Good News: ‘हेट स्टोरी’ फेम सुरवीन चावलाच्या घरी आली ‘ईवा’

Good News: ‘हेट स्टोरी’ फेम सुरवीन चावलाच्या घरी आली ‘ईवा’

सुरवीन चावला नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या गरोदरपणामध्ये आपलं बेबी बंप दाखवत होती. तेव्हाही तिचे फोटो व्हायरल झाले होते. 15 एप्रिलला सुरवीनने एका परीला जन्म दिला असून तिचं नाव ‘ईवा’ ठेवण्यात आलं आहे. नुकताच मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सुरवीनने आपल्या मुलीला जन्म दिला असून 21 एप्रिलला या बाळाला घरी आणण्यात आलं आणि या बाळाचं नाव ठेवण्यातही सुरवीनने उशीर केला नाहीये. आपल्या मुलीच्या पायांचा फोटो शेअर करत आपण आपल्या मुलीचं नाव ‘ईवा’ ठेवल्याचं सुरवीनने आपल्या चाहत्यांबरोबर सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

चेहरा दाखवला नाही


सुरवीन तिच्या नवऱ्याबरोबर घरी बाळाला घेऊन आली. तेव्हा तिचे अनेक फोटो हॉस्पिटलमधून बाहेर पडताना मीडियाने घेतले. मात्र सुरवीनने आपल्या बाळाचा चेहरा दाखवला नाही. सोशल मीडियावरदेखील तिने आपल्या बाळाच्या पायाचे फोटो पोस्ट केले असून तिचा चेहरा दाखवलेला नाही. सुरवीनने 2015 मध्ये उद्योगपती अक्षय ठक्करबरोबर इटलीमध्ये विवाह केला. पण या दोघांनीही ही गोष्ट लपवून ठेवली होती. 2017 मध्ये ही गोष्ट सुरवीनने आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली. ही जोडी 2013 पासून एकमेकांना डेट करत होती. दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम असून अक्षयने सुरवीनला कधीही तिच्या कामापासून दूर केलं नाही. तर तिला नेहमीच तिच्या कामासाठीही साथ दिली.

ईवाच्या येण्याने घरामध्ये आनंद


ईवाचा फोटो शेअर करत सुरवीनने आपला आनंद व्यक्त केला आहे. ‘छोट्याशा बुटामध्ये आता छोटेसे पाय सामावतील. तिच्या घरात येण्याने सगळीकडे फक्त आनंद पसरला आहे’ असं आपला नवरा अक्षय ठक्कर याला टॅग करत सुरवीनने सोशल मीडियावरील आपल्या अधिकृत अकाऊंटवरून ईवाचा फोटो पोस्ट केला आहे. सुरवीन आणि अक्षयला त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या असून प्रत्येकाला आता ईवाचा चेहरा पाहण्याची उत्सुकता असल्याचंही दिसून येत आहे. ईवाच्या जन्मानंतर आता अजून एका स्टार किडची भर पडली आहे. हल्ली स्टार्सना मुलं झाली की, त्यांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. ईवाचा जन्म होऊन सातच दिवस झाले आहेत. मात्र आता तिचा फोटो कधी पाहायला मिळणार याचीच चर्चा आहे. त्यामुळे तिचाही फोटो लवकरच व्हायरल होईल अशी अपेक्षा सुरवीनचे चाहते बाळगून आहेत.


सुरवीनच्या अभिनयाची वाहवा

सुरवीनने आपल्या करिअरची सुरवात ही ‘कहीं तो होगा’ या एकता कपूरच्या शो पासून केली. त्यानंतर तिला ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील तिच्या अभिनयाने तिला एक ओळख मिळवून दिली. सुरवीनने बॉलीवूडमध्ये ‘हेट स्टोरी - 2’, ‘उंगली’ आणि ‘पार्च्ड’ यासारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ‘पार्च्ड’ चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे तिला खूपच प्रशंसा मिळाली होती. याशिवाय तिने अनिल कपूरच्या ‘24’ या मालिकेत आणि ‘हक से’ आणि प्रसिद्ध ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसिरीजमध्येही काम केलं आहे. एक महिन्यापूर्वीच सुरवीनचं ‘बेबी शॉवर’ मोठ्या धुमधाममध्ये करण्यात आलं होतं. त्यावेळी सुरवीन खूपच सुंदर दिसत होती. शिवाय काही कार्यक्रमांनाही सुरवीनने आपल्या या गरोदरपणामध्ये हजेरी लावली होती. तिच्या या गरोदरपणाचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा


Good News: अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी प्रेगनंन्ट, फोटो झाले व्हायरल


Good News: बॉलीवूड अभिनेत्री आहे गरोदर, फोटो केला शेअर


Good News: इरफान खान कॅन्सरवर मात करून मुंबईत परत