#10yearchallenge क्रिकेटर युवराज सिंगची बायको हेजल कीचने शेअर केली भावनिक पोस्ट

#10yearchallenge क्रिकेटर युवराज सिंगची बायको हेजल कीचने शेअर केली भावनिक पोस्ट

बॉलीवुडमध्ये सधा #10yearschallengeची चलती आहे. या चॅलेंजमध्ये अनेक बड्या स्टार्सनी आपल्या 10 वर्ष जुन्या फोटोशी तुलना करत सध्याचा फोटोज शेअर केले आहेत. या चॅलेंज स्वीकारणाऱ्यांमध्ये आता क्रिकेटर युवराज सिंगच्या बायकोच नावंही सामील झालंय.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Happy Diwali to one and all! Love, the Keech-Singhs ❤️🕯


A post shared by Hazel Keech Singh (@hazelkeechofficial) on
पण हेजलने आपला 10 वर्षापूर्वीचा फोटो शेअर करत एक धक्कादायक खुलासा केला आहे.


हेजलचा धक्कादायक खुलासा

हेजलने दोन फोटो शेअर केले असून 10 वर्षापूर्वीच्या फोटोत ती फारच बारीक दिसतेय. पण दुसऱ्या फोटोत हेजल हेल्दी दिसतेय. या फोटोला कॅप्शन देत हेजलने लिहीलं आहे की, 10 वर्षापूर्वी मी डिप्रेशनशी झुंज देत होते. ज्याबद्दल कोणालाच माहीत नव्हतं. कारण मी सगळ्यांना हसतच भेटत असे. पण चांगलं दिसण्यासाठी उपाशी राहणं, स्वतःचे केस डार्क कलरने डाय करणं अशा गोष्टींचा मला त्रास होत असे. याबद्दल मी कोणालाच सांगितलं नाही. पण आता मला कोणाचीही पर्वा नाही. माझे केस मी शॉर्ट केले आहेत. आता मी आधीपेक्षा हेल्दी आणि आनंदी आहे. हे सत्य सांगण्याची आज माझ्यात हिम्मत आहे. हेजलचा आधीचा फोटो खूपच बोलका आहे.

या आधीही तिने डिप्रेशनबाबत इन्स्टा अकाउंटवर पोस्ट शेअर केली होती. पण त्यावेळी ती स्वतः डिप्रेशनमधून गेल्याचा तिने म्हटलं नव्हतं. 


हेजल, बॉलीवूड आणि युवराज
 

 

 


View this post on Instagram


 

 

Today's Bombay Times promoting #DharamSankatMein


A post shared by Hazel Keech Singh (@hazelkeechofficial) on
हेजलने बॉलीवूडमध्ये सलमान आणि करिना कपूरसोबत ‘बॉडीगार्ड’ चित्रपटात करिनाच्या मैत्रीणीची भूमिका केली होती. त्यानंतर मात्र तिला बॉलीवूडमध्ये खास काही करता आलं नाही.

मग युवराज सिंगबरोबर बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी  2016 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर हेजल लाईमलाईटपासून दूरच आहे.

नुकतंच उद्योगपती मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नात युवराज आणि हेजल हे जोडपं दिसलं होतं.


हेजल कीच आधी दीपिकानेही केला होता डिप्रेशनचा खुलासा

बॉलीवूड हे असं क्षेत्र आहे, जिथे टीकून राहणं सोप्प नाही. अनेकांना आपलं नाव कमावण्यासाठी काही ना काही कॉम्प्रोमाइज करावं लागतात किंवा एखाद्या गॉडफादरचा हात असावा लागतो. तरीही यश मिळालं नाही की, मग डिप्रेशनसारख्या गंभीर आजाराला तोंड द्यावं लागतं. हेजल कीचआधी पद्मावत अभिनेत्री दीप‍िका पदुकोणनेही ड‍िप्र‍ेशनमधून गेल्याचं मान्य केलं होतं. दीप‍िकाने सांगितलं होतं की, तिने डिप्रेशनशी कसा लढा दिला आणि पूर्ण जिद्दीीने डिप्रेशनमधून बाहेर पडत ती आज एक यशस्वी अभिनेत्री झाली आहे.