हार्दिक पांड्याही अडकणार लग्नाच्या बेडीत, या अभिनेत्रीसोबत लग्नाच्या चर्चा

हार्दिक पांड्याही अडकणार लग्नाच्या बेडीत, या अभिनेत्रीसोबत लग्नाच्या चर्चा

भारतीय क्रिकेट टीममधील खेळाडू हार्दिक पांड्या कायमच काहीना काही कारणास्तव चर्चेमध्ये असतो. फिल्डवर त्याचा खेळ आणि फिल्ड बाहेर त्याचे अफेअर्स चांगलेच गाजतात. आता अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर्सच्या चर्चा रंगल्या नंतर आता हार्दिक पांड्या लग्न करणार आहे असे कळत आहे. हार्दिक पांड्या एका अभिनेत्रीसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याचे कळत असून त्याने नुकतेच तिचे मोठ्या थाटामाटात हार्दिकच्या घरी स्वागत करण्यात आले आहे. पण अद्याप हार्दिकने या संदर्भातील खुलासा केला नाही.

Kasautii Zindagii Kay 2 : मिस्टर बजाजने शो ला केला अलविदा

 

कोण आहे ही अभिनेत्री?

Instagram

हार्दिक पांड्या सध्या नताशा स्टैंकोविकला डेट करत असल्याच्या चर्चा होत आहे. नताशा ही सध्या नच बलियेची स्पर्धक असून ती या स्पर्धेत तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत सहभागी झाली आहे. याच नताशाच्या प्रेमात हार्दिक पांड्या असल्याचे म्हटले जात आहे. नताशाला खरी ओळख मिळाली ती डीजे बादशाहच्या ‘डीजेवाले बाबू’ या व्हिडिओ साँगमुळे. या गाण्यानंतर तिची प्रसिद्धी वाढली.

प्यार हुआ,एकरार हुआ

Instagram

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नताशा आणि हार्दिक खूप चांगले मित्र आहेत. त्यांचे एकमेकांशी असलेल्या नाते अतिशय घट्ट असून हार्दिकच्या घरातही त्याचे हे नाते सर्वांना प्रसिद्ध आहे. काहीच दिवसांपूर्वी नताशाची ओळख हार्दिकने त्याच्या संपूर्ण पांड्या कुटुंबाशी करुन दिली.

त्या घटनेनंतर कपिल शर्माला कळले वेळेचे महत्व, सेटवर पहाटेच हजर

वाढदिवसाला खास शुभेच्छा!

आता दोघांमध्ये ‘कुछ तो गडबड है दया तुम नही समझोगे’.. असं म्हणावे लागेल. कारण हार्दिकच्या वाढदिवसाला नताशाने खास अंदाजात त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्या दोघांचा फोटो शेअर करत तिने त्यावर भलामोठा मजकूर टाईप केला आहे. मागच्या वर्षी हार्दिकच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडल्या. कॉफी विथ करणमध्ये हार्दिकची जीभ घसरली आणि सगळा गोंधळ झाला. त्याने महिलांविरोधात चुकीची विधाने केली होती. त्यामुळे त्याला सगळीकडूनच शब्दांचा मारा सहन करावा लागला. त्यातून हार्दिक आता बाहेर पडला आहे. या सगळ्या संदर्भातच नताशाने लिहिले आहेत.

अफेअर्सच्या नुसत्या चर्चा

हार्दिक पांड्या ऑन फिल्ड पेक्षा ऑफ फिल्ड जास्त अॅक्टिव्ह असतो. हे आम्ही नाही तर त्याच्या अफेअर्सच्या चर्चा हेच सगळे सांगून जातात. सगळ्यात आधी तो एली अवरामला डेट करत होता. त्यानंतर अभिनेत्री ईशा गुप्तासोबत तो रिलेशनशीपमध्ये असल्याचे सांगितले जात होते. पण हे नाते ही फार काळ टिकले नाही. या दोन रिलेशनशीपनंतर तो काही काळ उर्वशी रौतेलाच्या आयुष्यात असल्याचेही म्हटले जात होते. पण त्या दोघांमध्येही लवकरच ब्रेकअप झाला. त्यातून दोघे मुव्ह ऑन सुद्धा झाले आणि आता त्याचे सूत नताशासोबत जुळले, असे म्हटले जात आहे.

नुकतीच झाली सर्जरी

Instagram

हार्दिक पांड्या गेले काही दिवस पाठीच्या दुखण्यावरुन त्रस्त होता. नुकतीच त्याची लंडनमध्ये सर्जरी करण्यात आली. त्याच्या वाढदिवसाला त्याला मानसिक आधार देणारा हा मेसेज नताशाने लिहिला होता. 

आता एकूणच काय हार्दिकच्या आयुष्यात आणखी एक मुलगी आली आहे. आता तिच्यासोबत लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. आता तरी हार्दिक नताशासोबत लग्न करतो की नाही हे पाहावे लागेल.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.