#RIPactorVIJAY मागचे सत्य आले समोर… हेटर्सना केले ट्रोल

#RIPactorVIJAY मागचे सत्य आले समोर… हेटर्सना केले ट्रोल

घ्या.. आता सोशल मीडियावर आणखी एका अफवेने डोकं पिंजून काढलं आहे. आता चक्क साऊथ स्टार विजयच्या मृत्यूचीही अफवा सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. #RIPactorVIJAY हा हॅशटॅगही सध्या मोठ्या प्रमाणात ट्रेंड होऊ लागला आहे. तुम्हाला सर्च केल्यानंतर सध्या हाच हॅशटॅग ट्रेंड होताना दिसेल. पण या हॅशटॅगमध्ये काहीच तथ्य नाही. साऊथचा हा स्टार व्यवस्थित असून त्याची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. सत्य समोर आल्यानंतर आता सोशल मीडियावर त्याच्या फॅन्सनी हेटर्सना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

New Age मराठी सिनेमाचा चेहरा Sai Tamhankar

झालं तरी काय?

instagram

सी. जोसेफ विजय अर्थात विजय या नावाने ओळखला जाणारा हा अभिनेता साऊथमध्ये फारच प्रसिद्ध आहे. अचानक त्याच्या मृत्यूच्या बातमीचे पेव सोशल मीडियावर फुटले. ट्विटरवर #RIPactorVIJAY वापरत अनेकांनी त्याला श्रद्धांजली द्यायला सुरुवात केली.त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याच्या फॅन्सना धक्का बसला. कोणतेही कारण नसताना विजयचा मृत्यू झाला कसा? असा प्रश्न त्याच्या फॅन्सना बसला. मग काय #RIPactorVIJAY हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. 

राखी सावंतने गुपचूप केलं लग्न, पाहा फोटो

बातमी खोटी

विजय हा ठणठणीत असल्याची एक बातमी पुन्हा या प्लॅटफॉर्मवर पसरु लागल्यानंतर आणि ती खरी आहे हे कळल्यानंतर मग त्याच्या फॅन्सना अगदी हायसे वाटले. मग काय त्याच्या फॅन्सनी ही बातमी पसरवणाऱ्यांची चांगलीच फैलावर घेतली आणि त्यांनी आणखी एक हॅशटॅग ट्रेंड केला तो म्हणजे  #LongLiveVIJAY त्यामुळे आता हे दोन्ही हॅश ट्रेंड होऊ लागले. विजयच्या मृत्यूचा हॅशटॅग काढून टाकावा अशी मागणी देखील करण्यात आली. 

‘Indian Idol’ फेम मराठमोळा राहुल वैद्य करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट

काय आहे अजित आणि विजय भांडण

instagram

या सगळ्या गैरसमजामध्ये आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे ती म्हणजे अभिनेता अजित आणि विजय असा वाद… अजित कुमार हा देखील तामिळमधील एक मोठा अभिनेता आहे.आता ज्याने हा हॅशटॅग ट्रेंड केला तो अजित कुमारचा फॅन आहे. त्यामुळे प्रत्यक्षात अजित आणि विजयमध्ये कोणताही वाद नसताना त्यांच्या फॅन्सनी त्यांच्या आवडीनुसार हा वाद उकरुन काढला आहे. आता या गोष्टीही ट्विटवरवर अगदी उघडपणाने बोलल्या जात आहे. केवळ एका अभिनेत्यावर असलेले प्रेम दाखवण्यासाठी हा सगळा प्रकार करण्यात आला आहे. 

 

मागितली माफी

आता ज्यांनी पहिल्यांदा #RIPactorVIJAY हॅशटॅग टाकून नको ती बातमी पसरवली त्याने आता माफी मागितली आहे. त्याने अजित फॅन असून मी केलेल्या माझ्या कृत्याचे मला वाईट असल्याचे म्हटले आहे. त्याने #RipVijay हा हॅशटॅग ट्रेंड केला होता. तो पुढे जाऊन ##RIPactorVIJAY असा करण्यात आला. पण थोडक्यात ही अफवा होती हे सिद्ध झाली आहे.

विजयचा येणार नवा चित्रपट

अभिनेता विजय मात्र या बाबतीत काहीच बोलला नाही. कारण तो सध्या त्याच्या चित्रपटामध्ये व्यग्र आहे. त्याचा ‘बिजिल’ नावाचा चित्रपट येणार असून त्यात तो एका फुटबॉल कोचची भूमिका साकारणार आहे. चित्रपटातील त्याच्या लुकचीही खूप चर्चा झाली होती. आता त्याच्या फॅन्सना या चित्रपटाची प्रतिक्षा आहे. हा चित्रपट त्याच्या करिअरमधील एक वेगळा आणि महत्वाचा चित्रपट असणार आहे.