबांसोबत दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊनमध्ये मजा करत आहे. त्यांचे छान फोटोजही सोशल मीडीयावर व्हायरल झाले आहेत.
लाडक्या तैमूरसाठी मावशी करिश्माने दिल्या गोड शुभेच्छा
आपल्या लाडक्या भाच्यासाठी मावशी करिश्मा कपूरने गोड शुभेच्छा आणि फोटो तिच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केला. या फोटोमध्ये तैमूर त्याच्या भावंडांसोबत खूपच क्यूट दिसत आहे.
View this post on Instagram
तैमूरच्या बाललीला
तैमूर जन्मानंतर व्हायरल झालेला त्याचा पहिला फोटो
तैमूर त्याच्या बाललीलांमुळे सतत चर्चेत असतो. तसंच तैमूरच्या क्यूट लुक्सने लोकांमध्ये त्याच्याबद्दल खूपच क्रेझ आहे. एवढी की त्याच्या नावाने फेसबुकवर पेजेस आणि इन्स्टाग्राम अकाउंटसुद्धा आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
तैमूरचं आई करीनासोबत खूपच जास्त बॉन्डीग आहे. आई करीना नेहमीच त्याला घेऊन फिरताना दिसते. पाहा तैमूरचे आईसोबतचे क्यूट मूमेंटस
View this post on Instagram
आपले बाबा सैफ अली खान यांचा फोटो पाहातानाचा तैमूरचा हा क्यूट फोटो
तैमूर आणि त्याचे सेलिब्रिटी किड फ्रेंडस
तैमूरचे आईबाबा बॉलीवूड सेलिब्रिटी असल्यामुळे त्याचे मित्रमैत्रिणीही सेलिब्रिटींची मुलं आहेत.
View this post on Instagram
तैमूर आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर खूपच एंजॉय करतो. करीनाने वाढदिवसाच्या दिवशी तैमूर इकडे नसल्याने त्याच्या फ्रेंडससाठी खास प्री बर्थडे पार्टी दिली होती.
तैमूरसारखं हूबेहुब खेळणं
तैमूरच्या दिवसेंदिवस वाढता प्रसिद्धीमुळे त्याच्यासारखं दिसणारं खेळणंसुद्धा बाजारात लाँच करण्यात आलं होतं.
तैमूरची नॅनीसुद्धा चर्चेत
View this post on InstagramDont forget to watch @vdwthefilm guys 😘😘😘 #pappileloon dance by Taimur 😂 lol 😘✌
तैमूर तर चर्चेत असतोच पण त्याला सांभाळणारी नॅनीसुद्धा चर्चेत आली होती. मीडीयाच्या सततच्या पाठलागामुळे या नॅनीची मात्र सतत पंचाईत होताना दिसते. एवढंच नाहीतर तैमूरसोबत सावलीसारख्या असणाऱ्या या नॅनीच्या पगाराची चर्चाही सोशल मीडीयावर रंगली होती.
फोटो सौजन्य : Instagram