गेले कित्येक दिवस हार्दिक पांड्या एका अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. हार्दिक पांड्याने आता स्वतः ही गोष्ट जाहीर केली असून तो या अभिनेत्रीच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाला आहे. अर्थात त्याने 01.01.2020 मध्ये नताशा स्टेनकोविकसह काही फोटो शेअर करत एंगेज असल्याचं जाहीर केलं आहे. नताशा आणि हार्दिक नेहमीच एकमेकांबरोबर दिसत होते. पण नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच हार्दिकने नताशाबरोबरील आपलं नातं स्पष्ट केलं आहे. त्याने तिला हिऱ्याची अंगठीदेखील दिल्याचे या फोटोमध्ये दिसून येत आहे. हार्दिकचं नाव याआधी बऱ्याच अभिनेत्रींसह जोडण्यात आलं होतं. पण हार्दिकने शेवटी आपण नताशाबरोबर नात्यात असल्याचं जाहीर करत सर्वांनाच वर्षाच्या सुरुवातीला धक्का दिला आहे.
हार्दिक आणि नताशाच्या नावाची गेले काही दिवस चर्चा होती. दोघेही नेहमी सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोला लाईक आणि कमेंट्स करत होते. त्यावरूनच त्यांच्या चाहत्यांनी हा अंदाज काढला होता. मात्र यावर दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण नवीन वर्ष सुरू व्हायच्या काही तास आधी हार्दिकने नताशाचा हात पकडून एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये त्याने नताशाला फायरवर्क अर्थात पटाका असं म्हटलं होतं. ‘माझ्या फायरवर्क (पटका)सह नव्या वर्षाची सुरूवात’ असं कॅप्शन हार्दिकने दिलं. तेव्हाच त्याच्यावर अभिनंदनाचा खरं तर वर्षावर सुरू झाला होता. पण नववर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याने नताशासह अजून काही फोटो शेअर करत आपण एंगेज असल्याचं एका वेगळ्याच तऱ्हेने सांगितलं आहे. ‘मैं तेरा तू मेरी जाने सारे हिंदुस्तान’ अशा रोमँटिक गाण्याच्या ओळी लिहून हार्दिकने आपलं नातं जाहीर केलं आहे. यामध्ये नताशाच्या हातात हिऱ्याची अंगठी दिसत असून दोघेही अत्यंत आनंदी दिसत आहेत. हार्दिकने समुद्राच्या मधोमध नताशाला मागणी घातल्याचे त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओमधून दिसून येत आहे.
EX बॉयफ्रेंड हार्दिक पांड्यामुळे उर्वशी रौतेला हैराण, फॅन्सना केली विनंती
हार्दिक पांड्या आणि नताशाच्या या फोटोवर क्रिकेटर युजवेंद्र चहल, सिद्धेश लाड, हार्दिकची वहिनी आणि भाऊ क्रुणाल पांड्या, अर्जुन कपूर, सोफी चौधरी, क्रिस्टर डिसुझा इत्यादी जणांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. हार्दिक आणि नताशाचं नातं लवकरच लग्नात होणार आहे. नताशा स्टेनकोविक हार्दिकच्या घरच्यांनाही भेटली असून त्यांच्यामध्ये सर्व चर्चा झाल्याचीही बातमी आहे. नताशा आणि हार्दिकच्या नात्याबद्दल तेव्हा चर्चेला सुरुवात झाली जेव्हा नताशाच्या वाढदिवसाला हार्दिकने एक प्रेमपूर्वक संदेश लिहिला होता. हार्दिकचं नाव यापूर्वी अनेक जणींबरोबर जोडण्यात आलं होतं पण आता नताशामुळे इतर कोणाही बरोबर त्याचं नाव जोडण्याला पूर्णविराम लागला आहे. नताशादेखील याआधी अभिनेता अलीसह नात्यात होती. पण त्यांनी न पटल्यामुळे एकत्र न राहण्याचा निर्णय घेतला असून ते अजूनही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. नताशा मूळची भारतीय नसली तरीही ती अनेक अल्बममध्ये दिसली आहे. नताशा चांगली नृत्यांगना असून ती बॉलीवूडमध्ये सध्या आपलं नशीब आजमावत आहे.
हार्दिक पांड्याही अडकणार लग्नाच्या बेडीत, या अभिनेत्रीसोबत लग्नाच्या चर्चा
हार्दिक आणि नताशा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे. यावर्षीच ही जोडी लग्न करणार असून नताशा आणि हार्दिकच्या घरूनही त्यांच्या प्रेमाला कोणतीही आडकाठी नसल्याचं म्हटलं जात आहे. हार्दिकची मुलींच्या बाबतीतील इमेज याआधी चांगली नव्हती. पण आता नताशाच्या आयुष्यात येण्याने हार्दिकने आपलं आयुष्य बदललं असून तो लवकरच लग्नबंधनात अडकून संसार करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.